12 जूनपर्यंत मुसळधार, 8 ऑगस्ट पर्यंत धरण-तलाव-धबधबे बंद, नियम मोडाल तर कारवाई, रायगड जिल्हा प्रशासन अॅक्शन मोडमध्ये!
रायगड जिल्ह्यांत 12 जूनपर्यंत हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. रायगड सह कोकणाला रेड अलर्ट जारी केल्यानंतर घराबाहेर न पडण्याचं जिल्हा प्रशासनाने आवाहन केलं आहे. एकंदरित पावसाची परिस्थिती पाहता आणि संभाव्य धोका लक्षात घेता 8 ऑगस्ट पर्यंत जिल्ह्यातील धरण, तलाव आणि धबधबे बंद राहणार आहेत. (Raigad heavy Rain update Collector Nidhi Chaudhari Appeal)
रायगड : रायगड जिल्ह्यात 12 जूनपर्यंत हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. रायगडसह कोकणाला रेड अलर्ट जारी केल्यानंतर घराबाहेर न पडण्याचं जिल्हा प्रशासनाने आवाहन केलं आहे. एकंदरित पावसाची परिस्थिती पाहता आणि संभाव्य धोका लक्षात घेता 8 ऑगस्ट पर्यंत जिल्ह्यातील धरण, तलाव आणि धबधबे पर्यटकांसाठी बंद राहणार आहेत. (Raigad heavy Rain update Collector Nidhi Chaudhari Appeal)
दोन दिवसांच्या मुसळधार पावसानंतर रायगड मध्ये पावसाने विश्रांती घेतलीय. रायगडच्या समुद्रकिनार्यावर सध्या शुकशुकाट पाहायला मिळतोय. रेड अलर्ट जारी केल्या नंतर लोकांनी घरातच राहणे पसंत केलंय. त्यातच जिल्हा प्रशासनाने देखील लोकांना आवाहन करण्याबरोबरच कारवाईचा बडगा उगारण्याचा देखील इशारा दिलाय.
मुसळधार पावसाचा अंदाज
इथून पुढचे काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर लोकांनी जाऊ नये तसंच आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घराबाहेर पडू नका, असं आवाहन करत आपली सुरक्षा आणि काळजी आपण स्वत: घ्या, मदतीला जिल्हा प्रशासन आहेच, असं जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी म्हटलं आहे.
कडक कारवाईचा इशारा
जिल्हावासियांना जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आलंय. मात्र जे कुणी लोकं नियमांचं पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिला आहे.
एकंदरित पावसाची परिस्थिती पाहता आणि संभाव्य धोका लक्षात घेता 8 ऑगस्ट पर्यंत जिल्ह्यातील धरण, तलाव आणि धबधबे बंद राहणार आहेत. असं असलं तरी वैद्यकीय सेवेशी निगडित आस्थापना फक्त सुरू राहतील, असंही जिल्हा प्रशासनाने कळवलं आहे.
अतिवृष्टी होण्याची शक्यता
जिल्यात दोन दिवसांपासून पावसाचे आगमन झाले आहे. दि. 10 आणि 11 जूनला जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता असून ताशी 12 ते 20 किमी वेगाने वारे वाहण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे हे दोन दिवस रायगडकरांसाठी धोकादायक ठरणार आहेत. अतिवृष्टीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
अतिवृष्टी काळात नदी, समुद्र, धरण परिसरात जाऊ नका
अतिवृष्टी काळात समुद्र, नदी, धरण या ठिकाणी पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाचा जोर जास्त असतो. या ठिकाणी काहीजण उत्साहाच्या भरात पोहण्याचा आनंद लुटण्यास जातात. अशा वेळी त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे अतिवृष्टी काळात विशेषतः युवकांनी अशा ठिकाणी पोहण्यासाठी जाऊ नये, असं आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केलं आहे.
समुद्र, खाडीकिनारी नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश
अतिवृष्टी आणि भरतीमुळे समुद्र, खाडी भागात किनाऱ्याला समुद्राचे पाणी बाहेर येण्याची शक्यता असते. समुद्र, खाडी किनारी गावात पाणी शिरून पूरस्थिती निर्माण होऊ शकते. त्या दृष्टीने नागरिकांनी सतर्क राहावे, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास, अशा वेळी नागरिकांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलविण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.
(Raigad heavy Rain update Collector Nidhi Chaudhari Appeal)
हे ही वाचा :
रायगडसाठी पुढचे दोन दिवस अतिशय धोकादायक, जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचं महत्त्वाचं आवाहन