‘मुलगी झाली हो…’ झरेकर कुटुंबानं चक्क हेलिकॉप्टर सफारी करत छोट्या परीचं केलं स्वागत

पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील शेल पिंपळगाव (Shel Pimpalgaon) येथे मुलीच्या जन्माचे (Birth of a girl) अनोख्या पद्धतीने स्वागत (Welcome) करण्यात आले आहे. जन्मानंतर मुलीला चक्क हेलिकॉप्टर सफारी करत घरी आणण्यात आले आहे.

'मुलगी झाली हो...' झरेकर कुटुंबानं चक्क हेलिकॉप्टर सफारी करत छोट्या परीचं केलं स्वागत
हेलिकॉप्टर सफारी करत करण्यात आलं मुलीच्या जन्माचं स्वागतImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 06, 2022 | 9:46 AM

पुणे : पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील शेल पिंपळगाव (Shel Pimpalgaon) येथे मुलीच्या जन्माचे अनोख्या पद्धतीने स्वागत (Birth of a girl) करण्यात आले आहे. जन्मानंतर मुलीला चक्क हेलिकॉप्टर (Helicopter) सफारी करत घरी आणण्यात आले आहे. मुलगा हा वंशाचा दिवा समजला जातो परंतु झरेकर कुटुंबीयांनी मुलगी हीच आपल्या वंशाचा दिवा आहे, असे समजून मुलीच्या जन्माचे जंगी आणि अनोखे स्वागत केले आहे. छोट्या परीला हेलिकॉप्टरमधून घरी आणत अनोख्या पद्धतीने मुलीचे स्वागत करत गावातील सर्वांनाच आश्चर्याचा धक्काही दिला आहे. या ग्रॅण्ड वेलकमने गावकरीही आनंदात आहेत. कारण झरेकर कुटुंबाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. आमच्या संपूर्ण कुटुंबात एकही मुलगी नव्हती. त्यामुळे अशाप्रकारचा निर्णय आम्ही घेतला, असे कुटुंबीयांनी आनंदाने म्हटले आहे. गावातही एक उत्साहाचे वातावरण यानिमित्ताने पाहायला मिळाले.

‘आमच्या संपूर्ण कुटुंबात एकही मुलगी नव्हती’

राजलक्ष्मी नावाच्या मुलीचा जन्म 22 जानेवारी रोजी भोसरी येथे तिच्या आईच्या घरी (माहेरी) झाला आणि बाळाला खेडमधील शेलगाव येथे तिच्या घरी नेण्यासाठी हेलिकॉप्टर मागविण्यात आले, असे मुलीचे वडील विशाल झरेकर यांनी सांगितले. ते व्यवसायाने वकील आहे. ते म्हणतात, “आमच्या संपूर्ण कुटुंबात एकही मुलगी नव्हती. त्यामुळे, आमच्या मुलीचे स्वागत विशेष करण्यासाठी आम्ही 1 लाख रुपयांच्या चॉपर राइडची व्यवस्था केली.” मुलीच्या जन्मानंतर तिला हेलिकॉप्टरमधून घरी आणण्यात आले.

अनोखा संदेश

या अनोख्या स्वागताने समाजात एक संदेश दिला गेला आहे. आजही काही ठिकाणी मुलीच्या जन्मानंतर नाक मुरडले जाते. त्यांच्यासाठी तर हा संदेश महत्त्वाचा आहे. मुलगी हाच वंशाचा दिवा मानून तिचे स्वागत करायला हवे, असा संदेश यानिमित्ताने देण्यात आला आहे.

आणखी वाचा :

Pune Crime | ‘आमच्या गॅंगसोबत का राहत नाहीस?’ पुण्यात तरुणाला मारहाण करणारा गुंड जेरबंद

Pune metro : मेट्रो स्थानके होणार अस्सल पुणेरी; स्थानकांवर प्रतिबिंबित होईल पुण्याची ओळख!

पेट्रोल, डिझेल दर वाढीसोबतच पुणेकरांना महागाईचा आणखी एक झटका; सीएनजीच्या भावात वाढ

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.