Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘महाराष्ट्राच्या खलीला तुमच्या मदतीची गरज’ FB पोस्ट लिहीत वसंत मोरेंनी का केली हात जोडून विनंती?

Vasant More News : हजारो लोकांनी वसंत मोरे यांची ही फेसबुक पोस्ट लाईक केली आहे.

'महाराष्ट्राच्या खलीला तुमच्या मदतीची गरज' FB पोस्ट लिहीत वसंत मोरेंनी का केली हात जोडून विनंती?
वसंत मोरेंची फेसबुक पोस्टImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Jun 08, 2022 | 8:04 AM

पुणे : पुण्यातील मनसेचे चर्चेत असलेले नगरसेवक वसंत मोरे (Vasant More Facebook Post) यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. या फेसबुक पोस्टमधून त्यांनी हात जोडून लोकांना आर्थिक मदतीची विनंती केलीय. ही मदत त्यांनी स्वतःसाठी नाही तर एक 40 वर्षांच्या माणसासाठी मागितली आहे. महाराष्ट्राचा खली (Khali of Maharashtra) अशी ओळख असलेल्या उमेश वसवे (Umesh Vasave) यांच्या मदतीसाठी वसंत मोरे पुढे सरसावले आहेत. महाराष्ट्राची संपत्ती असलेल्या उमेशसाठी सढळ हातानं लोकांनी मदत करावी असं आवाहन केलं आहे. मदतीचं आवाहन करण्याआधी हृदयस्पर्शी प्रसंग वसंत मोरे यांनी फेसबुकवरुन पोस्ट केलाय. मंगळवारी रात्री उशिरा त्यांनी फेसबुकवर पोस्ट करत उमेश वसवे यांचा गुगल पे नंबर देत मुळात मदतीची पोस्ट का केली? तुमचे 100-500 रुपयेही मराठी देह वाचवू शकतात, असं वसंत मोरेंनी नेमकं का म्हटलं? हे समजून घेण्यासाठी आधी त्यांच्या फेसबुक पोस्ट काय होती, हे पाहणं गरजेचं आहे.

वसंत मोरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय की,…

महाराष्ट्राच्या खलीला गरज तुमच्या मदतीची… हा आहे कै.सोनेरी आमदार रमेशभाऊंचा अंगरक्षक श्री.उमेश रमेश वसवे राहणार सिंहगड वसवेवाडी, वय अवघे ४० उंची तब्बल ७ फूट वजन १६५ किलो अशी प्रचंड शरीर संपत्ती लाभलेला उमेश गेल्या २ वर्षांपासून आजाराने व्यापलाय… होतं नव्हतं ते सगळे जगण्याच्या धडपडीत गमावून बसलाय… लोकांना सुरक्षा देणारा खली आज जगण्यासाठी ढसाढसा रडताना पाहिलाय… पुण्यातील एका नामांकित बिल्डरने त्याचे कष्टाचे पैसे बुडवलेत, मी त्या बिल्डरला फोन केला तर पैसे नाहीत बोला… ठीक आहे त्याला थोडा सवडीने बघतो… पण मित्रांनो हा उमेश म्हणजे आपल्या महाराष्ट्राची संपत्ती आहे… जर त्याने या महिन्यात त्याच्या गळ्यावर आणि पाठीवर शस्त्रक्रिया केली नाही तर कदाचित ही आपली मराठी माणसाची संपत्ती मातीत ही मिळेल, त्याचे नाशिकला ऑपरेशन करायचे आहे, तेव्हा माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे उमेश ला जमेल तशी यथाशक्ती मदत करा… तुमचे १०० ते ५०० रु. सुद्धा हा धिप्पाड मराठी देह वाचवू शकतात… कारण ही असली माणसं परत परत जन्म घेत नाही. तेव्हा प्लीज मदत करा… त्याचा गुगल पे नंबर :- 8484844343

पाहा वसंत मोरे यांची फेसबुक पोस्ट :

हे सुद्धा वाचा

मदतीचा ओघ

हजारो लोकांनी वसंत मोरे यांची ही फेसबुक पोस्ट लाईक केली आहे. तर अवघ्या सात तासांत 300 हून अधिक जणांनी ही फेसबुक पोस्ट शेअर केली होती. इतकंच काय तर या पोस्टमुळे आता उमेश वसवे यांना आर्थिक मदतीचा ओघच सुरु झालाय.

वसंत मोरे यांनी याच पोस्टवर कमेंट करत पाच हजार रुपयांची मदत उमेश यांना केल्याचा स्क्रीनशॉट पोस्ट केलंय. त्याच्याप्रमाणेच इतरही अनेकजण आर्थिक मदतीसाठी पुढे सरसावलेत. कुणी 100, कुणी 200, कुणी 101 तर कुणी 300, कुणी 500, हजार अशी मदत आता गुगल पेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

सोशल मीडियाचा सहकार्यासाठी वापर

सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा वाद, भांडणं, ट्रोलिंग, वादग्रस्त पोस्ट या सारख्या बाबी वाढल्याचं दिसतं. पण अशातच एका समाजोपयोगी कामासाठी फेसबुकच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या खलीला मदतीचा ओघ सुरु झाला. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर चांगल्या बाबींसाठीही करता येऊ शकतो, हेही यातून अधोरेखित झालंय.

करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?.
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा.
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?.
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप.
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप.
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा.
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश.
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण.
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर.
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?.