AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Valentine’s Day 2023: पुणे शहरातील गार्डन विलोभनीय, Valentine’s Day ला जोडीदारसोबत घालवा अविस्मरणीय क्षण

पुणे शहरात जाऊन व्हॅलेंटाईन डे अविस्मरणीय करायचं असेल तर तुम्हाला हवी असणारी माहिती आम्ही देणार आहोत. पुणे शहरात अशी खूप उद्याने आहेत, जेथे जाऊन तुम्ही व्हॅलेंटाईन डे साजरा करु शकता. या उद्यानांमध्ये तुम्ही आपला पुर्ण दिवस घालवू शकतात. 

Valentine's Day 2023: पुणे शहरातील गार्डन विलोभनीय, Valentine's Day ला जोडीदारसोबत घालवा अविस्मरणीय क्षण
सारस बाग पुणे
Follow us
| Updated on: Feb 10, 2023 | 8:44 AM

पुणे : व्हॅलेंटाईन वीक (Valentine Week) सुरु झाला आहे. काल चॉकलेट डे झाला. आज टेडी डे आहे. आता प्रेमींना १४ फेब्रवारीचे  म्हणजेच  Valentine’s Day चे वेध लागले आहे. आपल्या जोडीदारासोबत हा खास दिवस घालण्यासाठी अनेक जणांकडून नियोजन केले जात आहे. दिवसभर घालवता येईल, असे ठिकाण शोधले जात आहे. पुणे शहरात जाऊन व्हॅलेंटाईन डे अविस्मरणीय करायचं असेल तर तुम्हाला हवी असणारी माहिती आम्ही देणार आहोत. पुणे शहरात अशी खूप उद्याने आहेत, जेथे जाऊन तुम्ही व्हॅलेंटाईन डे साजरा करु शकता. या उद्यानांमध्ये तुम्ही आपला पुर्ण दिवस घालवू शकतात.

पु ला देशपांडे बाग

पुणे शहरातील सिंहगड रोडवर पु ला देशपांडे उद्यान आहे. याला जपानी गार्डन म्हणूनही ओळखले जाते. कारण जपानमधील ओकायामा गार्डनची थीम त्यासाठी घेतली आहे. शांत आणि नैसर्गिक वातावरण हे उद्यानाचे वैशिष्ट्य आहे. विविध प्रकारची फुले, वनस्पती येथे पाहायला मिळतात. बागेत एक सरोवर देखील आहे जे त्याच्या सौंदर्यात भर घालते. या उद्यानात निसर्गाचा उत्तम आनंद लुटत तुम्ही Valentine’s Day आरामात साजरा करु शकणार.

हे सुद्धा वाचा

सारस बाग

सारस बाग हे पुण्यातील सुंदर उद्यानांपैकी एक आहे. स्वारगेटपासून अगदी जवळ हे उद्यान आहे. शहरातील सर्वात स्वच्छ उद्यान आहे. अनेक झाडे, उंच आणि लहान आणि अनेक झुडपांनी सजलेली बाग मॉर्निंग वॉक करणाऱ्यांसाठी चांगले ठिकाण आहे. पावसाळ्यात सौदर्यं अधिकच चांगले दिसते. झाडांवर पाण्याचे थेंब मनाला आनंद देतात. उद्यानाच्या मध्यभागी कमळांची फुले असणारे एक सरोवर आहे. सारस बागमधील शांत व निसर्ग रम्य वातावरणात Valentine’s Day तुम्ही साजरा करु शकतात.

एम्प्रेस गार्डन

पुणे येथील एम्प्रेस गार्डन 39 एकर जमिनीवर पसरलेले आहे. संपूर्ण दिवस घालवण्यासाठी एक आदर्श ठिकाण आहे. विविध प्रकराचे फुले आणि झाडे ही येथील वैशिष्ट आहे. काही प्राणी या उद्यानात आहेत. या ठिकाणी जेवणासाठी चांगली सुविधा आहे. निसर्ग आणि कृत्रिम रचनेचा हे चांगले उदाहरण आहे. तुम्ही पुर्ण दिवस Valentine’s Day येथे साजरा करु शकतात.

बंड गार्डन

बंड गार्डनला महात्मा गांधी गार्डनही म्हणतात. हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय उद्यानांपैकी एक आहे. राज्याच्या संस्कृतीचे आणि जीवनशैलीचे उत्तम उदाहरण हे आहे. येथे झुडुपे आणि झाडे वेळोवेळी उत्तम प्रकारे सुव्यवस्थित ठेवली जातात. बागेच्या आजूबाजूला असलेली नारळाची झाडे उद्यानाच्या सौंदर्यात आणखी भर घालतात.या ठिकाणी तुम्ही Valentine’s Day साजरा करु शकतात.

चित्तरंजन वाटिका उद्यान

चित्तरंजन वाटिकेत मस्त जॉगिंग ट्रॅक आहे. या जॉगिंग ट्रॅकचा आनंद शहरभरातून येणारे पर्यटक घेतात. फुलांची चैतन्य असो किंवा झाडांची हिरवी सावली असो, तुम्हाला इथे नक्कीच गारवा मिळेल. तुम्ही Valentine’s Day येथे साजरा करु शकतात.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुखांची गृहमंत्रालयाला मोठी मागणी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुखांची गृहमंत्रालयाला मोठी मागणी.
'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी
'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी.
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे.
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.