AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मी माघार घेतली याचं कारण…’, विजय शिवतारे यांनी ‘त्या’ विषयावर मौन सोडलं

विजय शिवतारे यांनी बारामतीमधून लोकसभा निवडण्याचा निर्णय मागे घेतल्यानंतर एक पत्र व्हायरल झालं होतं. या पत्रावर शिवतारे यांनी प्रत्युत्तर दिलं. "हे पत्र विरोधकांनी लिहिलेलं होतं. आमचा शिवसैनिक माझ्याबद्दल काही पत्रबित्र लिहीत नाही. त्याला भांडायचं असेल तर तो माझ्याकडे येऊन भांडतो. घरातल्या बापाशी जसा पोरगा भांडतो तसा माझा शिवसैनिक माझ्याशी येऊन भांडतो", असं विजय शिवतारे म्हणाले.

'मी माघार घेतली याचं कारण...', विजय शिवतारे यांनी 'त्या' विषयावर मौन सोडलं
शिवसेना नेते विजय शिवतारे
Follow us
| Updated on: Apr 07, 2024 | 3:40 PM

शिवसेना नेते विजय शिवतारे काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळाले. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांची मनधरणी करण्यात यश मिळालं. पण यावरुन विजय शिवतारे यांच्यावर विरोधकांकडून सडकून टीका करण्यात आली. विशेष म्हणजे सोशल मीडियावर विजय शिवतारे यांच्या कार्यकर्त्यांच्या नावे एक पत्रही व्हायरल झालं. या व्हायरल पत्रात अतिशय खोचक शब्दांत शिवतारे यांच्यावर टीका करण्यात आली. यानंतर आज विजय शिवतारे यांनी स्वत: मोकळेपणाने यावर भाष्य केलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी सासवडला होणाऱ्या सभेबाबतही माहिती दिली आहे. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपुमख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सासवडला सभा होणार आहे. ही फक्त सभा नाही तर जनसंवाद आणि शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी संवादसभा असणार आहे. एखादी गोष्ट युद्ध करून जिंकून मिळवता येते. पण तहात ती गोष्ट मिळाली तर युद्ध करण्याचं कारण नाही. समोपचारानेही कामं झालेली आहेत”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

एअरपोर्ट, गुंजवणीचे पाणी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्या. त्या स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस जनतेला सांगतील. माघार घेताना काय काय ठरलं हे स्वतः त्या ठिकाणी ते सांगतील”, अशी प्रतिक्रिया विजय शिवतारे यांनी दिली.

“50 हजार लोकांच्या क्षमतेइतकी मोठी ही सभा होईल. याआधी सुद्धा सासवडला ज्या मोठ्या सभा झालेल्या आहेत त्या शिवसेनेच्या आणि माझ्या झालेल्या आहेत. लोकांच्या हिताचे प्रश्न आहेत. वैयक्तिक माझ्या बाबतीतले कुठलेही प्रश्न नाहीत. विधानसभा निवडणूक अजून लांब आहे. विधानसभेबाबत नेत्यांना काय बोलायचं असतील तर ते बोलतील”, असं सूचक वक्तव्य विजय शिवतारे यांनी केलं.

‘मी माघार घेतली याचं कारण…’

“मी माघार घेतली याचं कारण ही महायुती जिंकली पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळं ऐकून घेऊन त्यातून मार्ग काढले. टोलेजंग ऐतिहासिक सभा ही होईल. त्या सभेचा आज नियोजन झालं. नियोजनासाठी मोठ्या संख्येने शिवसैनिक आले होते. ठरलेलं महायुतीचं काम आम्ही चोख करू. उद्या सकाळी 11 वाजता महायुतीच्या सर्व नेत्यांची बैठक सासवड येथे ठेवली आहे. त्यामध्येसुद्धा सगळ्यांचं ऐकून नियोजन करण्यात येईल. महायुतीच्या उमेदवाराचा शंभर टक्के मोठ्या मताधिक्याने विजय होईल”, असं विजय शिवतारे म्हणाले.

अजित पवार यांनी माफी मागावी का?

अजित पवार यांनी पुरंदरच्या पालखी मैदानावरून माफी मागावी, अशी मागणी केली जात होती. याबाबत शिवतारे यांना प्रश्न विचारण्यात आला. “एवढी चर्चा झाल्यानंतर आता तशी काय अपेक्षा राहिलेली नाही. पण त्यांना जे वाटेल ते ते बोलतील. पाच वर्षे प्रकल्प लेट झाले, त्यांनी वेगळा सूर धरला ठीक आहे. पण आता त्याला चालना मिळतेय. पाच वर्षात जी कामं झाली नाहीत ती एक वर्षात करण्याचा आम्ही प्रयत्न करू”, असं विजय शिवतारे म्हणाले.

विजय शिवतारे यांची व्हायरल पत्रावर प्रतिक्रिया

दरम्यान, विजय शिवतारे यांनी बारामतीमधून लोकसभा निवडण्याचा निर्णय मागे घेतल्यानंतर एक पत्र व्हायरल झालं होतं. या पत्रावर शिवतारे यांनी प्रत्युत्तर दिलं. “हे पत्र विरोधकांनी लिहिलेलं होतं. आमचा शिवसैनिक माझ्याबद्दल काही पत्रबित्र लिहीत नाही. त्याला भांडायचं असेल तर तो माझ्याकडे येऊन भांडतो. घरातल्या बापाशी जसा पोरगा भांडतो तसा माझा शिवसैनिक माझ्याशी येऊन भांडतो. बाप जसा शिव्या देतो, ओरडतो, मारतो, थोबाडीत देतो तेवढे सुद्धा मी करतो. ते रिलेशन आमचं वेगळ आहे. असा पत्र मित्र लिहिण्याचा नाटक पण आमच्यात कोणी करत नाही”, अशी प्रतिक्रिया विजय शिवतारे यांनी दिली.

“त्यांनी पत्र लिहिताना सनविवि लिहिलेल आहे. जर खरा शिवसैनिक असता तर सप्रेम जय महाराष्ट्र लिहिलं असतं. त्यामुळे ते पत्र कोणी लिहिलेला आहे हे सर्व आम्हाला ट्रेस झालेलं आहे. पण एवढ्या छोट्या लोकांना एक्स्पोस करणे यात आम्हाला वेळ घालवायचा नाही. जे काय उत्तर द्यायचं आहे ते माझ्या कार्यकर्त्यांनी दिलेलं आहे. त्याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही”, अशी भूमिका विजय शिवतारे यांनी मांडली.

पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News...
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News....