झोपेत असलेल्या पतीवर पत्नीने उकळते पाणी टाकले, कारण वाचून बसेल धक्का

Pune Crime News : पुणे शहरात धक्कादायक घटना घडली आहे. झोपेत असलेल्या पतीवर पत्नीने उकळते पाणी टाकले. या पत्नीस पतीवर कशामुळे राग आला, त्याचे कारण वाचून बसेल धक्का...

झोपेत असलेल्या पतीवर पत्नीने उकळते पाणी टाकले, कारण वाचून बसेल धक्का
Follow us
| Updated on: Jul 14, 2023 | 10:02 AM

योगेश बोरसे, पुणे, दिनांक 14 जुलै 2023 : पती, पत्नीचे नाते सात जन्माचे असते, असे म्हटले जाते. परंतु त्यांच्यामध्ये नोकझोक होत राहते. भांडणे होत राहतात. अन् पुन्हा दुसऱ्या दिवशी नव्याने संसाराचा गाडा ते सुरु करतात. परंतु पुणे शहरात वेगळीच घटना घडली. पत्नीने पतीवर उकळते पाणी टाकले आहे? एका क्षुल्लक कारणावरुन पतीने पत्नीवर उकळते पाणी टाकले आहे. या घटनेत पती गंभीर जखमी झाला. या प्रकरणाची तक्रार पोलीस ठाण्यात गेली. मग पोलिसांनी पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील या पत्नीला कशामुळे हा संताप आला…

काय घडली घटना

पुण्यातील वारजे भागात धक्कादायक घटना घडली. महादेव जाधव (वय ३०, रा. काजल हाइट्स, शिवणे) हे त्यांच्या पत्नीसह राहतात. त्यांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. माधव जाधव नेहमीप्रमाणे झोपले होते. पहाटे ३.३० वाजता त्यांच्या पत्नीने त्यांच्या अंगावर उकळते पाणी टाकले. त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शिवणे परिसरात घडली. या घटनेत महादेव जाधव गंभीररीत्या भाजला आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहे कारण

महादेव जाधव यांनी त्यांच्या पत्नीच्या भावाला २ लाख ४० हजार रुपये उधार दिले होते. पत्नीच्या भावाला दिलेले हे पैसे ते सतत मागत होते. त्यावरुन दोन्ही पती, पत्नीमध्ये भांडणही होत होते. त्यामुळे रागाच्या भरात पत्नीने पहाटे साडेतीन वाजता महादेव जाधव झोपले असताना त्यांच्यावर उकळलेले पाणी टाकले. त्यात ते ५० टक्के भाजले गेले. याबाबत महादेव जाधव यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यावरून वारजे पोलिस ठाण्यात पत्नीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.