AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: मारामारी झाली तर यू आर रिस्पॉन्सिबल, उदयनराजेंचं हटके स्टाईल कटोरा आंदोलन, चिल्लर दिल्यावर म्हणाले, दहाची नोट टाक!

मारामारी किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण त्यासाठी सरकार जबाबदार असेल. | Udyanraje Bhosale Lockdown

VIDEO: मारामारी झाली तर यू आर रिस्पॉन्सिबल, उदयनराजेंचं हटके स्टाईल कटोरा आंदोलन, चिल्लर दिल्यावर म्हणाले, दहाची नोट टाक!
उदयनराजे भोसले
| Updated on: Apr 10, 2021 | 2:47 PM
Share

सातारा: राज्य सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यास लोकं आणि मी ऐकणार नाही. उद्यापासून लॉकडाऊन (Lockdown) उठला पाहिजे. त्यानंतरही शासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यास तो आम्हाला मान्य नाही. यावरून मारामारी किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण त्यासाठी सरकार जबाबदार असेल. लोकं पोलिसांना चोपून काढतील, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला. (BJP MP Udyanraje protest in Satara Maharashtra against Lockdown)

खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी साताऱ्यातील पोवईनाक्यावर लॉकडाऊनविरोधात आंदोलन केले. हातात कटोरा घेऊन ते फुटपाथवर बसले होते. या प्रतिकात्मक आंदोलनानंतर उदयनराजे भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यावेळी उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. उद्यापासून लॉकडाऊन उठला पाहिजे. लोकांची आर्थिक अवस्था सरकारने लक्षात घेतली पाहिजे. लॉकडाऊन झाल्यास लोकांची उपासमार होईल. सरकारमधील कोणते तज्ज्ञ लॉकडाऊनचा निर्णय घेतात, असा सवालही त्यांनी विचारला. या लोकांच्या पाहिले तर ते कुठल्याही दृष्टीकोनातून तज्ज्ञ वाटत नाहीत. त्यामुळे जोपर्यंत वैद्यकीय समुदाय किंवा शास्त्रज्ञ लॉकडाऊनची गरज आहेच, असा अहवाल देत नाहीत, तोपर्यंत आम्ही लॉकडाऊन लागू देणार नाही, असे उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

‘प्रत्येकाने फॅमिली प्लॅनिंग केलं असतं तर आज लसींचा तुटवडा जाणवला नसता’

देशात फॅमिली प्लॅनिंग केले असते तर आज कोरोना लसींचा साठा कमी पडला नसता, असे वक्तव्य भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी केले होते. देशात लोकसंख्या पाहूनच कोरोना लसींचे वाटप झाले पाहिजे. लसीच्या वाटपावरून उगाच वाद निर्माण करण्यात अर्थ नाही, असे मत उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले होते.

शनिवारी आणि रविवारी दुकानं बंद ठेवायला कोरोना व्हायरस फक्त तेव्हाच बाहेर येतो का?, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी विचारला होता. राज्यभरातील व्यापाऱ्यांच्या व्यथा सारख्याच आहेत. माणूस जगण्याची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही. त्यामुळे काळजी घेणे हाच मार्ग आहे. मृत्यूचे प्रमाण पाहता प्रत्येकाला उदंड आयुष्य लाभो, अशा माझ्या सदिच्छा असल्याचे उदयनराजे भोसले यांनी म्हटले. संबंधित बातम्या:

कटोरा घेऊन उदयनराजे रस्त्यावर, तर सातारचा दुसरा खासदार गहू काढण्यासाठी शेतात!

PHOTO : राज्यातील लॉकडाऊन विरोधात खासदार उदयराजे भोसलेंनी हाती कटोरा घेतला!

भाजप खासदार उदयनराजे भोसले शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर

(BJP MP Udyanraje protest in Satara Maharashtra against Lockdown)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.