Rain : पुणे जिल्ह्यात दोन आठवड्यानंतर पाऊस परतला, राज्यात काय असणार परिस्थिती

IMD Weather forecast : राज्यात पावसाने दडी मारली होती. पण गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही भागांत पाऊस सुरु झाला आहे. खान्देश विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. पुणे जिल्ह्यात दोन आठवड्यानंतर पाऊस परतलाय.

Rain : पुणे जिल्ह्यात दोन आठवड्यानंतर पाऊस परतला, राज्यात काय असणार परिस्थिती
Follow us
| Updated on: Aug 21, 2023 | 8:14 AM

पुणे | 21 ऑगस्ट 2023 : ऑगस्ट महिन्यात सुटीवर गेलेला पाऊस राज्यात परतला आहे. राज्य अजून मुसळधार पाऊस सुरु झाला नसला तरी रिमझिम स्वरुपाचा पाऊस अनेक भागांत पडत आहेत. विदर्भ आणि खान्देशात सोमवारी पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. पुणे जिल्ह्यात दोन आठवड्यानंतर पाऊस परतला आहे. पुणे जिल्ह्यातील घाटावर चांगला पाऊस होत आहे. राज्यात २५ ऑगस्टपर्यंत पाऊस कायम असेल, असा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

काय आहे अंदाज

खान्देशातील नंदुरबार, धुळे, जळगाव विदर्भातील गडचिरोली, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट सोमवारी दिला आहे. राज्यातील इतर भागात ढगाळ वातावरण असून रिमझिम स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाकडून व्यक्त केला गेला आहे.

हे सुद्धा वाचा

पुणे जिल्ह्यात पाऊस परतला

पुणे शहर आणि जिल्ह्यात दोन आठवड्यानंतर पाऊस परतला आहे. घाट परिसरात चांगला पाऊस रविवारी झाला. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार मावळमध्ये ३५ मिमी तर मुळशीमध्ये २५ मिमी पावसाची नोंद झाली. पुणे शहरात रविवारी पाऊस झाला. आता २४ ऑगस्टपर्यंत पुण्यात पाऊस कायम राहणार आहे.

आता कुठे सुरु आहे पाऊस

ठाण्यात पावसाची संततधार सुरू आहे. सोमवारी सकाळपासूनच पावसाची संततधार ठाण्यात सुरू आहे. तसेच वसई विरारमध्ये आज आज सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. मागील 48 तासांपासून भंडारा जिल्ह्यात सर्वदूर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे वैनगंगा नदीसह उपनदी व नाले ओसंडून वाहू लागले आहेत. या पावासाने काही भागातील भात पिकाना नवसंजीवनी मिळाली आहे.

पावसाचा फटका, पेरणी कमी

राज्यात गेल्या वर्षी आतापर्यंत १४० लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. परंतु यंदा उशिरा आलेला मान्सून त्यानंतर पावसाचा ब्रेक यामुळे पेरणी कमी क्षेत्रावर झाली आहे. यंदा फक्त १३७ लाख हेक्टरवर पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली. तसेच राज्यात आता, खरीप पेरणीची शक्यता कमी असल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.