Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune : पुरंदरमध्ये गृहमंत्री म्हणून वावरतोय काँग्रेस कार्यकर्ता, शिवसेना आणि भाजपाचा आरोप; दुहेरी हत्याकांडानंतर आक्रमक

सासवडमध्ये कचरावेचणाऱ्यांना बांबूने मारहाण करत अंगावर गरम पाणी फेकण्यात आले. विश्रांतीसाठी हे कचरावेचक बसलेले असताना अंडाभुर्जीच्या टपरीवाल्या तरुणाने हा प्रकार केला. सासवडच्या भोंगळे वाइन्सजवळ कट्ट्यावर ही घटना घडली होती.

Pune : पुरंदरमध्ये गृहमंत्री म्हणून वावरतोय काँग्रेस कार्यकर्ता, शिवसेना आणि भाजपाचा आरोप; दुहेरी हत्याकांडानंतर आक्रमक
विजय शिवतारे/गंगाराम जगदाळेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 1:26 PM

पुरंदर, पुणे : पुरंदरमध्ये काँग्रेस कार्यकर्ता हा गृहमंत्री म्हणून वावरत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना आणि भाजपाने केला आहे. पुरंदरचे काँग्रेस आमदार संजय जगताप (Sanjay Jagtap) यांच्यावर शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे आणि भाजपाचे पुरंदर तालुकाध्यक्ष गंगाराम जगदाळे (Gangaram Jagdale) यांनी टीकास्त्र सोडले आहे. सासवड आणि जेजुरी पोलीस ठाण्याच्या कारभारात आमदार आणि त्यांचा एक सहकारी प्रचंड ढवळाढवळ करत असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला आहे. पुरंदर तालुक्यामध्ये पोलीस (Police) या आमदाराचेच ऐकतात. ते सांगतील तेच गुन्हे दाखल केले जातात. ज्यांच्यावर खरोखर अन्याय झाला आहे, त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. मागील साधारण दीड वर्षांपासून ही स्थिती असल्याचा आरोप गंगाराम जगदाळे यांनी केला आहे. विजय शिवतारे हेही याप्रश्नी आक्रमक झाले.

डॉक्टरांवर प्रचंड दबाव

दहा बार दिवसापूर्वी दुहेरी हत्याकांड झाले. यावर एका खबऱ्याच्या मार्फत गुन्हा दाखल करण्यात आला. 302 प्रमाणे तो दाखल करण्यात आला नाही. डॉक्टरांवर प्रचंड दबाव आणला. सरळसरळ हत्या असतानाही भूकबळीमुळे मृत्यू झाल्याचा अहवाल देण्यास भाग पाडले. मात्र काही पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी हा गुन्हा उघडकीस आणल्यानंतर बाराव्या दिवशी गुन्हा दाखल झाला. अशाप्रकारे काँग्रेसचे हे आमदार स्वत:ला गृहमंत्री समजतात, असे गंगाराम जगदाळे म्हणाले.

पोलीस अधीक्षकांना विनंती

पोलीस अधीक्षकांना विनंती आहे, की त्यांनी पोलीस स्टेशनकडे लक्ष द्यावे. खंडणीखोर, भंगार गृहमंत्री अशांना पोलीस स्टेशनला बसू देऊ नये, असे जगदाळे म्हणाले. बऱ्याच ठिकाणी असे झाले आहे, की गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला आल्यास गुन्हा दाखल करून घेतला जात नाही. एक दीड वर्षात जेवढे गुन्हे घडले आहेत, ते दाखल करून घ्यावे, त्याचा योग्य तपास करावा, अशीही विनंती गंगाराम जगदाळे यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

काय होती घटना?

सासवडमध्ये कचरावेचणाऱ्यांना बांबूने मारहाण करत अंगावर गरम पाणी फेकण्यात आले. विश्रांतीसाठी हे कचरावेचक बसलेले असताना अंडाभुर्जीच्या टपरीवाल्या तरुणाने हा प्रकार केला. सासवडच्या भोंगळे वाइन्सजवळ कट्ट्यावर ही घटना घडली होती. या प्रकारामुळे जखमी झालेल्या कचरावेचकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यापैकी एका 50 वर्षे वयाच्या आणि दुसऱ्या 60 वर्षे वयाच्या पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर खून करणाऱ्या संशयित आरोपीचे नाव निलेश उर्फ पप्पू जयवंत जगताप (रा. ताथेवाडी, सासवड) आहे. यावरून शिवतारे आणि जगदाळे यांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला आहे.

मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....