Udayanraje Bhonsle : शिवाजी महाराजांच्या नावानं पक्ष स्थापन केला, मग मी म्हणू का पक्ष माझा; उदयनराजे भोसलेंचा शिवसेनेला टोला
मराठा आरक्षणासंदर्भात आधीच्या महाविकास आघाडी सरकारने काहीही केले नाही. आता केवळ बोलत आहेत. मात्र देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षणासाठी प्रयत्न केले. त्यांच्या जातीवरून वाद निर्माण हे लोक करत आहेत, असे उदयनराजे म्हणाले.
पुणे : शिवाजी महाराजांच्या नावाने पक्ष स्थापन केला. मग मी म्हणू का पक्ष माझा आहे, अशी टीका भाजपा नेते उदयनराजे भोसले (Udayanraje Bhonsle) यांनी शिवसेनेवर केली आहे. ते पुण्यात बोलत होते. दीपक केसरकर यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना शिवसेनेवर (Shivsena) टीका केली आहे. महाराष्ट्र हा लोकांचा आहे. आमच्यासारखे लोक लोकशाही पद्धतीने निवडून जातो, असा टोला त्यांनी लगावला आहे. जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ महाबळेश्वर आणखी कसे पर्यटन आकर्षित करेल यासाठी प्रयत्न करायचे आहेत, रोजगार उपलब्ध करता येतील, यासंदर्भात दीपक केसरकरांसोबत चर्चा झाली. केसरकर (Deepak Kesarkar) साहेब जुने मित्र आहेत. सावंतवाडीला आजोबांकडे जायचो तेव्हापासूनचे मित्र आहेत, असे ते म्हणाले. मराठा आरक्षणासंदर्भातही त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. महाविकास आघाडीने यासंदर्भात काहीही केले नाही, असा आरोप त्यांनी केला.
‘एकनाथ शिंदेंना तेव्हाच दिले असते तर…’
मराठा आरक्षणासंदर्भात आधीच्या महाविकास आघाडी सरकारने काहीही केले नाही. आता केवळ बोलत आहेत. मात्र देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षणासाठी प्रयत्न केले. त्यांच्या जातीवरून वाद निर्माण हे लोक करत आहेत. मला विशेष वाटते, की नुसती नाव लावतात पाटील, जाधव, महाडिक, शिर्के, भोसले… केलं का कुणी काही मराठा आरक्षणासाठी, असा सवाल त्यांनी केला. देवेंद्र मी तर जात-पात मानत नाही. त्याचवेळी एकनाथ शिंदेंकडे जबाबदारी दिली असती, तर प्रश्न मिटला असता. इकॅानॅामिक बॅकवर्ड सगळ्यांना द्या, अशी मागणीही त्यांनी केली.
काय म्हणाले उदयनराजे भोसले?
‘मी ब्रॉड माइंडेड’
मनात स्वार्थ बाळगून सत्ता स्थापन करतात जेव्हा स्वार्थ साध्य झाल्यानंतर ते वेगळे मार्ग स्वीकारतात. आता जे एकत्र आले ते कायम सोबत राहणार. कारण विचार एक आहे, असे उदयनराजे म्हणाले. तर यावेळी त्यांनी शिवेंद्रराजे भोसले यांच्यावरही टीका केली. ज्यांना वाटते माझ्यामुळे मंत्रीपद मिळाले नाही ते संकुचित आहेत. मी असले काही करत नाही. जे पोटात तेच ओठावर असते. मी ब्रॉड माइंडेड वागतो, असा टोला त्यांनी शिवेंद्रराजेंना लगावला.