माझं सरकारला, सामाजिक संस्थांना अन् नागरिकांना एकच आवाहन…; इर्शाळवाडीतील दुर्घटनेनंतर संभाजीराजे काय म्हणाले?

Sambhajiraje on Raigad Irshalwadi landslide : इर्शाळवाडीतील दुर्घटनेनंतर संभाजीराजे यांची सरकारला विनंती; म्हणाले, माझं सरकारला, सामाजिक संस्थांना अन् नागरिकांना एकच आवाहन आहे...

माझं सरकारला, सामाजिक संस्थांना अन् नागरिकांना एकच आवाहन...; इर्शाळवाडीतील दुर्घटनेनंतर संभाजीराजे काय म्हणाले?
Follow us
| Updated on: Jul 24, 2023 | 3:52 PM

मुंबई | 24 जुलै 2023 : रायगडमधल्या खालापूरमध्ये दरड कोसळल्याची घटना घडली आहे. खालापूरमधल्या इर्शाळवाडी हे संपूर्ण गाव दरडीखाली आलं. चार दिवस या गावात शोधकार्य सुरू होतं. आज अखेर चार दिवसांनंतर हे शोधकार्य थांबवण्यात आलं. त्यावर ‘स्वराज्य’ संघटनेचे नेते संभाजीराजे छत्रपती यांनी भाष्य केलं आहे.

छत्रपती संभाजीराजे यांनी इर्शाळवाडीला भेट दिली. तिथल्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. इर्शाळवाडीत नागरिकांना चौक या ठिकाणी कंटेनरमध्ये ठेवण्यात आलं आहे. या ठिकाणी सरकारकडून या ग्रामस्थांची निवाऱ्याची सोय केली आहे. तिथे संभाजीराजे यांनी भेट दिली. तेव्हा स्थानिकांना त्यांनी धीर दिला. धीर सोडू नका, आम्ही सगळे आपल्या पाठिशी आहोत, असं संभाजीराजे म्हणाले आहेत.

इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृत झालेल्या सर्वांना श्रद्धांजली वाहतो. तिथली परिस्थिती जाणून घेतली. सर्वांची सोय सरकारने केली आहे. पण त्यांचं पुनर्वसन लवकरात लवकर करावं, ही माझी सरकारकडे विनंती राहिल, असं संभाजीराजे म्हणाले आहेत.

महाराष्ट्रामध्ये अशी अनेक गावं आहेत. ज्यांचं पुनर्वसन हे केलं गेलं पाहिजे. अशा धोकादायक स्थितीमध्ये राहणाऱ्या लोकांची माहिती घेऊन सरकारने या संदर्भात तात्काळ पावलं उचलली पाहिजेत. महाराष्ट्रामध्ये सरकारी खाजगी संस्था आहेत. त्यांच्या मार्फत हा सर्व्हे केला गेला पाहिजे, असं संभाजीराजे म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मी अभिनंदन करतो. त्यांनी या ठिकाणी येऊन पाहिली भेट दिली आणि सर्व यंत्रणा कामाला लावली. अनेक लोकांनी या ठिकाणी नागरिकांना दत्तक घेत आहेत. त्या प्रमाणे खाजगी संस्थानी सुद्धा दत्तक घ्यावं, असं आवाहनही संभाजी राजे यांनी केलं आहे.

त्याच बरोबर इर्शाळवाडी इथं मृत पावलेल्या नागरिकांच्या मुलांना शिक्षण देखील मोफत करावं. स्वराज्य संस्थेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. बाकीच्या ठिकाणाहून स्वराज्यचे कार्यकर्ते मदत करत आहेत, असंही संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

शोधकार्य अखेर थांबवलं…

इर्शाळवाडीत अनेकांना आपली घरं, संसार अन् हक्काची माणसं गमावली आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत 119 जणांना वाचवण्यात प्रशासनाला यश आलं आहे. तर मृतांचा आकडा 29 वर पोहोचला आहे. अजूनही या दुर्गटनेतील 52 जण बेपत्ता आहेत. मात्र अपुऱ्या सुविधांअभावी चार दिवसांनंतर हे शोधकार्य थांबवण्यात आलं आहे.

बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.