Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील यांच्या भाषणानंतर भर मंचावर तरुणाचा गोंधळ, अचानक खळबळ

मनोज जरांगे पाटील यांचं राजगुरुनगर येथे भाषण संपल्यानंतर एक तरुण मंचावर आला. त्याने मनोज जरांगे यांच्यासमोर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी इतरांनी सर्व प्रसारमाध्यमांवर लाईव्ह प्रक्षेपण सुरु आहे, याची जाणीव करुन दिली. पण तरुण ऐकूण घेण्याच्या मनस्थितीत नव्हता.

Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील यांच्या भाषणानंतर भर मंचावर तरुणाचा गोंधळ, अचानक खळबळ
Follow us
| Updated on: Oct 20, 2023 | 3:35 PM

प्रदीप कापसे, Tv9 मराठी, पुणे | 20 ऑक्टोबर 2023 : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची आज राजगुरुनगरमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत मनोज जरांगे पाटील यांनी धडाकेबाज भाषण केलं. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही, असं मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले. मराठा समाजाच्या एका 45 वर्षीय व्यक्तीने मुंबईत स्वत:ला संपवलं. या मृत्यूला सरकार जबाबदार असल्याचं जरांगे पाटील म्हणाले. आपल्याला शांततेने हा लढा लढायचा आहे, असं मनोज जरांगे यावेळी म्हणाले. मनोज जरांगे यांच्या भाषणानंतर कार्यक्रमात मराठा समाजासाठी आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या कार्यकर्त्यांसाठी श्रद्धांजली अर्पण केली जात होती. यावेळी भर मंचावर एका तरुणाने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

मनोज जरांगे पाटील यांचं भाषण संपल्यानंतर एक तरुण मंचावर आला. त्याच्या हातात माईक होता. तो काहीतरी बोलू पाहत होता. तो आक्रोशात बोलण्याच्या तयारीत होता. पण माईक बंद असल्याने त्याचा आवाज समोर पोहोचू शकला नाही. यावेळी मंचावर चांगलाच गोंधळ उडालेला बघायला मिळाला. मनोज जरांगे पाटील यांनी या तरुणाला थांबवण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलीस आणि इतर कार्यकर्त्यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो शांत झाला.

तरुण पुन्हा आक्रमक, नेमकं काय घडलं?

श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्वजण उभे राहिले. यावेळी पुन्हा हा तरुण आक्रमक झाला. तो मंचावरच उभा होता. तो आधी शांत झाल्याने काही करणार नाही, असं इतरांना वाटलं. पण त्याने पुन्हा गोंधळ घालायला सुरुवात केली. यावेळी मनोज जरांगे पाटील हे देखील त्याची समजूत काढत होते. अखेर पोलीस आणि कार्यकर्त्यांनी त्याला उचलून मंचाच्या खाली नेलं. मंचावर नेमका काय गोंधळ सुरु होता? याबाबत अनेकांच्या मनात शंका निर्माण झाली. पण अखेर नेमकं काय घडलं त्याची माहिती आता समोर आलीय.

मंचावर आलेला तरुण हा मराठा आरक्षणासाठी आग्रही होता. मला बोलू द्या नाहीतर मी स्वत:ला संपवेन, असं तो मंचावर बोलत होता. यावेळी मनोज जरांगे यांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण तो समजून घेण्याचा मनस्थितीतच नव्हता. अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. त्याला खेड पोलीस चौकीत नेण्यात आलं. पोलीस त्याची समजूत काढत आहेत, अशी माहिती समोर आलीय.

महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला.
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्..
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्...
दारूण पराभवानंतर 'मविआ'चं भविष्य काय? एकत्र राहणार की दुभंगणार?
दारूण पराभवानंतर 'मविआ'चं भविष्य काय? एकत्र राहणार की दुभंगणार?.
राज ठाकरेंच्या हातून 'रेल्वे इंजिन' जाणार? पक्षाची मान्यता धोक्यात?
राज ठाकरेंच्या हातून 'रेल्वे इंजिन' जाणार? पक्षाची मान्यता धोक्यात?.
मंत्रिपदासाठी लॉबिंग, भाजपसह शिंदे अन् दादांच्या वाट्याला किती पदं?
मंत्रिपदासाठी लॉबिंग, भाजपसह शिंदे अन् दादांच्या वाट्याला किती पदं?.
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.