AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : इंधन दरवाढीचा अनोखा निषेध, थेट बैलगाडीतूनच नवरा-नवरीची पाठवणी!

पेट्रोलने तर शंभरी गाठली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका सहन करावा लागतोय. अशावेळी समाजमाध्यमातून केंद्र सरकारवर जोरदार टीका होताना पाहायला मिळतेय.

Video : इंधन दरवाढीचा अनोखा निषेध, थेट बैलगाडीतूनच नवरा-नवरीची पाठवणी!
| Updated on: Feb 28, 2021 | 9:12 PM
Share

शिर्डी : इंधनाचे दर गगनाला भिडले आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोलने तर शंभरी गाठली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका सहन करावा लागतोय. अशावेळी समाजमाध्यमातून केंद्र सरकारवर जोरदार टीका होताना पाहायला मिळतेय. विरोधकांनीही केंद्र सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. अशातच एका नवदाम्पत्याने इंधन दरवाढीचा अनोख्या पद्धतीनं निषेध केलाय.(Newlywed couple in Sangamner taluka protest against fuel price hike)

संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावातील अधिराज मुकेश काकड आणि कोल्हेवाडीतील ज्ञानेश्वरी विठ्ठल वामन यांचा विवाह रविवारी पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने घालून दिलेले सर्व नियम पाळत, अत्यंत साध्या पद्धतीनं हा लग्नसोहळा संपन्न झाला. सर्व विधी पार पडल्यानंतर जेव्हा नववधूची पाठवणी करण्याची वेळ आली तेव्हा तिथे फुलांनी सजवलेली एखादी चारचाकी नव्हती. तर गळ्यात चंगाळे घातलेले बैल जुंपलेली एक बैलगाडी उभी होती!

पेट्रोल-डिझेलचे भाव वाढल्यामुळे सरकारचा निषेध म्हणून कोल्हेवाडी ते जोर्वे असा 5 किलोमीटरचा प्रवास या नवदाम्पत्यानं बैलगाडीतूनच केला. नव्या जोडप्यानं इंधन दरवाढीचा केलेला हा निषेध संगमनेर तालुका आणि अहमदनगर जिल्ह्यात सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

राज्यात आज पेट्रोल स्वस्त की महाग?

रविवारी पेट्रोल-डिझेलचे दर कालच्या दरा इतकेच आहेत. दिल्लीत पेट्रोलच्या किमतीत 24 पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलच्या किमतीत 15 पैशांची वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत.

राज्यातील पेट्रोलचे दर

मुंबई – 97.47 प्रतिलिटर

ठाणे – 97.45 प्रतिलिटर

पुणे – 97.35 प्रतिलिटर

नागपूर – 98.08 प्रतिलिटर

सांगली – 97. 73 प्रतिलिटर

सातारा – 97.94 प्रतिलिटर

कोल्हापूर – 97.78 प्रतिलिटर

परभणी – 99.68 प्रतिलिटर

राज्यातील डिझलचे दर

मुंबई – 88.60 प्रतिलिटर

ठाणे – 88.55 प्रतिलिटर

पुणे – 87.03प्रतिलिटर

नागपूर – 89.15 प्रतिलिटर

सांगली – 87.42 प्रतिलिटर

सातारा – 87.63 प्रतिलिटर

कोल्हापूर – 87.48 प्रतिलिटर

परभणी – 89.28 प्रतिलिटर

संबंधित बातम्या :

आता पेट्रोल आणि डिझेल आणखी स्वस्त होणार; पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी सांगितले ‘कारण’

SBI मध्ये खातं असेल तर तुम्हालाही स्वस्तात पेट्रोल मिळू शकतं!

Newlywed couple in Sangamner taluka protest against fuel price hike

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.