Raj Thackrey Speech Live : साला आमदारांना कसली घरं वाटताय, उद्धव ठाकरेंच्या घोषणेवर राज ठाकरेंचा सवाल, आमदारांची पेन्शन बंद करण्याचीही मागणी

जे पूर्वापार झोपडपट्टीमध्ये आले, चाळीमध्ये आले त्यांना घरे मिळाली पाहिजेत. पोलिसांना घरे मिळाली पाहिजे. साला आमदारांना कसली घरं वाटताय ? हा आमचा राजू, राजू पाटील याने पहिला विरोध केला. आमदारांना घरे देऊ नका म्हणून. मला वाटतं आपण देवाण-घेवाण करावी. आमदारांना घर द्यावं आणि त्यांचं फार्महाऊस ताब्यात घ्यावं. मग आम्हाला काही घेणंदेणं नाही.

Raj Thackrey Speech Live : साला आमदारांना कसली घरं वाटताय, उद्धव ठाकरेंच्या घोषणेवर राज ठाकरेंचा सवाल, आमदारांची पेन्शन बंद करण्याचीही मागणी
राज ठाकरेंच्या ठाण्यातील सभेचा मार्ग अखेर मोकळाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 02, 2022 | 11:32 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 24 मार्च रोजी राज्यातील सर्वपक्षीय आमदारांसाठी म्हाडाची 300 घरे देण्याची घोषणा विधानसभेत केली होती. यावरुन राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा खरपूस समाचार घेतला आहे. जे पूर्वापार झोपडपट्टीमध्ये आले, चाळीमध्ये आले त्यांना घरे मिळाली पाहिजेत. पोलिसांना घरे मिळाली पाहिजे. साला आमदारांना कसली घरं वाटताय ? असा प्रश्न उपस्थित केला. देशातील सर्व माननीय आमदार, माननीय खासदार लोकांचं काम करायचं ना मग पेन्शन कशाला हवी. करा काम. आताची परिस्थिती पाहिली तर कोणत्या आमदाराने घर मागितलं होतं ? मुख्यमंत्र्यांना काय झालं, की त्यांना त्यात कोणता कट दिसला ? असा खोचक सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे. (Raj Thackeray criticizes Chief Minister Uddhav Thackeray for announcing free houses to MLAs)

आमदारांना घर द्यावं आणि त्यांचं फार्महाऊस ताब्यात घ्यावं

जे पूर्वापार झोपडपट्टीमध्ये आले, चाळीमध्ये आले त्यांना घरे मिळाली पाहिजेत. पोलिसांना घरे मिळाली पाहिजे. साला आमदारांना कसली घरं वाटताय ? हा आमचा राजू, राजू पाटील याने पहिला विरोध केला. आमदारांना घरे देऊ नका म्हणून. मला वाटतं आपण देवाण-घेवाण करावी. आमदारांना घर द्यावं आणि त्यांचं फार्महाऊस ताब्यात घ्यावं. मग आम्हाला काही घेणंदेणं नाही. आमदारांना खासदारांना पेन्शन दिली जाते. ती पहिली बंद केली पाहिजे. उपकार करता का साल्यांनो. देशातील सर्व माननीय आमदार, माननीय खासदार लोकांचं काम करायचं ना मग पेन्शन कशाला हवी. करा काम. आताची परिस्थिती पाहिली तर कोणत्या आमदाराने घर मागितलं होतं ? मुख्यमंत्र्यांना काय झालं, की त्यांना त्यात कोणता कट दिसला ? असा सवाल केला.

मुंबईत फुकट घर मिळतय म्हणून लोंढेच्या लोंढे आले

ज्यावेळी 1995 साली शिवसेना-भाजपची सत्ता महाराष्ट्रात आली, त्यावेळेला मी माननीय बाळासाहेब ठाकरेंना बोललो होतो. मी म्हटलं काका झोपडपट्टीवासियांना फुकट घरं. फुकट ही गोष्ट चांगली नाही. मला म्हणाले तू शांत बस. मुंबई आणि भागात ज्या झोपडपट्ट्या आहेत, त्यांना चांगली घरं मिळतील. उद्देश चांगला होता. हेतू चांगला होता. मुंबईमध्ये त्यावेळेला मोजक्याच झोपडपट्ट्या होत्या. पण मुंबईत फुकट घर मिळतं म्हटल्यावर लोंढेच्या लोंढे मुंबईत आले. ठाणे बकाल झालं. पुणे बकाल झालं. नाशिक बकाल झालं, पुण्याकडे चाललेलं आहे. मुंबई झालेलीच आहे. या झोपडपट्ट्यांमध्ये काय चाललं आहे. अनेक प्रामाणिक लोक झोपडपट्ट्यांत राहतात, त्यांना घरे मिळाली पाहिजेत. (Raj Thackeray criticizes Chief Minister Uddhav Thackeray for announcing free houses to MLAs)

संबंधित बातम्या

Raj Thackrey Speech Live : मोदींची स्तुती, योगींना प्रशस्तीपत्र, मुंबई पालिकेसाठी राज ठाकरेंची उत्तर भारतीय मतदारांवर डोळा?

‘मनसे भाजपची बी टीम बनली’, जयंत पाटलांचा राज ठाकरेंवर पलटवार; भाजपवरही निशाणा

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.