Salman Khan : सलमान खानला सापानं केला दंश; पनवेलच्या फार्महाऊसमधली घटना

अभिनेता सलमान खान(Salman Khan)ला सापानं दंश केलाय. पनवेलच्या फार्महाऊसमधली ही खळबळजनक घटना आहे. यानंतर त्याला रात्री 3 .30 वाजता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

Salman Khan : सलमान खानला सापानं केला दंश; पनवेलच्या फार्महाऊसमधली घटना
सलमान खान
Follow us
| Updated on: Dec 26, 2021 | 12:30 PM

सूरज मसुरकर, टीव्ही9 मराठी, मुंबई : अभिनेता सलमान खान(Salman Khan)ला सापा(Snake)नं दंश केलाय. पनवेलच्या फार्महाऊस(Panvel FarmHouse)मधली ही खळबळजनक घटना आहे. यानंतर त्याला रात्री 3 .30 वाजता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. MGM हॉस्पिटलमध्ये तो दाखल होता. दरम्यान आता त्याला घरी सोडण्यात आलंय.

ख्रिसमस आणि बर्थडे सेलिब्रेशन

ख्रिसमस तसंच वाढदिवसानिमित्त सलमान खान त्याच्या कुटुंबीय आणि मित्रांसह पनवेल इथल्या फार्महाऊसला काल आला होता. मध्यरात्री बाहेर पडल्यानंतर हा प्रकार घडला. सुदैवाने साप बिनविषारी होता, त्यामुळे मोठं संकट टळलं. या प्रकारानंतर त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारानंतर सकाळी त्याला डिस्चार्ज देण्यात आला. आता त्याची प्रकृती ठीक असल्याचं समजतंय.दरम्यान, सलमान खान 56 वर्षांचा होणार आहे. 27 डिसेंबर रोजी तो आपला 56वा वाढदिवस साजरा करणार आहे. कोरोनामुळे सलमान यावेळी फार जोरात वाढदिवस साजरा करणार नाहीये. एका रिपोर्टनुसार, यावेळी सलमानच्या वाढदिवसानिमित्त एक छोटीशी पार्टी होणार आहे.

कोरोनामुळे साधेपणानं साजरा करणार वाढदिवस

सलमान खान त्याचा वाढदिवस पनवेलच्या फार्महाऊसवर साजरा करणार आहे. कुटुंबातील सदस्य आणि काही खास मित्र या पार्टीत सहभागी होणार आहेत. सलमानचा प्लॅन असा आहे, की तो खूप लोकांना आमंत्रित करणार नाही. तसं प्रत्येक वेळी सलमान खानच्या वाढदिवसाला पाहुण्यांची यादी खूप मोठी असते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे सलमान आपला वाढदिवस साधेपणानं साजरा करतोय.

टायगर 3चं शेड्यूल

सलमान खानचा नुकताच अंतिम हा सिनेमा रिलीज झाला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत आयुष शर्मा मुख्य भूमिकेत दिसला होता. हा चित्रपट 26 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. आता टायगर 3च्या शूटिंगसाठी सलमान लवकरच 15 दिवसांच्या शेड्यूलसाठी निघणार आहे. टायगर 3च्या शेड्यूलसाठी सलमान कॅटरिना कैफसोबत निघणार आहे.

Kapoor Family Christmas : कपूर फॅमिलीचं ख्रिसमस सेलिब्रेशन, रणबीर-आलिया मात्र गैरहजर

विधानसभा अध्यक्षांच्या निवडीत बाका प्रसंग; राज्यपालांच्या हाती निवडणुकीची दोरी, पुढे काय होणार…?

Bigg Boss 3 Marathi Grand Finale | मीनल चौथ्या नंबरला? ‘बिग बॉस मराठी 3’ची ट्रॉफी कोणाला? सोशल मीडियावरील पोल्सचा अंदाज

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.