अगदी घराच्या खालीच मृत्यूनं गाठलं; विरारमध्ये दहावीत शिकणाऱ्या मुलीचा भयानकरित्या मृत्यू

तनिष्का लक्ष्मण कांबळे (वय 15) असे मृत विद्यार्थीनीचे नाव आहे. विरार : क्लास वरून घरीजाताना दहावीत शिकणाऱ्या तरुणीचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. विरार पश्चिमेकडील बोळींजच्या कृष्णा मथुरा नगर येथील एब्रोल सोसायटीत ती राहते. विरार पश्चिमेकडील बोळींजच्या कृष्णा मथुरा नगर परिसरातच ती क्लासला जाते. क्लासवरुन घरी येताना तिचा मृत्यू झालाय.

अगदी घराच्या खालीच मृत्यूनं गाठलं; विरारमध्ये दहावीत शिकणाऱ्या मुलीचा भयानकरित्या मृत्यू
Follow us
| Updated on: Aug 16, 2022 | 9:26 PM

विरार : मृत्यू कोणाला कधी कुठे आणि कसा गाठेल याचा काही नेम नाही. विरारमध्ये(Virar) दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा भयानक रित्या मृत्यू झाला आहे. क्लास वरून घरी येत असताना अगदी घराच्या खालीच विजेचा शॉक( electric shock) लागून या मुलीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या मुलीचा मृत्यूला MSEB चा गलथन कारभार जबाबदार असल्याचा आरोप देखील केला जात आहे.

तनिष्का लक्ष्मण कांबळे (वय 15) असे मृत विद्यार्थीनीचे नाव आहे. विरार : क्लास वरून घरीजाताना दहावीत शिकणाऱ्या तरुणीचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. विरार पश्चिमेकडील बोळींजच्या कृष्णा मथुरा नगर येथील एब्रोल सोसायटीत ती राहते. विरार पश्चिमेकडील बोळींजच्या कृष्णा मथुरा नगर परिसरातच ती क्लासला जाते. क्लासवरुन घरी येताना तिचा मृत्यू झालाय.

मागील दोन दिवसांपासून वसई विरार मध्ये रिमझिम पाऊस पडत आहे. यामुळे सासोयटीच्या समोरच्या रस्त्यावर पाणी साचलं होतं. त्या पाण्यात रस्त्याच्या खाली असलेली एम.एस.ई.बी.ची केबल ब्रेक झाली होती. यामुळे ब्रेक झालेल्या केबल मधून पाण्यात विजेचा प्रवाह चालू होता. त्याच पाण्यातून जाताना तनिष्कला विजेचा शॉक लागून तिचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

विशेष म्हणजे तिच्या घराच्या जवळच ही दुर्दैवी घटना घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेला MSEB चा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचा आरोप केला जात आहे. अनेक ठिकाणी MSEB च्या केबल उघड्यावर पडल्या आहेत. DP बॉक्स देखील उघडेच आहेत. तनिष्कच्या मृत्यूला MSEB चा निष्काळजपणी जबाबदार आहे.

तनिष्कच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबियांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे. तिचे शेजारी, मित्र-मैत्रिणी यांना देखील तनिष्कच्या मृत्यचे वृत्त आणि कारण समजताच धक्का बसला आहे. पाण्यातून विजेचा प्रवाह होऊन या पाण्यातून चालताना तनिष्कचा मृत्यू झाल्याचे वृत्त विरार शहरात वाऱ्यासारखे पसरले आहे. यामुळे विरार शहरात एकच भितीचे वातावरण पसरले आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.