Pimpri Chinchwad|पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर; जाणून घ्या किती आहेत प्रभाग ,किती नगरसेवक प्रतिनिधत्व करणार?

प्रभागरचनेबाबत हरकती व सूचना या लेखी स्वरूपात स्वीकारल्या जाणार आहेत. त्या समक्ष क्षेत्रीय अधिकारी किंवा महापालिका भवनातील निवडणूक विभागात द्याव्या लागणार आहेत. हरकती व सूचना 14  फेबु्रवारीपर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत. प्राप्त झालेल्या सूचना व हरकती 16 फेब्रुवारीस राज्य निवडणूक आयोगास सादर केल्या जातील.

Pimpri Chinchwad|पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर; जाणून घ्या किती आहेत प्रभाग ,किती नगरसेवक प्रतिनिधत्व करणार?
पिंपरी चिंचवड महानगरपालिकाImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Feb 01, 2022 | 12:17 PM

पिंपरी – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या(Pimpri Chinchwad Municipal Corporation) आगामी निवडणुकींसाठीचा(Election)  बहुप्रतीक्षित प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडा आज जाहीर झाला. जाहीर झालेल्या कच्च्या प्रारूप आराखड्यानुसार या निवडणुकीत महापालिकेचे 46 प्रभाग असणार असून 139 नगरसेवक(Corporator) त्यातून प्रतिनिधित्व करणार आहेत.  45 प्रभागात तीन सदस्यीय असणार आहेत तर एका प्रभागात 4 नगरसेवक असणार आहेत. एकूण139  प्रभागात 22 प्रभाग अनुसुचित जातीसाठी आणि 3  प्रभाग अनुसुचित जमातींसाठी आणि114 जागा खुल्या गटांसाठी असल्याची माहिती समोर आली आहे.2017 च्या निवडणूकीत 128  प्रभाग होते. लोकसंख्येच्या तुलनेत महापालिकेच्या नगरसेवक संख्येत 11  ने वाढत ती 139  झाली आहे.

क्षेत्रीय कार्यालयात नकाशे लावले जाणार

महानगरपालिकेच्या प्रसिद्ध झालेल्या प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडाचे नकाशे सर्व क्षेत्रीय कार्यालयात नकाशे लावले जाणार आहेत. यामध्ये भेळ चौक निगडी येथील अ क्षेत्रीय कार्यालय, चिंचवड रेल्वे स्थानकाच्या मागील बाजूस असलेले ब क्षेत्रीय कार्यालय, नेहरूनगरच्या हॉकी स्टेडिमयशेजारी असलेले क क्षेत्रीय कार्यालय, रहाटणीतील ड क्षेत्रीय, भोसरीतील पांजरपोळ येथील ई क्षेत्रीय कार्यालय, निगडीतील टिळक चौकातील फ क्षेत्रीय कार्यालय, थेरगावातील यशवंतराव चव्हाण शाळा संकुलातील ग क्षेत्रीय कार्यालय आणि कासारवाडीतील आयटीआय इमारतीतील ह क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारात नकाशे व माहिती पाहायला मिळणार आहे.

सूचना आणि हरकतींसाठीमागवल्या जाणार

प्रभागरचनेबाबत हरकती व सूचना या लेखी स्वरूपात स्वीकारल्या जाणार आहेत. त्या समक्ष क्षेत्रीय अधिकारी किंवा महापालिका भवनातील निवडणूक विभागात द्याव्या लागणार आहेत. हरकती व सूचना 14  फेबु्रवारीपर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत. प्राप्त झालेल्या सूचना व हरकती 16 फेब्रुवारीस राज्य निवडणूक आयोगास सादर केल्या जातील. त्यावर 26 फेब्रुवारीला सुनावणी होणार असल्याची माहिती महानगर पालिकेचे निवडणूक अधिकारी बाळासाहेब खांडेकर यांनी दिली आहे.

Budget 2022: अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद, ‘एमएसपी’ अंतर्गत 2 लाख 70 हजार कोटी रुपये देणार

Nagpur Education | खेळीमेळीच्या वातावरणातून वैज्ञानिक प्रयोग शिकता येणार; नागपुरात अद्ययावत स्टेम लॅबची निर्मिती

अर्थसंकल्पावर मिम्सचा पाऊस; मिम्सवाले सांगत आहेत बजेटकडून काय आहेत अपेक्षा

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.