रायगड पर्यटन नव्हे तर प्रेरणास्थळ बनवणार…अमित शाह यांची मोठी घोषणा
देशाला जगात मान मिळत आहे. शिवाजी महाराजांनी काशीचा उद्धार करण्यास सांगितले. काशी विश्वनाथाचे कॉरीडोअर आणि राम मंदिराचे काम मोदींनी केले, असे अमित शाह यांनी म्हटले. स्वातंत्र्याला शंभरवर्ष होतील तेव्हा आपला देश जगात पहिल्या क्रमाकांवर असणार आहे.

शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला ती हीच जागा आहे. शिवाजी महाराज यांचा जन्म झाला ती ही जागा आहे. शिवाजी महाराजांनी शेवटचा श्वास घेतला ती ही जागा आहे. बालशिवाजीपासून ते छत्रपतीपर्यंतचा इतिहास या पवित्र भूमीत आहे. रायगड पर्यटन नव्हे तर प्रेरणास्थळ बनवण्यासाठी आमचे सरकार कटीबद्ध आहे. सातवीपासून ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी या ठिकाणी आले पाहिजे. त्यांनी महाराजांच्या कार्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी सांगितले. किल्ले रायगडावर शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथिनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
अमित शाह म्हणाले, शिवाजी महाराजांचा अर्थ समर्पण बलिदान, शौर्य आहे. स्वाभिमान आहे. स्वराज्याची अमर विजिगिषा आहे. या भूमीत जो कोणी येतो तो नवीन ऊर्जा आणि चेतना घेऊन जातो. प्रत्येक तरुणाला या प्रेरणा स्थळावर येऊन प्रेरणा घेतली पाहिजे. न्यायासाठी शिवाजी महाराजांनी अनेक सिद्धांत दिले. सुशासन कसे असले पाहिजे याचे सर्वात मोठे उदाहरण त्यांनी घालून दिले. शिवाजी महाराजांचा अंतिम संदेश काय होता. ते म्हणायाचे, स्वराज्याची लढाई कधी थांबू नये, स्वधर्माची लढाई थांबू नये, स्वभाषेची लढाई थांबू नये, असे त्यांनी म्हटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात शिवाजी महाराज यांच्या आदर्शाची ही लढाई गौरवाने सुरू असल्याचे अमित शाह यांनी सांगितले. ते म्हणाले, देशाला जगात मान मिळत आहे. शिवाजी महाराजांनी काशीचा उद्धार करण्यास सांगितले. काशी विश्वनाथाचे कॉरीडोअर आणि राम मंदिराचे काम मोदींनी केले, असे अमित शाह यांनी म्हटले. स्वातंत्र्याला शंभरवर्ष होतील तेव्हा आपला देश जगात पहिल्या क्रमाकांवर असणार आहे, असे अमित शाह यांनी म्हटले.
अफजलखान याचे नाव न घेता अमित शाह म्हणाले, स्वत:ला अलमगीर म्हणणारा व्यक्ती महाराष्ट्रात पराजित झाला. त्याची समाधी महाराष्ट्रात आहे. शिवचरित्र प्रत्येक भारतीयांना शिकवले गेले पाहिजे. प्रत्येक मुलाला शिकवले पाहिजे. शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापर्यंत मर्यादित ठेवू नका. हात जोडून विनंती करतो. देश आणि जग त्यांच्याकडून प्रेरणा घेत आहे, असे त्यांनी सांगितले.