Pune crime : प्रेमवीरानं घेतला प्रेयसीच्या गालाचा चावा, आता खातोय जेलची हवा!

प्रेमप्रकरणानंतर ब्रेकअप झाले. त्यानंतर प्रियकराने प्रेयसीला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. त्याने प्रेयसीच्या गालाचा चावा (Biting) घेतला. आता या चावणाऱ्या प्रियकरावर गुन्हा दाखल झाला आहे.

Pune crime : प्रेमवीरानं घेतला प्रेयसीच्या गालाचा चावा, आता खातोय जेलची हवा!
गुन्हा (प्रातिनिधिक छायाचित्र)
Follow us
| Updated on: Apr 05, 2022 | 3:26 PM

उंड्री : हल्ली प्रेमप्रकरणे आणि त्यामुळे घडणारे गुन्हे यात फारच वाढ झाली आहे. नुकतीच इंजिनिअर तरुणाने प्रेम प्रकरणातून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली. निखिल दत्तात्रय चांडोले असे त्या तरुणाचे नाव. तो निखिल मूळ सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील (Pandharpur) रहिवासी होता. आता एक धक्कादायक प्रकार पुण्यातून समोर आला आहे. प्रेमप्रकरणानंतर ब्रेकअप झाले. त्यानंतर प्रियकराने प्रेयसीला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. त्याने प्रेयसीच्या गालाचा चावा (Biting) घेतला. आता या चावणाऱ्या प्रियकरावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार उंड्री परिसरात 31 मार्च रोजी घडला आहे. दानीश नायर (वय 22 रा. ससाणेनगर, हडपसर) असे गुन्हा दाखल झालेल्या प्रियकर तरुणाचे नाव आहे. याबाबत 21 वर्षाच्या तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

लाथाबुक्क्यांनी मारहाण करून केली शिवीगाळ

पोलिसांनी सांगितले, की फिर्यादी व आरोपी यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. मात्र आता त्यांचे ब्रेकअप झाले आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू आहेत. 31 मार्च रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास पुन्हा त्यांच्यात वाद झाला. यावेळी आरोपीने फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच तिला पाहून घेण्याची धमकी देऊन लज्जा निर्माण होईल, असे वर्तन केले.

कोंढवा पोलिसांकडून तपास

तरूण एवढ्यावरच थांबला नाही, तर त्या तरुणाने फिर्यादी तरुणीच्या गालाचा चावा घेऊन विनयभंगदेखील केला. फिर्यादीत तरुणीने हे सर्व नमूद केले आहे. आता पुढचा तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.

आणखी वाचा :

Pune crime : कोंबडीचोर अटकेत; चिकनचे भाव वाढल्यानं शस्त्रांचा धाक दाखवून पळवले होते ट्रक

Pimpri Chinchwad crime : ब्रॅण्डेड कंपनीचे बनावट लेबल लावून जीन्सची विक्री, पिंपरीतून एकाला अटक

Pune crime : बनावट नावे वापरून करत होते व्यापाऱ्यांची फसवणूक, वाकड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.