AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rain Update | संपूर्ण राज्यात पावसाचा अलर्ट, विदर्भात पावसाची तुफान बॅटींग

Maharashtra Rain Update | राज्यात गेल्या आठ दिवसांपासून पाऊस सुरु आहे. विदर्भाला पावसाने झोडपून काढले आहे. त्यातच शनिवारी संपूर्ण राज्याला पावसाचा अलर्ट दिला आहे. काही ठिकाणी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे.

Rain Update | संपूर्ण राज्यात पावसाचा अलर्ट, विदर्भात पावसाची तुफान बॅटींग
नागपुरात मुसळधार पावसानंतर रस्त्यावर साचलेले पाणी. Image Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 23, 2023 | 8:05 AM

पुणे | 23 सप्टेंबर 2023 : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस सक्रीय झाला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पाऊस सुरु आहे. विदर्भासह पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्ये शुक्रवारपासून पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. विदर्भात नागपूरमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. रस्त्यावर चार ते पाच फूट पाणी साचले आहे. पुन्हा शनिवारी राज्यभर पावसाचा अलर्ट दिला आहे. काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिल्यामुळे मुसळधार पावसाचा शक्यता आहे.

राज्यात ४८ तास पावसाचे

राज्यात येत्या ४८ तासात राज्यात मॉन्सून सक्रिय राहणार आहे. राज्यातील नागपूर आणि रायगड या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. इतर सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. रायगड, भंडारा, गोंदियामध्ये तुरळक ते मुसळधार ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील उर्वरित भागात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच २५ आणि २६ तारखेला राज्यात विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

विदर्भात जोरदार पाऊस

नागपूरमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. नागपूरमधील सखल भागात पाणी साचले आहे. शुक्रवारी रात्री ढगफुटीसदृश्य पाऊस नागपुरात झाला आहे. त्यामुळे मोरभवन परिसरात चार ते पाच फूट पाणी साचले आहे. नागरिक बसेवर चढून बसले आहे. नागपूरमधील अंबझरी तलावर ओव्हरफ्लो झाला आहे. भंडारा जिल्ह्यात चौथ्या दिवशीही पावसाची संततधार सुरूच आहे. जिल्ह्यातील तुमसर मोहाडी या भागात कालपासून संततधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले आहे.

हे सुद्धा वाचा

नाशिक, पुणे जिल्ह्यात मुसळधार

नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. इगतपुरी तालुक्यात शहरासह अनेक ठिकाणी गेल्या तीन तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. काही भागातील नागरिकांच्या घरात देखील पाणी गेले आहे. घोटी बाजारपेठेमध्ये अक्षरशः गुडघाभर पाणी साचले आहे. नाशिक शहर आणि जिल्ह्यात रात्री मुसळधार पाऊस झाल्यामुळे गंगापूर धरणासह इतर धरणात पाण्याची पातळी वाढली आहे. गंगापूर धरणातून रात्रीच्या सुमारास 752 क्यूसेस पाण्याचा विसर्ग केल्याने गोदा घाटावर पाणी वाढले आहे. पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. पुण्यातील खडकवासला धरणसाखळीमधील धरणे 94% भरली आहे. पानशेत, खडकवासला, वरसगाव आणि टेमघरमध्ये मिळून २७ टीएमसी जलसाठा झाला आहे.

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लष्कराचं कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लष्कराचं कौतुक.
पाकमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे जमीनदोस्त, हीच ती 9 ठिकाणं जिथं...
पाकमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे जमीनदोस्त, हीच ती 9 ठिकाणं जिथं....
भारतीय लष्कराने कसा केला हल्ला, पाहा संपूर्ण घटनाक्रम
भारतीय लष्कराने कसा केला हल्ला, पाहा संपूर्ण घटनाक्रम.
तुझ्या सिंदूरचा बदला... इम्तियाज जलील ऑपरेश सिंदूरवर बघा काय म्हणाले?
तुझ्या सिंदूरचा बदला... इम्तियाज जलील ऑपरेश सिंदूरवर बघा काय म्हणाले?.
जखमी दहशतवाद्यांची भेट घेण्यासाठी पाकिस्तानी अधिकारी रुग्णालयात
जखमी दहशतवाद्यांची भेट घेण्यासाठी पाकिस्तानी अधिकारी रुग्णालयात.
त्यांना आणखी काय बर्बाद करणार?, राज ठाकरेंनी खडेबोल सुनावले
त्यांना आणखी काय बर्बाद करणार?, राज ठाकरेंनी खडेबोल सुनावले.