Pune crime : धार्मिक विधीच्या नावाखाली महिलेला कपडे काढण्यास भाग पाडत केला बलात्कार; भोंदुबाबाला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

महिला जानेवारी 2021मध्ये प्रथम आरोपीच्या संपर्कात आली. जादूने नकारात्मक शक्तींचा प्रभाव काढून टाकण्याच्या बहाण्याने भोंदुबाबा धनंजय गोहाड (60) तिच्या घरी आला. तिला कपडे काढण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला.

Pune crime : धार्मिक विधीच्या नावाखाली महिलेला कपडे काढण्यास भाग पाडत केला बलात्कार; भोंदुबाबाला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या
बलात्कार प्रकरणImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 31, 2022 | 11:05 AM

पुणे : धार्मिक विधी करण्याच्या नावाखाली महिलेचा बलात्कार (Raped) करणाऱ्या भोंदुबाबाला पोलिसांनी हिसका दाखवला आहे. एक महिला आपल्या मुलाचे शारीरिक अपंगत्व दूर करण्यासाठी आणि कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी विविध विधी करण्यासाठी एका बाबाकडे गेली होती. मात्र, त्या बाबाने महिलेच्या असहायतेचा गैरफायदा घेत तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी पुणे शहर पोलिसांनी (Pune city police) 60 वर्षीय स्वयंघोषित धर्मगुरूला अटक केली आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात 36 वर्षीय तरुणाने एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलमांसह बलात्कार, प्राणघातक हल्ला, गुन्हेगारी, विश्वासाचा भंग आणि फसवणूक यासह महाराष्ट्र प्रतिबंध आणि मानवी बलिदान निर्मूलन आणि इतर अमानुष, वाईट आणि अघोरी प्रथा तसेच काळ्या जादूच्या कायद्यातील (2013) तरतुदींच्या अन्वये आरोपीला अटक (Arrest) केली आहे.

कपडे काढण्यास भाग पाडले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला जानेवारी 2021मध्ये प्रथम आरोपीच्या संपर्कात आली. जादूने नकारात्मक शक्तींचा प्रभाव काढून टाकण्याच्या बहाण्याने भोंदुबाबा धनंजय गोहाड (60) तिच्या घरी आला. तिला कपडे काढण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि महिलेला सांगितले, की तिचा नवरा आणि भावाचा अपघातात मृत्यू होईल. तिने या घटनेबद्दल शांत न राहिल्यास तिचे दुसरे मूल अपंगत्वाने जन्माला येईल. या सर्व प्रकारानंतर ही महिला घाबरली मात्र तिने स्वत:ला सावरत त्यानंतर आपल्या भावाला हा प्रकार सांगितला आणि हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनीही सहकार्य करत त्वरीत कारवाई केली आहे.

हे सुद्धा वाचा

भोंदुबाबाच्या महिला साथीदाराचाही शोध सुरू

हडपसर पोलीस ठाण्याचे निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे म्हणाले, की गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन, पीडितेने पोलीस स्टेशन गाठल्यानंतर लगेचच प्रथम माहिती अहवाल नोंदविण्यात आला. आरोपीला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अटक केलेल्या धनंजय गोहाड (60) उर्फ नानाच्या 35 वर्षीय महिला साथीदाराचाही शोध पोलिसांनी सुरू केला आहे.

शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.