Youth Congress Protest : सोनिया गांधींवरच्या ईडीचौकशीविरोधात युवक काँग्रेस आक्रमक, पुणे-लोणावळा लोकल अडवली

काँगेसच्या नेत्या सोनिया गांधी त्याचबरोबर खासदार राहुल गांधी यांना ईडीकडून त्रास दिला जात आहे. ईडीचा गैरवापर होत आहे, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

Youth Congress Protest : सोनिया गांधींवरच्या ईडीचौकशीविरोधात युवक काँग्रेस आक्रमक, पुणे-लोणावळा लोकल अडवली
सोनिया गांधींच्या ईडीचौकशीविरोधात युवक काँग्रेसचं पुण्यात आंदोलनImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 27, 2022 | 7:02 PM

पुणे : पुण्यात युवक काँग्रेसच्यावतीने (Youth Congress) आज रेल रोको आंदोलन करण्यात आले. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची सध्या ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्याविरोधात युवक काँग्रेस राज्यभर आक्रमक झाली आहे. राज्यात विविध ठिकाणी आंदोलने करण्यात आली. पुण्यातही युवक काँग्रेसने (Maharashtra Youth Congress) आंदोलन केले. पुण्यात सध्या पाऊस सुरू आहे. अशाच भर पावसात हे आंदोलन करण्यात आले. युवक काँग्रेसने रेल रोको आंदोलन केले. यावेळी पुणे लोणावळा लोकल अडवून धरण्यात आली. युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल शिरसाट यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात युवक कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. पुणे-लोणावळा लोकलसमोर, लोकल (Pune lonavala local) अडवून कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात भर पावसात घोषणा दिल्या.

राहुल शिरसाट यांच्या नेतृत्वात आंदोलन

काँगेसच्या नेत्या सोनिया गांधी त्याचबरोबर खासदार राहुल गांधी यांना ईडीकडून त्रास दिला जात आहे. ईडीचा गैरवापर होत आहे, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. सोनिया गांधींची प्रकृती ठीक नाही. अशा परिस्थितीतही त्यांची चौकशी केली जात आहे. यावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. राज्यभरच नव्हे तर देशात विविध ठिकाणी काँग्रेस आक्रमक झाली आहे. पुण्यात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल शिरसाट यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. पुण्यात हे आंदोलन असताना नागपुरातील युवक कार्यकर्तेही आक्रमक झाले होते. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकडही केली. ईडीच्या कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले होते.

हे सुद्धा वाचा

काँग्रेस नेत्यांचे इशारे

सोनिया गांधींना का त्रास देत आहात? काय कारण आहे? हे आता कोणी खपून घेणार नाही. सोनिया गांधींना हात लावला तर देशात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा इशारा काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी दिला आहे. आमच्या नेत्याला हात लावला तर आम्ही शांत बसणार नाही, असे त्या म्हणाल्या. काँग्रेसच्या या आक्रमक पवित्र्यामुळे पुढे काय कारवाई होणार, हे पाहावे लागणार आहे.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.