अशिक्षितच नव्हे तर डॉक्टर, इंजिनिअर ISISकडे का होताय आकर्षित, राज्यात स्लीपर सेल झाली का तयार?
Pune Crime News : पुणे शहरात एमडी ॲनेस्थेशिया असलेल्या डॉक्टर अदनान अली सरकार याला अटक केली गेली. त्यानंतर उच्चशिक्षित युवक ISISकडे का आकर्षित होत आहेत, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
पुणे | 29 जुलै 2023 : पुणे शहरात राष्ट्रीय तपास संस्थेने गुरुवारी छापा टाकला. या छाप्यात डॉ.अदनान अली सरकार याला अटक केली आहे. ISIS प्रेमी डॉक्टर अदनान अली सरकार याच्या अटकेनंतर उच्च शिक्षित लोक दहशतवादी संघटनांकडे का आकर्षित होत आहे?, हा प्रश्न निर्माण झाला आहे. डॉक्टर सरकार सोशल मीडियाच्या माध्यमातून युवकांना दहशतवादाकडे आकर्षित करत होता. त्यासाठी प्रक्षोभक व्हिडिओ तयार करत होता. इसिसचे मॅगझिनमध्ये लेख लिहित होता. इसिसच्या ‘Voice of Hind’ या मासिकात त्याचे अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत.
उच्चशिक्षित आंतकवादाकडे का जाताय
अनेकवेळा दहशवादाकडे आकर्षित होणारे युवक गरीब किंवा अशिक्षित असल्याचे म्हटले जाते. परंतु अदनान सरकार ना गरीब होता, न अशिक्षित. तो खूपच प्रसिद्ध डॉक्टर होता. त्याने 2001 मध्ये पुण्यातून बीजे शासकीय महाविद्यालयातून MBBS केले. त्यानंतर 2006 मध्ये याच कॉलेजमधून ॲनेस्थेशिया केले. त्याला इंग्रजीसह हिंदी, मराठी, जर्मन भाषेचे चांगले ज्ञान होते. तब्बल 16 वर्षांचा अनुभव त्याला या क्षेत्रातील होता. पुण्यातील अनेक प्रसिद्ध रुग्णालयात तो सेवा देत होता. मग असा व्यक्ती ISIS सोबत आला कसा? असेही म्हणता येणार नाही की तो अशिक्षित असल्यामुळे धर्माचा नावावर त्याला भडकवण्यात आले.
अहमद मुर्तजा आयआयटी इंजिनिअर
अहमद मुर्तजा याला 3 एप्रिल रोजी अटक केली गेली. गोरखपूरमधील गोरखनाथ मंदिरात हल्ला करण्याचा प्रयत्नात उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याला जेरबंद केले. मुर्तजा हा आयआयटी मुंबईमधून केमिकल इंजिनिअर झाला होता. अनेक मोठ्या कंपन्यांसोबत त्याने काम केले होते. परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून तो ISIS च्या संपर्कात आला. इसिसच्या विचाराने प्रभावित होऊन तो दशतवादी झाला. त्याला देशाविरुद्ध युद्ध पुकारल्याचा आरोपाखाली फाशीची शिक्षा जाहीर झाली आहे.
मोहम्मद सिराजुद्दीन
फेब्रवारी महिन्यात NIA च्या विशेष न्यायालयाने मोहम्मद सिराजुद्दीन याला सात वर्षांची शिक्षा दिली. देशाविरुद्ध युद्ध पुकारल्याचा आरोपाखाली त्याला अटक झाली होती. सिराजुद्दीन हा सामान्य व्यक्ती नव्हता. तो इंडियन ऑयल कॉरपोरेशनमध्ये सीनियर मार्केटिंग मॅनेजर होता. सिराजुद्दीन ISIS साठी दहशतवाद्यांची भर्ती करत होता. त्यासाठी सोशल मीडियाचा वापर तो करत होता.
देशात इसिसची एन्ट्री अन् स्लीपर सेल
देशात ISIS ची एन्ट्री 2014 मध्ये झाली. त्यावेळी अनेकांना वाटत होते इसिस भारतात मजबूत होऊ शकणार नाही. परंतु गेल्या काही वर्षांत परिस्थिती बदलली आहे. ISIS केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाना, महाराष्ट्र, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आणि जम्मू-कश्मीरमध्ये चांगली सक्रिय आहे. त्याची स्लीपर सेलसुद्धा कार्यरत आहे.