AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोकणातून ठाण्याकडे लाकडं घेऊन येत होता ट्रक, पनवेलजवळ ऑईल गळती झाली अन्…

कोकणातून लाकडं घेऊन ठाण्याकडे ट्रक चालला होता. यावेळी पनवेलमधील कर्नाळाजवळ अचानक ट्रकमधील ऑईल लिक होऊ लागले. यामुळे ट्रक अनियंत्रित झाला.

कोकणातून ठाण्याकडे लाकडं घेऊन येत होता ट्रक, पनवेलजवळ ऑईल गळती झाली अन्...
पनवेलमध्ये अनियंत्रित ट्रक महामार्गावर पलटलाImage Credit source: TV9
| Updated on: Apr 01, 2023 | 3:13 PM
Share

पनवेल / रवी खरात : कोकणातून मुंबईत लाकडी घेऊन येणारा ट्रक पलटल्याची घटना आज पहाटे मुंबई-गोवा महामार्गावरील कर्नाळाच्या हद्दीत घडली. भररस्त्यात ट्रक पलटी झाल्याने महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतून कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलीस आणि वाहतूक शाखेचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हायड्राच्या सहाय्याने मार्ग मोकळा करत वाहतूक कोंडी सोडवली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.

ऑईल गळती झाल्याने ट्रक अनियंत्रित झाला

कोकणातील खेड येथून ठाणे मुलुंड स्मशानभूमीसाठी अशोक लेलँड कंपनीचा ट्रक लाकडे घेऊन चालला होता. पनवेल जवळील मुंबई गोवा महामार्गावरील कर्नाळाच्या हद्दीत पहाटे पनवेल बाजूकडे भरधाव वेगाने जात असताना ट्रकमधून ऑइल गळती होऊ लागली. यामुळे ट्रकवरील चालकाचा ताबा सुटून ट्रक रस्त्याच्या उजव्या बाजूला पलटी झाला. ट्रक पलटल्यानंतर सर्व लाकडे रस्त्यावर पसरली. रस्त्यावर ट्रक पलटी झाल्याने आणि लाकडं पसरल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. पनवेल पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

बंगळुरुहून पुण्याला चाललेल्या ट्रकला अपघात

बेंगलोरहून पुण्याला जाणाऱ्या आयशर कंटेनरचा कोल्हापूर शहराजवळ अपघात झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कोल्हापूर शहराजवळ हायवेवरील वाहतुकीवर याचा परिणाम झाला. काही काळ वाहतूक संथ गतीने सुरू होती. हा अपघातग्रस्त आयशर कंटेनर गेल्या 2 तासापासून हायवेवरच आहे. त्यामुळे हायवे पोलिसांनी तात्काळ हा कंटेनर हटवून, वाहातूक सुरळीत सुरू करावे अशी मागणी वाहनचालक करत आहेत.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.