कारागृहातून सूत्रे हलवली, पुण्यात राहण्याची सोय, आंतरराष्ट्रीय डॉनकडून मदत,वाचा कसा रचला सर्व कट

उत्तर प्रदेशातील उमेश पाल खून प्रकरणाचा संबंध आता पुणे शहरापर्यंत आला आहे. या खून प्रकरणातील आरोपी काही दिवस पुणे शहरात होते. असद आणि गुलाम यांना पुण्यात सुरक्षित ठेवण्यात आले होते. आता उत्तर प्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनंतर पुण्यात शोध मोहीम सुरु झाली आहे.

कारागृहातून सूत्रे हलवली, पुण्यात राहण्याची सोय, आंतरराष्ट्रीय डॉनकडून मदत,वाचा कसा रचला सर्व कट
Follow us
| Updated on: Apr 15, 2023 | 11:35 AM

पुणे : उमेश पाल हत्याकांडातील आरोपी गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली. त्यानंतर अतिक अहमद याचा मुलगा असद याचे एनकाऊन्टर करण्यात आले. असदचा अनेक दिवस पुणे शहरात मुक्काम होता. तो गेल्या २५ दिवसांपासून फरार होता. त्यांच्यावर पाच लाखांचे बक्षीस उत्तर प्रदेश पोलिसांनी जाहीर केले होते. अखेर असद आणि शूटर गुलामला एन्काऊंटरमध्ये ठार मारण्यात आले. या २५ दिवसांमध्ये असीद कुठे होता, त्याची व्यवस्था कोणी केली? याची चौकशी पोलिसांनी सुरु केली. त्यातून धक्कादायक माहिती मिळाली.

अतिकने दिली महत्वाची माहिती

पोलिसांच्या चौकशीत अतिक अहमद याने महत्वाची माहिती दिली आहे. त्याने उमेश पालची हत्या कशी केली, कारागृहातून कशी सूत्रे हलवली, मोबाइल फोन अन् सीमकार्ड कसे मिळवले? ही सर्व माहिती अतिकने पोलिसांना दिली. अतिकने कारागृहातील एका सरकारी अधिकाऱ्याचे नावही सांगितले, ज्याच्या मोबाईल फोन आणि सिमकार्ड तुरुंगात पोहोचवण्याचे काम केले. बरेली तुरुंगात बंद असलेला त्याचा भाऊ अशरफ यालाही शाइस्ता परवीनने मोबाइल आणि सिम पुरवल्याचे अतिकने सांगितले.

हे सुद्धा वाचा

दाऊद टोळीच्या संपर्कात

डॉन मुख्तार अन्सारीच्या मदतीने अतिक अहमद दाऊद टोळीच्या संपर्कात आला. यानंतर अतिक टोळीने पाकिस्तानातून शस्त्रास्त्रांचा पुरवठा सुरू केला. असद अन् गुलाम यांच्यांसोबत झालेल्या चकमकीत विदेशी शस्त्रे जप्त झाले. यामुळे आता एनआयए सुद्धा अतिकच्या तपास करू शकते.

असदसाठी असे केले प्रयत्न

उमेश पाल खून प्रकरणानंतर असद आणि गुलाम यांना सुरक्षित ठेवणे हे अतिकसाठी आव्हान बनले होते. मग अतिकने डॉन अबू सालेमच्या जवळच्या व्यक्तींशी अन् माजी खासदार असलेल्या एका मोठ्या राजकारण्याशी त्याने संपर्क केला. असद आणि गुलाम यांची व्यवस्था पुणे शहरात करण्यात आली. त्यासाठी अबू सालेमने मदत केल्याचे वृत्त आहे.

पुण्यात कोण आहेत सालेमची लोक

आतिकचा भाऊ अशरफ आणि इंटरनॅशनल डॉन अबू सालेम यांचे चांगले संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे असद आणि गुलामला पुण्यात सालेमच्या जवळच्या लोकांसोबत राहण्याची व्यवस्था केली गेली. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी अबू सालेम तुरुंगात आहे. त्याचे नेटवर्क महाराष्ट्रात अजूनही सक्रिय आहे. अबू सालेमच्या सांगण्यावरुन अश्रफला पुण्यात आश्रय दिला गेला होता, अशी माहिती आहे.

पुणे पोलीस सक्रीय

आता पुणे पोलीस अन् महाराष्ट्र एटीएस सक्रीय झाले आहे. अबू सालेम याचे पुण्यातील नेटवर्क शोधण्यात येत आहे. यामुळे काही दिवसांत या प्रकरणात पुण्यातील काही लोकांना अटक होणार आहे.

हे ही वाचा

माफिया असदचे पुणे कनेक्शन आले समोर, पुण्यात अबू सलेम अन् कोणी केली व्यवस्था?

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.