‘दिल्लीच्या आंदोलनात शेतकऱ्यांपेक्षा हमाल अधिक, हे सर्व भामटे लोक : रघुनाथदादा पाटील
दिल्लीचे आंदोलन हे शेतकऱ्यांचे आंदोलन नाही. या सर्वांना फसवून आणलेले आहे," असा गंभीर दावा रघुनाथदादा पाटील यांनी केला.
अहमदनगर : दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरियाणा येथील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. यावर बोलताना “दिल्लीचे आंदोलन हे शेतकऱ्यांचे आंदोलन नाही. या सर्वांना फसवून आणलेले आहे,” असा दावा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केला. ते अहमदनगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी “या आंदोलनात जे लोक गोळा झाले आहेत, हे सर्व भामटे लोक आहेत. दिल्लीतील हे आंदोलन म्हणजे दुसरे शाहीनबागच सुरू झाले आहे. यापेक्षा त्याचा दुसरा काही अर्थ नाही,” अशी घणाघाती टीकाही रघुनाथदादा पाटील यांनी केली. (Raghunath Dada Patil criticizes Delhi farmers protest)
या आंदोलनात शेतकऱ्यांपेक्षा हमाल अधिक
केंद सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात देशभरात असंतोषाचं वातावरण आहे. मागील अकरा दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर पंजाब आणि हरियाणा येथील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. त्यांनी दिल्लीच्या सीमा रोखल्या आहेत.केंद्र सरकारने लागू केलेले कायदे हे शेतकरी हिताचे नाहीत. त्यांना तत्काळा वापस घ्या, अशी मागणी या शेतकऱ्यांकडून केली जाता आहे. आप, काँग्रेससारख्या पक्षांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने एकमताने ठराव मंजूर करून राज्यातील काँग्रेस शेतकऱ्यांसोबत असल्याचे सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी मात्र, दिल्लीतील शेतकऱ्यांच्या या आंदोलनला कडाडून विरोध केला आहे. त्यांनी फसवून आणलेल्या शेतकऱ्यांचे हे आंदोलन आहे, असी घणाघी टीका केली आहे. त्या आंदोलनात शेतकऱ्यांपेक्षा आडतीवर काम करणारे, हमाल असे लोक अधिक आहेत, असे रघुनाथदादा यांनी म्हटलंय.
हे शेतकऱ्यांचे आंदोलन नव्हे
दरम्यान, रघुनाथदादा यांनी या आंदोलनाला शेतकऱ्यांचे आंदोलन मानत नसल्याचं सांगितलं आहे. “दिल्लीतील आंदोलनात आडतीवर काम करणारे, हमाल अधिक आहेत. यामुळे हे आंदोलन शेतकऱ्यांचे आंदोलन असेल्याचे मी मानत नाही. यापूर्वी शेतकऱ्यांच्या विरोधात असे काही कायदे झाले आहेत, ज्या कायद्यांबाबत दिल्लीच्या आंदोलनात कुणाही बोलत नाहीत. ज्या कायद्यांपासून शेतकऱ्यांना खरा त्रास आहे; दिल्लीच्या आंदोलनात त्या कायद्यांचा उच्चार करायलासुद्धा कुणी तयार नाही, असा घणाघात रघूनाथदादा यांनी केला.
अमरावतीत शेतकरी आंदोलनावरुन राजकारण तापलं
दरम्यान, राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यासाठी त्यांनी अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथून दिलीकडे दुचाकीद्वारे कूच केलेले आहे. दुचाकीवरुन जाऊन ते दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभाग नोंदवणार आहेत. त्यांच्या याच आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून गुरुकुंज मोझरी येथे भाजपने रविवारी (6 डिसेंबर) आंदोलन केले. हे आंदोलन भाजप जिल्हाध्यक्ष निवेदिता दिघडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. ‘बच्चू कडू यांनी आधी राज्यातील शेतकऱ्यांवर लक्ष द्यावे,’ अशी टीका यावेळी येथील भाजपने केली.
पवारांचा कृषी कायद्यांच्या मूलतत्त्वांना विरोध नाही, काही जण वाहत्या गंगेत हात धुतायत : देवेंद्र फडणवीस#Devendrafadnavis @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra #farmerprotest #ncp #SharadPawar https://t.co/P7pq6n5cQG
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 6, 2020
संबंधित बातम्या :
BREAKING | शरद पवारांनी शड्डू ठोकला, थेट राष्ट्रपतींना भेटणार
Farmer Protest : दिल्लीतली शेतकरी-सरकारमधली बैठक संपली? पुढं काय काय घडणार?
(Raghunath Dada Patil criticizes Delhi farmers protest)