Pune : बायको नांदायला येत नाही, म्हणून चक्क टॉवरवर चढला युवक, पुण्याच्या जुन्नरमधला प्रकार; अखेर…
ती-पत्नीमध्ये होत असलेल्या वादामुळे त्याची पत्नी जुन्नर तालुक्यातील गोद्रे येथे माहेरी राहण्यासाठी आली होती. केशव तिला घरी घेऊन जाण्यासाठी आला, त्यावेळी पत्नीने त्याच्यासोबत येण्यास नकार दिला. त्यामुळे तरूण थेट टॉवरवरच चढला. त्यानंतर पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.
पुणे : बायको नांदायला येत नाही, म्हणून एक युवक चक्क टॉवरवर (Tower) चढल्याचा प्रकार घडला आहे. पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील गोद्रे येथे माहेरी आलेल्या पत्नीने सासरी येण्यास नकार दिल्याने पती केशव काळे, या युवकाने थेट उंच टॉवरवर चढून आंदोलन केले. बायको नांदायला येत नसल्याने त्याने वेगळीच शक्कल लढवून या आपली मागणी पूर्ण करण्यासाठी पिंपळगाव सिद्धनाथ येथील पेट्रोल पंपासमोर (Petrol Pump) असणाऱ्या हाय व्होल्टेज टॉवरवर चढून बसला. आई-वडिलांकडे राहण्यास आलेली बायको नांदायला येत नाही, यासाठी टॉवरवर चढून जोपर्यंत पत्नीला आणणार नाही, तोपर्यंत खाली उतरणार नसल्याचे त्याने यावेळी उपस्थित ग्रामस्थांना सांगितले. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. अखेर पोलीस उपनिरीक्षक (Sub inspector) त्याच्या पत्नीला समोर आणून समझोता करण्याचे आवाहन केल्यानंतर सदर तरूण दीड तासानंतर टॉवरवरून खाली आला.
पत्नीने येण्यास दिला नकार, अन्…
याबाबत अधिक माहिती अशी, की जुन्नर तालुक्यातील गोद्रे येथील तरुणीसोबत केशव याचा डिसेंबर 2021मध्ये विवाह झाला होता. संगमनेर तालुक्यातील कुरकुंडी घारगाव येथे हा विवाह संपन्न झाला होता. पती-पत्नीमध्ये होत असलेल्या वादामुळे त्याची पत्नी जुन्नर तालुक्यातील गोद्रे येथे माहेरी राहण्यासाठी आली होती. केशव तिला घरी घेऊन जाण्यासाठी आला, त्यावेळी पत्नीने त्याच्यासोबत येण्यास नकार दिला. त्यामुळे तरूण थेट टॉवरवरच चढला. त्यानंतर पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.
लढवली शक्कल
अलदरेचे पोलीस पाटील खंडागळे सुमित यांनी याबाबत पोलिसांना कळवले. बायको नांदायला येत नसल्याने त्याने वेगळी शक्कल लढवून या आपली मागणी पूर्ण करण्यासाठी पिंपळगाव सिद्धनाथ येथील पेट्रोल पंपासमोर असणारा हाय व्होल्टेज टॉवरवर बसला. त्याने यापूर्वी गोंद्रेच्या डोंगरावर चढून खाली उडी मारण्याची धमकी दिली होती. त्याच्याविरोधात आम्ही तक्रार अर्ज दिला असल्याचे केशव याच्या सासू सासऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान, सुदैवाने टॉवरवर चढल्यानंतर त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. गावकऱ्यांमध्ये मात्र या घटनेची चर्चा सुरू होती.