Rain : जुलै महिन्यात कसा असणार पाऊस, हवामान विभागाने दिली महत्वाची माहिती

Mumbai and Pune Rain : राज्यात जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरु आहे. पुणे, मुंबईत संपूर्ण आठवडाभर रिमझिम पाऊस झाला. आता जुलै महिन्यातील पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Rain : जुलै महिन्यात कसा असणार पाऊस, हवामान विभागाने दिली महत्वाची माहिती
Follow us
| Updated on: Jul 01, 2023 | 10:32 AM

योगेश बोरसे, पुणे : दरवर्षी जून महिन्यात दाखल होणार मान्सूनने यंदा वाट पाहण्यास लावली. बिपरजॉय चक्रीवादळाने मान्सूनचे चित्र बदलले. कोकणात ११ जून रोजी आलेला मान्सून राज्यात २५ जून रोजी दाखल झाला. त्यानंतर पुणे, मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस सुरु आहे. कुठे रिमझिम तर कुठे मुसळधार पाऊस होत आहे. यंदा जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे. परंतु जुलै महिन्यात चांगला पाऊस असणार आहे. हवामान विभागाचे महासंचालक डॉ.एम.मोहोपात्रा यांनी जुलै महिन्याचा पावसाच्या अंदाजासंदर्भात माहिती दिली.

काय म्हणाले मोहोपात्रा

जून महिन्यात सरासरीचा १० टक्के कमी पाऊस नोंदवला गेला आहे. परंतु जुलै महिन्यात देशात सर्वत्र दमदार पाऊस असणार आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ.एम.मोहोपात्रा यांनी दिली. जुलै महिन्यात महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, केरळ, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, झारखंड या राज्यात चांगला पाऊस होणार आहे. यंदा बिपरजॉय चक्रीवादळामुळे पाऊस उशिराने दाखल झाला. २५ जून रोजी महाराष्ट्रात पाऊस आला. त्यानंतर जुलै महिन्यात तामिळनाडू, दक्षिण कर्नाटक, दक्षिण आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, पूर्व उत्तर प्रदेश या भागात पाऊस झाला.

पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट

पुणे हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी अनेक जिल्ह्यांत यलो अन् ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ३ अन् ४ जुलै रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईत गेल्या आठवडाभर चांगला पाऊस झाला आहे.

हे सुद्धा वाचा

2 जुलै आणि 3 जुलैनंतर महाराष्ट्रात सरासरीहून अधिक पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यात चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यासोबतच संपूर्ण देशात जुलै महिन्यात सामान्य पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार सरासरीच्या 94 ते 106 टक्के पावसाचं भाकित करण्यात आले आहे. जुलै महिन्यात चांगला पाऊस होणार असल्यामुळे शेतकरी समाधानी होणार आहे. तसेच या महिन्यात राज्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा निर्माण होण्याची शक्यता आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.