कसबापेठ, चिंचवड बिनविरोध होणार की नाही?, कोण कोण घेणार माघार?, आज शेवटचा दिवस; दुपारी 3 वाजता चित्र होणार स्पष्ट

कसबापेठमधून हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे यांनी अर्ज भरला आहे. त्याचा फटका भाजपला बसणार आहे. त्यामुळे दवे उमेदवारी अर्ज मागे घेणार का? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

कसबापेठ, चिंचवड बिनविरोध होणार की नाही?, कोण कोण घेणार माघार?, आज शेवटचा दिवस; दुपारी 3 वाजता चित्र होणार स्पष्ट
bjpImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 10, 2023 | 8:31 AM

पुणे: कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. आज शेवटच्या दिवशीही ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत. तर ही निवडणूक करण्यावर महाविकास आघाडी ठाम आहे. त्यामुळे कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होणार की नाही? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने इतर कोण कोण उमेदवार अर्ज मागे घेणार याकडेही राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. आज दुपारी 3 वाजता याबाबतचं चित्रं स्पष्ट होणार आहे.

चिंचवडमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे. राहुल कलाटे यांनी विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरला आहे. तसेच काही झालं तरी मी माघार घेणार नाही. जनभावनेचा मी अनादर करणार नाही, असं राहुल कलाटे यांनी म्हटलं आहे. तर कलाटे यांनी उमेदवारी मागे घ्यावी म्हणून ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर आज पुण्यात जाऊन कलाटे यांची भेट घेणार आहे.

हे सुद्धा वाचा

तसेच यावेळी ते कलाटे यांची माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दुरध्वनीवरून बोलणंही करून देणार आहेत. त्यामुळे कलाटे उद्धव ठाकरे यांचा शब्द माणून माघार घेतात का? उद्धव ठाकरे यांना कलाटे यांची समजूत काढण्यात यश येणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

जगताप विरुद्ध काटे

चिंचवडमध्ये भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप या निवडणूक लढवत आहेत. तर राष्ट्रवादीकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नाना काटे हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असणारा आहे.

शेळकेंकडे जबाबदारी

दरम्यान, राष्ट्रवादीने चिंचवडच्या प्रचाराची जबाबदारी सुनील शेळके यांच्याकडे देण्यता आली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचा विजय व्हावा म्हणून स्वत: विरोधी पक्षनेते अजित पवार लक्ष घालत आहेत. या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांनी 15 तास काम करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. आज परिस्थिती वेगळी आज राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आहेत. संभाजी ब्रिगेडच्या उमेदवाराबद्दल उद्धव ठाकरे बोलणार आहेत, मतांची विभागणी होणार नाही याची काळजी घ्या, अशा सूचना अजित पवार यांनी केल्या आहेत.

कसब्यात रासने विरुद्ध धंगेकर

कसब्यात भाजपचे हेमंत रासने विरुद्ध काँग्रेसचे रवींद्र धंगेकर अशी लढत होणार आहे. कसबा पोटनिवडणुकीत भाजपने दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांना तिकीट नाकारले. त्यामुळे भाजपमध्ये नाराजी आहे. त्याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आनंद दवे, संभाजी ब्रिगेडचे काय होणार?

कसबापेठमधून हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे यांनी अर्ज भरला आहे. त्याचा फटका भाजपला बसणार आहे. त्यामुळे दवे उमेदवारी अर्ज मागे घेणार का? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. तर कसब्यातून संभाजी ब्रिगेडचे अविनशा मोहिते लढत आहेत. चिंचवडमध्येही संभाजी ब्रिगेडने उमदेवार दिला आहे.

या दोन्ही मतदारसंघात संभाजी ब्रिगेडने प्रचारही सुरू केला आहे. मात्र, संभाजी ब्रिगेड हा ठाकरे गटाचा मित्र पक्ष असल्याने त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा म्हणून उद्धव ठाकरे मध्यस्थी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या या प्रयत्नांना यश येते का हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.

बिनविरोध नाहीच

कसबापेठ आणि चिंचवडची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी फोनवरून चर्चा केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही विरोधी पक्षाला वारंवार आवाहन केलं. मात्र, विरोधकांनी हे आवाहन फेटाळून लावलं आहे.

नांदेड आणि पंढरपूरची पोटनिवडणूक झाली. तशीच कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक होईल, असं विरोधकांनी म्हटलं आहे. त्यामुळे या दोन्ही पोटनिवडणुका होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.