Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नियम पाळा अन्यथा कारवाईला तयार रहा, नगरच्या गर्दीवर दक्षता पथकांचा वॉच!

अहमदनगर शहरात कोरोना वाढत असल्याने शहरातील गर्दीवर दक्षता पथकांचा वॉच राहणार आहे. | Nagar Corona Virus

नियम पाळा अन्यथा कारवाईला तयार रहा, नगरच्या गर्दीवर दक्षता पथकांचा वॉच!
अहमदनगर महापालिका
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 9:50 AM

अहमदनगर : अहमदनगर शहरात कोरोना वाढत असल्याने शहरातील गर्दीवर दक्षता पथकांचा वॉच राहणार आहे. तर पालिकेकडून चार पथकांची नियुक्ती करण्यात आली असून नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई होणार आहेय. तसेच कोरोना रुग्ण वाढत असल्याने शहरातील दहा ठिकाणी कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आले आहे. (Watch the vigilance squads on the city crowd Nagar Corona Virus Update)

नगर शहरातील माणिकनगर, विनायक नगर, सारसनागर, केडगाव तसेच बोल्हेगाव येथे 3 तर सावेडी परिसरात 3 आशा 10 ठिकाणी मिनी कॅन्टेन्मेंट झोन तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता 28 मार्च पर्यंत याठिकाणी विविध निर्बंध घालण्यात आले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, या भागातील रहदारी आणि वाहने वापरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यावर संबंधितावर कायदेशीर कारवाई होईल, असे महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, बाहेर पडताना मास्क-सॅनिटायझर वापरावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

नियम मोडणाऱ्या नागरिकांकडून आर्थिक दंड

मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून यात सरकारी कर्मचारी देखील आहेत. तर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना पाहून अनेकांची धावपळ उडालीय. मास्क न वापरणाऱ्या नागरिकांकडून महिनाभरात 83 लाख दंड वसूल करून 66 हजार नागरिकांवर कारवाई करण्यात आलीये. तर 15 दिवसात 16 हजार लोकांवर कारवाई तर 28 लाख दंड आकारण्यात आल्याची माहिती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितलं.

एसपी आणि कलेक्टर साहेबांची रस्त्यावर उतरुन जनजागृती

मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग पाळणं गरजेचे असल्याचं सांगत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरुन नागरिकांमध्ये जनजागृती केली. शिवाय नागरिकांना कोरोनाचे सगळे नियम पाळण्याचं आवाहन करत जे नागिरक नियम पाळणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाईचा इशारा देखील देण्यात आलाय.

सरकारी कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

कापड बाजार, जिल्हापरिषद कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयातील नियम मोडणाऱ्या नागरिकांवर आणि कर्मचाऱ्यांवर यावेळी कारवाई करण्यात आली. ज्या दुकानात मास्क वापरले जाणार नाही ते दुकान महिनाभर सील करण्याचा निर्णय देखील यावेळी घेण्यात आला.

लग्न सोहळ्यात 50 पेक्षा जास्त लोक नाही

लग्न समारंभात 50 पेक्षा जास्त गर्दी करू नये. त्यासाठी पोलिसांची मंगल कार्यालयात गस्त असणार आहे. गर्दी आढळल्यास यापुढील काही दिवस मंगल कार्यालय बंद केले जातील, असा इशाराही देण्यात आलाय.

(Watch the vigilance squads on the city crowd nagar Corona Virus Update)

हे ही वाचा :

नगरमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक रस्त्यावर, नियम मोडताना दिसला की कारवाई!

पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी.
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण.
माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप
माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप.
'रात्री एक्स्प्रेस हायवेवर बोलवलं अन्...' दादांनी सांगितला 'तो' किस्सा
'रात्री एक्स्प्रेस हायवेवर बोलवलं अन्...' दादांनी सांगितला 'तो' किस्सा.
रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरून वाद कायम, सरकार सोक्षमोक्ष करणार?
रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरून वाद कायम, सरकार सोक्षमोक्ष करणार?.
माझ्या नावाची अडचण असेल तर पत्र लगेच मागे घेतो..; भास्कर जाधव चिडले
माझ्या नावाची अडचण असेल तर पत्र लगेच मागे घेतो..; भास्कर जाधव चिडले.