Rain : राज्यात पावसाचा काय आहे अंदाज, कोणत्या जिल्ह्यास यलो अलर्ट, कोणाला ऑरेंज अलर्ट

Pune and Mumbai Rain : राज्यात मान्सूनचे आगमन होऊन दोन आठवडे झाले आहेत. परंतु पुणे, मुंबई वगळता राज्यात अजून मान्सूनने जोर पकडला नाही. आता आगामी तीन, चार दिवस कसा पाऊस असणार? यासंदर्भात हवामान विभागाने माहिती दिली आहे.

Rain : राज्यात पावसाचा काय आहे अंदाज, कोणत्या जिल्ह्यास यलो अलर्ट, कोणाला ऑरेंज अलर्ट
Follow us
| Updated on: Jul 06, 2023 | 12:10 PM

योगेश बोरसे, पुणे : महाराष्ट्रात मान्सून २५ जून रोजी दाखल झाला. मान्सून दाखल झाल्यानंतर मुंबई, पुणे शहरात चांगला पाऊस झाला. परंतु दोन, तीन दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली होती. आता राज्यात पावसाची परिस्थिती कशी असणार आहे, यासंदर्भात हवामान विभागाने माहिती दिली. पुढील तीन, चार दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पाऊस होणार आहे. या ठिकाणी अतिवृष्टीसुद्धा होण्याची शक्यता पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस.होसळीकर यांनी व्यक्त केली आहे.

पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट

मॉन्सूनचा पाऊस राज्यात पुन्हा एकदा सक्रीय होत आहे. त्यानंतर हवामान खात्याने पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात दिवसभर आकाश पूर्णतः ढगाळ असणार आहे. बहुतेक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या काळात घाटमाथ्यावर जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यताही हवामान खात्याने वर्तविला आहे. तसेच रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांच्या गडगडाटसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

हे सुद्धा वाचा

जळगावातील नागझिरी नदीला पूर

जळगाव जिल्ह्यात पाऊस नसताना नागझिरी नदीला पूर आला आहे. सातपुडा पर्वत रांगेत झालेल्या मुसळधार पावसामुळे नागझिरी नदीला पूर आला आहे. सातपुड्यात झालेल्या पावसामुळे या भागातील अन्य नदी नाले देखील दुथडी भरून वाहू लागले आहेत. यामुळे अजंदे, नांदूरखेडा भातखेडा, शिंदखेडासह ऐनपुरकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद पडली. जळगाव जिल्ह्यात अजून दमदार पाऊस नाही. परंतु रावेर तालुक्यात बुधवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगेतून वाहत असलेल्या नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे.

परभणीत मुसळधार पाऊस

मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला. पाथरी तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. पाथरी तालुक्यातील उमरा, गुंज, बाभळगाव, तुरा, मसला या भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली. या पावसामुळे पाथरी ते गुंज हा मार्ग बंद झाला. या मार्गावर तुराजवळील पुलावरून पाणी वाहत असल्याने एक ते दीड तास वाहतूक ठप्प होती. तसेच गुंज खुर्द येथील पुलावरून सुध्दा पाणी वाहत होते.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.