Pune Bullock cart race : घोडीचा पाय घसरला अन्… पुण्याच्या लोणीकंदमधल्या बैलगाडा शर्यतीत थोडक्यात बचावला तरूण, पाहा Video

बैलगाड्यांसमोर धावणाऱ्या घोडीचा धावताना पाय घसरला. ही घोडी घाटात कोसळली. या वेळी या घोडीवरील तरूणही खाली पडला. सुदैवाने या तरुणाने वेळीच प्रसंगावधान दाखवले आणि लगेच बाजूला गेला. त्यामुळे हा तरूण थोडक्यात बचावला आहे.

Pune Bullock cart race : घोडीचा पाय घसरला अन्... पुण्याच्या लोणीकंदमधल्या बैलगाडा शर्यतीत थोडक्यात बचावला तरूण, पाहा Video
बैलगाडा शर्यतीदरम्यान घोडीवरून खाली पडला युवकImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 06, 2022 | 1:27 PM

पुणे : बैलगाडा शर्यतीदरम्यान (Bullock cart racing) एक वेगळाच थरार पाहायला मिळाला. एक तरूण थोडक्यात बचावला आहे. पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील लोणीकंद (Lonikand) येथे भव्य बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती, त्यादरम्यान ही घटना घडली आहे. बैलगाडा घाटात भिर्रर्रर्रचा नाद घुमताच शर्यतीचे बैल गाड्यांसह वाऱ्याच्या वेगाने धावू लागले आणि या बैलगाड्यांसमोर धावणाऱ्या घोडीचा धावताना पाय घसरला. ही घोडी घाटात कोसळली. या वेळी या घोडीवरील तरूणही खाली पडला. सुदैवाने या तरुणाने वेळीच प्रसंगावधान दाखवले आणि लगेच बाजूला गेला. त्यामुळे हा तरूण थोडक्यात बचावला आहे. अंगावर काटा आणणारा हा संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद (Capture in camera) झाला आहे. लोणीकंद याठिकाणच्या या बैलगाडा शर्यतीत मोठ्या प्रमाणावर बैलगाडा मालक सहभागी झाले होते.

भव्य स्पर्धा आणि बक्षीसे…

नारायण आव्हाळे पाटील युवा मंच आव्हाळवाडी यांच्यातर्फे ही बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली आहे. हवेली तालुक्यातील लोणीकंद याठिकाणी ही स्पर्धा होत असून 5 मेला सुरू झालेली ही स्पर्धा 8 मेपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेत जवळपास 27 लाख 27 हजार 727 रुपयांची बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. यात 1 लाख 51 हजारांचे पहिले, 1 लाखांचे दुसरे तर 75 हजार रुपयांचे तिसरे बक्षीस आहे. यासोबतच चांदीची गदा, मोटारसायकल यांसह विविध बक्षीसे ठेवण्यात आलीत. न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना परवानगी दिल्यानंतर शैतकरी उत्साहात दिसत आहेत. याठिकाणी झालेली गर्दी पाहून हेच दिसत आहे.

शेतकरी उत्साही

या बैलगाडा शर्यतीच्या निमित्ताने जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून बैलगाडा मालक आपल्या बैलजोडीसह याठिकाणी आले आहेत. पाच ते आठ मेदरम्यान ही स्पर्धा होत असून बक्षीस पटकावण्याची स्पर्धा लागली आहे. दरम्यान, शर्यतीदरम्यान घोडीवरून तरूण पडल्याने सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. काही क्षणाचा विलंब झाला असता तर तरुणाच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. त्यामुळे असे प्रकार होणार नाहीत, याकडे आयोजकांनी लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.