काँग्रेसच्या पाठीत तुम्ही खुपसलेला खंजीर विसरलात का? सुप्रियाताई इतिहास जागृत करा, विखे-पाटलांचा खोचक टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील जनतेला सुपरस्प्रेडर संबोधत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करतानाच तुम्ही राज्या राज्यांत भांडणे का लावत आहात? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केला. त्यावर आता भाजप नेते पलटवार करत आहेत. भाजप आमदरा राधाकृष्ण विखे-पाटलांनी यावरूनच सुप्रीय सुळेंना काँग्रेसच्या पाठीत तुम्ही खुपसलेला खंजीर विसारलात का? असा खोचक सवाल विचारला आहे.

काँग्रेसच्या पाठीत तुम्ही खुपसलेला खंजीर विसरलात का? सुप्रियाताई इतिहास जागृत करा, विखे-पाटलांचा खोचक टोला
radhakrishna vikhe-patil
Follow us
| Updated on: Feb 08, 2022 | 4:57 PM

काँग्रेसने (congress) कोरोनाच्या काळात मुंबईत यूपी आणि बिहारींना पैसे देऊन घरी जायला सांगितलं. तुमच्या राज्यात जाऊन कोरोना पसरवा असं काँग्रेसने सांगितलं, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी काल संसदेत केला होता. त्यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील जनतेला सुपरस्प्रेडर संबोधत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करतानाच तुम्ही राज्या राज्यांत भांडणे का लावत आहात? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केला. त्यावर आता भाजप नेते पलटवार करत आहेत. भाजप आमदरा राधाकृष्ण विखे-पाटलांनी यावरूनच सुप्रीय सुळेंना काँग्रेसच्या पाठीत तुम्ही खुपसलेला खंजीर विसारलात का? असा खोचक सवाल विचारला आहे. शरद पवारांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसल्याची टीकाही याआधी राजकारणात अनेकदा होत आली आहे. तीच जुनी जखम विखे-पाटलांनी पुन्हा उखरून काढली आहे.

विखे पाटलांचं ट्विट काय?

राधाकृष्ण विखे-पाटलांनी एक खोचक ट्विट करत, खा. @supriya_sule यांनी पूर्व इतिहास जागृत करायला हवा…राजीव गांधीमुळे तुम्हाला पक्षात घेऊन मुख्यमंत्रीपद दिले. त्याच काँग्रेस पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही वेगळा पक्ष काढला हे तुम्ही विसरलात का? असा खोचक सवालही त्यांनी केला आहे. तसेच राज्यातील साखर कारखान्यांच्या विक्रीबाबतही त्यांनी बोललं पाहिजे, असे ट्विट केले आहे. त्यामुळे राजकारण आणखी तापलं आहे. काल संसदेत मोदींचं भाषण झाल्यापासून राज्यातल्या नेत्यांचीही जोरदार खडाजंगी सुरू आहे. मोदींनी परप्रांतीय मजुरांबाबत केलेल्या वक्तव्याचा आधी काँग्रेस नेत्यांनी समचार घेतला. त्यानंतर आता सुप्रिया सुळेही आक्रमक झाल्या आहेत.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या?

कोविडच्या काळात लोकांनी एकमेकांना धावून धावून मदत केली. मला कोरोना काळात एक फोटो कुणी तरी पाठवला होता. एक महिला तिच्या मागे बॅग होती. त्यावर मूल झोपलं होतं. वडील बॅग ओढत होते. खाली एक टॅग लाईन होती. तुझसे नाराज नही जिंदगी हैरान हूँ मै, मला पंतप्रधानांना तोच सवाल करायचा आहे. माननीय पंतप्रधानजी तुमसे नाराज नही हूँ. हैरान हूँ मै आपसे. आम्ही सुपर सप्रेड आहोत, असं कसं बोललात. त्यांनी थोडाही शास्त्रीय आरोप केला असता, तरी मी कबूल केला असता. मी केवळ टीका करायची म्हणून टीका करत नाही. मी महाराष्ट्राची कन्या म्हणून त्यांच्याकडे न्याय मागतेय. तुम्ही का म्हणून असा आरोप केला. का तुम्ही राज्या-राज्यात द्वेष पसरवत आहात, ही एक प्रांजळ महिला पंतप्रधानांकडे न्याय मागतेय, अशी उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली. यावर आता भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

प्रधानमंत्रीजी आपसे नाराज नही, हैरान हूँ, तुम्ही आम्हाला सुपर स्प्रेडर का म्हणालात?; सुप्रिया सुळेंचा सवाल

महाराष्ट्राची कन्या म्हणून न्याय मागतेय, तुम्ही राज्याराज्यांत का द्वेष पसरवत आहात? पंतप्रधानांना उद्देशून काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

मजुरांना यूपी, बिहारमध्ये कोणी पाठवले?, गोयल आणि फडणवीसांचे ट्विट दाखवत सुप्रिया सुळेंकडून भाजपचा पर्दाफाश

थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.