Railway News : प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, इगतपुरी स्थानकात मिळणार या मेल-एक्सप्रेसची तिकीटे
याआधी इगतपूरीला केवळ तांत्रिक थांबा होता. म्हणजे येथे देशाच्या कानाकोपऱ्यात जाणाऱ्या रेल्वेच्या गाड्या थांबायच्या परंतू त्याची तिकीटे काही येथून मिळत नव्हती. आता ती सोय होणार आहे.
मुंबई : आता इगतपूरी ( Igatpuri ) येथे केवळ तांत्रिक थांबा असलेल्या मेल-एक्सप्रेस ( Mail-Express ) गाड्यांना कमर्शियल हाल्ट ( Commercial Halt ) मिळणार आहे. याआधी येथे केवळ गाड्या थांबत होत्या. परंतू सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांना त्यांचे तिकीट येथून काढता येत नव्हते. त्यामुळे आता येथून तिकीटे देखील मिळण्याची सोय झाल्याने आता येथून देशाच्या कानाकोपऱ्यात जाणाऱ्या इगतपूरीवासियांची चांगलीच सोय होणार आहे. आता खालील मेल आणि एक्सप्रेस गाड्यांची तिकीटे इगतपूरीच्या तिकीट खिडक्यांवर सर्वसामान्यांना लवकरच खरेदी करता येणार आहेत.
इगतपूरी हे मुंबई, नाशिक व इतर शहरांच्या कनेक्टिव्हिटीसाठी मध्य रेल्वेचे एक महत्वाचे स्टेशन आहे. इगतपुरीशी महाराष्ट्र व देशातील अनेक शहरे रेल्वेने जोडली गेली आहेत. परंतू इगतपूरीला अनेक रेल्वे गाडयांना प्रत्यक्ष थांबा असूनही तिकीट बुकिंगची सुविधा नव्हती. आता एकूण सतरा मेल आणि एक्सप्रेस गाड्यांची तिकीटे इगतपूरीच्या तिकीट खिडक्यांवर खरेदी करता येतील असे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ट्वीटरवर म्हटले आहे.
[Office of Raosaheb Patil Danve]
प्रवाश्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर भारतीय रेल्वे. खालील चालू 17 गाड्यांना आता इगतपुरीहुन देखील तिकीट काढण्याची सुविधा. (1/6) pic.twitter.com/Ad0q0p32KQ
— Raosaheb Patil Danve (@raosahebdanve) June 17, 2023
इगतपूरीला इतके दिवस तांत्रिक थांबा होता. कमर्शियल हाल्ट नव्हता. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्याचा काही उपयोग होत नव्हता. या बाबीची मागणी मिळताच सर्व तांत्रिकबाबी तपासून, आता या गाड्यांना देखील इगतपूरीहून तिकीट काढण्याची सुविधा सुरू करण्याचे निर्देश केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी दिले आहेत.
असा होणार फायदा
इगतपूरी स्टेशनहून मुंबई, ठाणे, जालना, छत्रपती संभाजीनगर, पनवेल, पुणे, नाशिक, नागपूर इ. शहरांना जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे, त्याचबरोबर हैदराबाद, पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश व इतर राज्यांमधून देखील येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील अधिक जादा आहे. त्यामुळे या सेवेचा फायदा स्थानिक नागरिक, व्यावसायिक, कामगार वर्ग, शेतकरी वर्ग व विद्यार्थी वर्गाला मोठ्या प्रमाणावर होणार आहे.
या 17 मेल- एक्सप्रेसची तिकीटे इगतपूरीतून मिळणार
ट्रेन क्र. 12109/ 10 – सीएसएमटी – मनमाड पंचवटी एक्सप्रेस
ट्रेन क्र. 17611/12 – नांदेड – सीएसएमटी – राज्यराणी एक्सप्रेस
ट्रेन क्र. 15017/18 – गोरखपूर – लोकमान्य टिळक (ट) – काशी एक्सप्रेस
ट्रेन क्र. 12071/72 – सीएसएमटी – जालना जनशताब्दी एक्सप्रेस
ट्रेन क्र. 12139/ 40 – सीएसएमटी – नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस
ट्रेन क्र. 12859/ 60 – हावडा – सीएसएमटी – गीतांजली एक्सप्रेस
ट्रेन क्र. 12809 / 10 – हावडा – सीएसएमटी मेल
ट्रेन क्र. 11401/ 02 – सीएसएमटी – आदिलाबाद नंदीग्राम एक्सप्रेस
ट्रेन क्र. 17057/58 – सिकंदराबाद- सीएसएमटी – देवगिरी एक्सप्रेस
ट्रेन क्र. 11071/72 – मुंबई – वाराणसी कामयानी एक्सप्रेस
ट्रेन क्र. 22177/ 78 – सीएसएमटी – वाराणसी महानगरी एक्सप्रेस
ट्रेन क्र. 12335/36 – लोकमान्य टिळक (ट) – भागलपूर एक्सप्रेस
ट्रेन क्र. 12533/ 34 – सीएसएमटी – लखनौ पुष्पक एक्सप्रेस
ट्रेन क्र. 11025/ 26 – भुसावळ-पुणे एक्सप्रेस
ट्रेन क्र. 18029/30 – लोकमान्य टिळक (ट) – शालिमार एक्सप्रेस
ट्रेन क्र. 22183 – लोकमान्य टिळक (ट)- अयोध्या एक्सप्रेस
ट्रेन क्र. 20103 – लोकमान्य टिळक (ट) – गोरखपूर एक्सप्रेस