AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : कृष्णाकाठी निसर्गाचा कलाविष्कार, बंचाप्पाचं हिरवंगार बन, पक्ष्यांचा किलबिलाट-मयूरनाच आणि बरंच काही..!

मान्सूनपूर्व पावसाच्या सरींमुळे पलूस तालुक्यातील आमणापूर बुर्लीदरम्यान असणारे बचाप्पा बन बहरले आहे. कृष्णाकाठी निसर्ग हिरवाईची मुक्तहस्ताने जणू उधळण करत असल्याचे विलोभनीय दृश्य आमणापूर येथील पक्षीप्रेमी संदीप नाझरे यांनी टिपले आहे. (Rainy Seoson banchappa ban palus Sangali awesome nature)

Video : कृष्णाकाठी निसर्गाचा कलाविष्कार, बंचाप्पाचं हिरवंगार बन, पक्ष्यांचा किलबिलाट-मयूरनाच आणि बरंच काही..!
मान्सूनपूर्व पावसाच्या सरींमुळे पलूस तालुक्यातील आमणापूर बुर्लीदरम्यान असणारे बचाप्पा बन बहरले आहे.
| Edited By: | Updated on: Jun 10, 2021 | 10:32 AM
Share

सांगली : मान्सूनपूर्व पावसाच्या सरींमुळे पलूस तालुक्यातील आमणापूर बुर्लीदरम्यान असणारे बंचाप्पा बन (Banchappa Ban) बहरले आहे. कृष्णाकाठी निसर्ग हिरवाईची मुक्तहस्ताने जणू उधळण करत असल्याचे विलोभनीय दृश्य आमणापूर येथील पक्षीप्रेमी संदीप नाझरे यांनी टिपले आहे. (Rainy Seoson banchappa ban palus Sangali awesome nature)

बनात ‘ओ’ आकाराची तांबड्या मातीतील मळकटलेली गाडीवाट आहे. त्याला झाडाच्या फांद्यांप्रमाणे फुटलेल्या असंख्य पायवाटा आहेत. उत्तरेला ऊसाची हिरवीगार शेती, दक्षिणेला संथ वाहणारी कृष्णामाई आहे. बाभूळ, चिचपटी आणि करंजीची हात पसरून उंच उभी असलेली झाडे, गाजरगवत आणि तरवड पावसामुळे सध्या हे हिरवेगार दिसत आहे.

नव्या पालवीची दाटी

नव्या पालवीची दाटी झालेल्या काळ्या बाबळींनी पिवळ्या पानांचे अलंकार परिधान केले आहेत. या बाभळींची तांबड्या मातीच्या मळवाटांवर पडलेली ही पिवळी फुलं अधिकच उठून दिसत आहेत. मध्येच काही वटलेल्या झाडांचे सांगाडे काष्ठ शिल्प बनून बनाची शोभा वाढवत आहेत.

असंख्य किटकांची जंत्री

बनाला वळसा घालून जाणारा बुर्लीचा वत. या ओढ्याच्या काठावर असंख्य करंजाचे झाप हिरव्याकंच पानांनी लगडले आहेत. बनातील विविध पक्षांना खाद्य म्हणून सिकाडा, मुंग्या, सुरवंट, वाणीकिडा, तुडतुडे अशा अशा असंख्य किटकांची जंत्री आहे.

पक्ष्यांचा किलबिलाट आणि मयूर नाच…

येथे पक्ष्यांची संख्या मोठी असून, यामध्ये मोर, पोपट, मनोली, सुगरण चिमणी, नाचण, बुलबुल, कावळा, प्रामुख्याने पाहायला मिळतात. या बनामध्ये मालकोवा, सोनपाठी सुतार, मराठा सुतार, चातक, स्वर्गीय नर्तक, मोहोळ घार, तांबट, रक्तलोचन घुबड, रातवा अशा देशी-विदेशी दुर्मीळ पक्ष्यांचे दर्शन घडत आहे. राखी धनेशच्या जोडीचा वावर बंचाप्पा बन पक्ष्यांसाठी समृद्ध अधिवास असल्याची साक्ष देत आहेत.

(Rainy Seoson banchappa ban palus Sangali awesome nature)

पाहा व्हिडीओ :

हे ही वाचा :

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.