Monsoon Update : देशभरात मान्सून कधी पसरणार, IMD कडून आले महत्वाचे अपडेट

Monsoon and weather Update : भारतीय हवामान विभागाने मान्सून संदर्भात अपडेट माहिती दिली आहे. देशभरात आणि राज्यात मान्सून कधी पसरणार आहे, याची माहिती देण्यात आली आहे. राज्यभरात कधीपासून पाऊस येईल, हे ही सांगितले आहे.

Monsoon Update : देशभरात मान्सून कधी पसरणार, IMD कडून आले महत्वाचे अपडेट
Monsoon Update
Follow us
| Updated on: May 26, 2023 | 9:03 AM

पुणे : मे महिन्याचा शेवटचा आठवडा सुरु झाला आहे. शुक्रवारी राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस झाला. हा पाऊस म्हणजे वाळवाच्या पावसाला सुरुवात झाल्याचे म्हटले जात आहे. वळवाचा पाऊस मान्सून दाखल होण्यापूर्वी आलेला असतो. यामुळे मान्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. आता भारतीय हवामान विभागाने मान्सून देशभरात कधी पसरणार आहे, याची माहितीच जारी केली आहे. राज्यात १६ जूनपर्यंत मान्सून सर्वत्र दाखल होणार आहे. राज्यात आधी कोकणापासून मान्सूनला सुरुवात होत असते.

सध्या कुठे आहे मान्सून

सध्या मान्सूनचे वारेही कमकुवत राहण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पोर्ट ब्लेअरपासून 425 किमी अंतरावर असलेल्या नानकोवरी बेटावर मान्सून अडकला आहे. त्यामुळे मान्सून चार ते पाच दिवसांच्या विलंबाने देशात पोहोचू शकतो. केरळमध्ये साधारणपणे १ जून रोजी मान्सून दाखल होतो, परंतु यंदा तो ५ जून दरम्यान दाखल होऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

चक्रीवादळातून ओलावा

अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळातून ओलावा येत आहे. त्यामुळे अनेक भागात पाऊस पडत आहे. 23 मे पासून वेस्टर्न डिस्टर्बन्स देखील सक्रिय आहे. ही व्यवस्था मे महिन्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. यामुळे मे महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू होऊनही बुधवारी उत्तर भारतातील कोणत्याही राज्यात उष्णतेची लाट नव्हती.

कधीपर्यंत सर्वत्र पसरणार

हवामान विभागाने मान्सूनचा चार आठवड्यांचा अंदाज जारी केला आहे. त्यानुसार देशात काही भागात २६ मे पासून मान्सूनची प्रगती दाखवली आहे. राज्यात ९ जूनपासून मान्सून दाखल होणार असून १५ जूनपर्यंत सर्वत्र पसरणार आहे.

मुंबईसह राज्यात मान्सूनपूर्व पाऊस

शुक्रवारी मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी मान्सूपूर्व पाऊस झाला. मुंबईत सकाळी पाच वाजता अनेक भागांत पाऊस पडला. मुंबई उपनगरातील कांदिवली, मालाड, गोरेगाव आणि बोरिवलीच्या काही भागात पाऊस पडत आहे. पावसाच्या हलक्या सरी पडल्याने नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला असून, त्यामुळे आर्द्रताही वाढली आहे. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाऊस झाला.

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.