पुणे – पिसोळी परिसरातील दगडे वस्तीतील लाकडी फर्निचरच्या गोदामाला आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास आग लागली. गोदामात संपूर्णपणे फर्निचरनं भरलेलं असलयानं काही मिनिटांतच आगीनं रौद्ररूप धारण केलं. आगीच्या घटनेची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आली. माहिती मिळताच पुणे व पीएमआरडीएच्या अग्निशामक दलाच्या एकूण 14 गाड्या घटनास्थळावर दाखल होत, आग विझवण्याचे काम सुरु केलं.
आगीची तीव्रता इतकी होती की, पुढे जाऊन पाण्याचा मारा करणं जवानांना शक्य होत नव्हतं. अग्निशमन दलाचे जवान हे तब्बल तीन तास आगीची झुंजत होते. त्यानंतर सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आलं. तोपर्यंत संपूर्ण गोदामात आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होतं. आगीवर नियंत्रणा मिळवले असलेतरी कुलींगचं काम अद्याप सुरु असू आहे.
सुमारे 24 हजार स्क्वेअर फुट असलेल्या या गोदामात फर्निचरचे सर्व लाकडी सामान होतं. गोदाम मालकाने हे गोदाम भाड्यानं दिलं होतं. रात्रीची वेळ असल्यानं गोदामात कुणीही नव्हतं. गोदामाजवळच मालक राहता असल्यानं आग लागल्याची घटना तात्काळ त्यांच्या लक्षात आली. या घटनेत कोणत्याही प्रकाराची जीवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशामक दलांच्या जवानांनी दिली आहे. मात्र आग लागण्याचं नेमक कारण अद्यापही समोर आलेलं नाही.