Kunal Kamra : ‘संजय राऊत आज तुम्ही एका लुक्क्याला…’, शिवसेनेच्या युवा नेत्याचा इशारा
Kunal Kamra : "ज्या ज्या लोकांसोबत तीन वर्षात तो कॉन्टॅक्टमध्ये होता, या सर्वांचे डिटेल्स आम्ही खार पोलीसांना येथे देणार आहोत. संजय राऊतसोबत फोटो जो आहे, तो गुलाब देताना आपण पाहिला. हे चुकीचं सर्व काम करत आहेत. सकाळी नऊ वाजता यांचा चेहरा पाहून जनता टीव्ही बंद करते" अशी टीका शिवसेनेच्या या युवा नेत्याने केली.

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. काल रात्री शिवसैनिकांनी खार भागातील एका हॉटेलमध्ये कुणाल कामराचा स्टुडिओ फोडला. आज 11 वाजता त्याला चोपण्याची धमकी दिली आहे. या तोडफोड प्रकरणात शिवसेनेचे युवा नेते पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले. तिथे राहुल कनाल यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “फोनचे रेकॉर्डिंग मुंबई पोलिसांना सोपवले आहेत. आम्ही मुंबईचे रहिवाशी आहोत. कायदा पाळणारे लोक आहोत. मुंबई पोलिसांचा मान ठेवतो. त्यांनी बोलावलं म्हणून इथे आलोय. हा ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे. कोणी आमचे ज्येष्ठ, आमचे दैवत, ज्यांना आम्ही नेता मानतो, त्यांच्याबद्दल आज एक लुक्का बोललाय, उद्या कोणी मोठा माणूस बोलला तर त्याच्या सुद्धा घरी आम्ही जाणार” असं राहुल कनाल म्हणाले.
“फ्रिडम ऑफ स्पीच म्हणजे कोणाच्या घरात घुसून, घरातील ज्येष्ठाचा अपमान करणं, अपशब्द वापरणं म्हणजे फ्रिडम ऑफ स्पीच नाही. टीका ही कंस्ट्रक्टीव्ह असली पाहिजे. मी सुशिक्षित घरातून येतो. फ्रिडम ऑफ स्पीच योग्य ठिकाणी वापरलं पहिजे. कंस्ट्रक्टीव्ह पद्धतीने टीका करा” असं राहुल कनाल म्हणाले. या शो चे रेकॉर्डिंग कधी झालं होतं? या प्रश्नावर राहुल कनाल यांनी, “तेच बघायला तिथे गेलो होतो. तो शो चालू होता. त्या प्रमाणे तिथे पोहोचलो. कायदेशीर प्रक्रियेच पालन करणार” असं ते म्हणाले.
‘शिंदेसाहेबांचे चाहते देशभर’
“मुंबई पोलिसांनी एफआयआर नोंदवावा ही मागणी आहे. शिंदेसाहेबांचे चाहते भारतात आहेत. झिरो एफआयआर नोंदवावा. अशा माणसावर 16 केसेस पेडिंग आहेत. ज्याने या देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल अपशब्द वापरले आहेत. जे लोक आज खुश होत आहेत, त्यांच्या नेत्याबद्दल असं बोलला आहे. मी माझ्या मोठ्यांचा अपमान सहन करु शकत नाही. अशा घरातून मी येत नाही” असं राहुल कनाल म्हणाले.
‘ही काय लुक्केगिरी’
संजय राऊत यांच्याबद्दलही राहुल कनाल बोलले. “संजय राऊत यांनाही आरोपी बनवण्याची माझी मागणी आहे. कुणाल कामराने टि्वट केल्यानंतर 34 मिनिटांनी संजय राऊत यांनी कुणालची कमाल म्हणून लगेच टि्वट केलं. तुमच्या वडिलधाऱ्यांबद्दल कुणालची कमाल असं लिहिल तर चालेल का?. राजकारणाला राजकारणाने, कार्याने उत्तर द्या. ही काय लुक्केगिरी आहे. तुम्ही आज एका लुक्क्याला वापरलय. तुम्ही असं करणार असाल, तर आम्ही शिवसैनिक सक्षम आहोत” असं राहुल कनाल म्हणाले.