आरक्षणासाठी एक व्हा, समरजितसिंह घाटगे यांची मराठा समाजाला हाक

मराठा समाज एकसंघ नसल्यामुळेच समाजाला आरक्षण मिळालं नाही. त्यामुळे हे आरक्षण मिळवण्यासाठी मराठा समाजाने एकसंघ व्हावं, असं आवाहन भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांनी केलं आहे. (unite to fight your reservation rights, SamarjitSinh Ghatge appeal to Maratha community)

आरक्षणासाठी एक व्हा, समरजितसिंह घाटगे यांची मराठा समाजाला हाक
भाजप नेते समरजितसिंह घाटगे
Follow us
| Updated on: Jun 01, 2021 | 8:13 PM

सांगली: मराठा समाज एकसंघ नसल्यामुळेच समाजाला आरक्षण मिळालं नाही. त्यामुळे हे आरक्षण मिळवण्यासाठी मराठा समाजाने एकसंघ व्हावं, असं आवाहन भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांनी केलं आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजात असंतोष असल्याचा दावाही समरजितसिंह घाटगे यांनी केला आहे. (unite to fight your reservation rights, SamarjitSinh Ghatge appeal to Maratha community)

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर आज सांगलीत एक बैठक पार पडली. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याचे समन्वयकांनी या बैठकीला हजेरी लावली होती. तसेच मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि सांगलीतील भाजपचे नेतेही या बैठकीला हजर होते. यावेळी समरजितसिंह घाटगे यांनी ही हाक दिली. मराठा समाजाला आरक्षण मिळायचे असेल तर सर्व मराठा समाज आणि नेत्यांनी एकसंघ होणे गरजेचे आहे, असं सांगतानाच राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाच्या बाजूने युक्तिवाद करण्यास कमी पडले आहे. त्यामुळे याचिका फेटाळली गेली, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

तर उमेदवारांचा उद्रेक होईल

मराठा समाज एक संघ नसल्याने आरक्षण मिळवण्यात यश येत नव्हतं. त्यामुळे सर्वानी एकत्र येऊन मराठा समाजाला कसे आरक्षण मिळेल हे पाहिलं पाहिजे, असंही ते म्हणाले. गेल्या वेळी मराठा समाजाने आरक्षणासाठी मोर्चे काढले. त्यावेळी मराठा तरुणांवर टाकण्यात आलेल्या केसेस मागे घेण्यात याव्यात. स्पर्धा परीक्षा दिलेल्या 2 हजार 585 विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या अजून करण्यात आलेल्या नाहीत. त्या नियुक्त्या राज्य सरकार कधी देणार ते आधी जाहीर करावे अन्यथा या उमेदवारांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही या बैठकीत देण्यात आला.

मिळेल त्या वाहनाने रायगडाकडे कूच करा

दरम्यान, खासदार संभाजी छत्रपती यांनी कार्यकर्त्यांना मिळेल त्या वाहनाने रायगडकडे कूच करण्याचे आदेश दिले आहेत. ते सोमवारी मराठा क्रांती मोर्चाच्या ऑनलाईन बैठकीत बोलत होते. यावेळी संभाजीराजे यांनी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर येण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता 6 जून रोजी किल्ले रायगडावरून संभाजीराजे कोणती नवी घोषणा करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तत्पूर्वी 2 जून रोजी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांची बैठकही आयोजित करण्यात आली आहे. (unite to fight your reservation rights, SamarjitSinh Ghatge appeal to Maratha community)

संबंधित बातम्या:

सरकारच्या मानेवर बसून आरक्षण घेण्यासाठी सज्ज व्हा, समरजितसिंह घाटगे आक्रमक

5 जूनला मराठा मोर्चा निघणारच, विनायक मेटेंचा एल्गार, मोर्चाला विरोध करणाऱ्यांवर जोरदार टीका

शरद पवारांकडूनच मंडल आयोगाची अंमलबजावणी, ओबीसींचं आरक्षण अबाधित; नवाब मलिकांचं मोठं विधान

(unite to fight your reservation rights, SamarjitSinh Ghatge appeal to Maratha community)

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....