पुरंदरची खुमखुमी पुणे महापालिकेत काढू; विजय शिवतारेंनी अजितदादांना ललकारले

शिवसेना नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी पहिल्यांदाच राज्यातील महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांमध्ये बेबनाव असल्याची जाहीर कबुली दिली आहे. (vijay shivtare)

पुरंदरची खुमखुमी पुणे महापालिकेत काढू; विजय शिवतारेंनी अजितदादांना ललकारले
vijay shivtare
Follow us
| Updated on: Sep 26, 2021 | 7:12 PM

पुणे: शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच ललकारले आहे. पुरंदरची खुमखुमी पुणे महापालिकेत काढणार, असा इशाराच विजय शिवतारे यांनी दिला आहे. शिवतारे यांनी थेट अजितदादांना ललकारल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.(vijay shivtare reaction on maha vikas aghadi workers dispute)

विजय शिवतारे यांनी पुण्यात जाहीर सभेत हा इशारा दिला. पुरंदरची खुमखुमी मी पुणे महापालिकेत काढणार आहे. मावळमध्ये मी पार्थ पवार यांना पाडलं म्हणून पुरंदरमध्ये मला आव्हान देऊन पाडलं. मावळमध्ये मी श्रीरंग बारणेच्या प्रचारासाठी जनरल डायरसारखा लढलो. मात्र माझ्यावेळी माझ्यामागे कुणी उभं राहीलं नाही, अशी खंत शिवतारेंनी व्यक्त केली.

सत्तेत एकत्र, पण कार्यकर्त्यांमध्ये बेबनाव

शिवसेना नेते संजय राऊत म्हणजे वन मॅन आर्मी आहेत. त्यांच्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं आहे, असं सांगतानाच वर आपलं सरकार आहे. मुख्यमंत्री आपलेच आहेत. महाविकास आघाडी आपली आहे. सत्तेत येण्याचं आपलं स्वप्न पूर्ण झालं आहे. पण खाली तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा ताळमेळ बसत नाही, असं शिवतारे यांनी सांगितलं. वर नेते एकत्र आले तरी खाली कार्यकर्त्यांची डोके फोड सुरूच आहे. संघटनेने शिवसैनिकाला बळ द्यावं, असंही त्यांनी सांगितलं.

जिवाचं रान करू

पुणे जिल्ह्याचं अर्थकारण पुणे जिल्हा बँकेवर अवलंबून आहे. जिथे जिथे शिवसेनाचा उमेदवार स्ट्राँग असेल तिथे त्याचं खच्चीकरण केलं जातं. ही तक्रार करत नाही. पण सांगावसं वाटतं, असं त्यांनी सांगितलं. प्रश्न फक्त पुरंदरपुरता मर्यादित नाही तर प्रश्न जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या कार्यकर्त्यांचा आहे. असं असलं तरी पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक निवडून आणूच. त्यासाठी आम्ही जिवाचं रान करू, असंही त्यांनी सांगितलं.

त्याचे परिणाम भोगतो

यावेळी शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही नाव न घेता टीका केली. मावळमध्ये पार्थ पवार यांच्या विरोधात बारणे यांना निवडून आण्यासाठी आपण ताकतीने लढलो आणि आपली सीट आणली. त्यामुळेच या गोष्टीची खुन्नस खाऊन विजय शिवतरे कसा निवडून येतो असे हे लोक म्हणायचे, असा टोला त्यांनी अजितदादांना लगावला. यावर अधिक बोलणं योग्य नाही. जास्त बोलण्याचा परिणाम मी भोगत आहे, असंही ते म्हणाले.

आपलाच महापौर झाला पाहिजे

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये महापौर आपलाच झाला पाहिजे असं आवाहन केलं. दिल्लीमध्ये मी राहतो. लोकांना मी पत्ता सांगतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्यासमोर राहतात. त्यामुळे लोक मलाही ओळखतात. ही शिवसेनेची ताकद आहे, असं ते म्हणाले. आता भोसरीमध्ये मेळावा सुरू आहे. स्टेजवर मोठी गर्दी जमली आहे. मात्र, भोसरी भागात एकही नगरसेवक आपला निवडणून आला नाही ही खंत आहे. या स्टेजवर बसलेल्यांनी प्रत्येकी तीन नगरसेवक निवडून आणले तरी महापालिकेत आपली सत्ता येईल. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आपलाच महापौर होईल. त्यासाठी प्रयत्न करा, असं आवाहन राऊत यांनी केलं. महाराष्ट्रातील सत्ता आपली आहे. नुसतं पद आहे म्हणून नाही तर शिवसैनीकच्या मनगटात ताकद आहे म्हणून आपली सत्ता आहे, असंही ते म्हणाले. (vijay shivtare reaction on maha vikas aghadi workers dispute)

संबंधित बातम्या:

55 ला आमचा मुख्यमंत्री होतो तर मग 40-45 ला महापौर का नाही? जे राज्यात केलं तेच पुणे पिंपरी चिंचवडमध्ये करणार राऊत?

अजित पवारांना सांगू आमचे ऐका नाही तर आज मुख्यमंत्री दिल्लीला गेलेच आहेत, राऊतांचं थेट आव्हान?

मुंबईतील शाळा सुरू करण्याचा फॉर्म्युला ठरला; वर्षा गायकवाड आणि पालिका आयुक्तांच्या चर्चेतून निघाला मार्ग

(vijay shivtare reaction on maha vikas aghadi workers dispute)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.