Raj Thackeray Thane Uttar Sabha LIVE : आजोबा अशांना लवंडे म्हणायचे, राऊतांच्या शिव्यांचा राज ठाकरेंकडून समाचार
MNS Chief Raj Thackeray Thane Uttar Sabha Full Speech LIVE : गुढीपाडव्यानंतर असणारी ही उत्तर सभा आहे आणि या उत्तर सभेत राज ठाकरे काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर या सभे ठिकाणी 12 हजाराहून अधिक खुर्च्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत. गडकरी रंगायतनच्या बाजूला मुस रोड या ठिकाणी सभेची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे.
ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उत्तर सभा ठाण्यात होत आहे. ठाण्यातील राज ठाकरे यांच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे . गुढीपाडव्यानंतर असणारी ही उत्तर सभा आहे आणि या उत्तर सभेत राज ठाकरे काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर या सभे ठिकाणी 12 हजाराहून अधिक खुर्च्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत. गडकरी रंगायतनच्या बाजूला मुस रोड या ठिकाणी सभेची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. या ठिकाणी लाव रे तो व्हिडिओ या ठिकाणी दाखवणार आहे. काश्मीरी पंडितांनाही राज ठाकरे यांची भुरळ पडली असून जम्मूतील काटरा येथे आजच्या सभेचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
सामनातून पाकिस्तानचे नवनियुक्त पंतप्रधानांना काश्मिर खोऱ्याबद्दल खडेबोल
– सामनातून पाकिस्तानचे नवनियुक्त पंतप्रधानांना काश्मिर खोऱ्याबद्दल खडेबोल – काश्मिर खोऱ्यातील लोकांच्या बद्दल शहाबाज शिरीफांनी तोडले तारे – मोठ्या शरीफांच्या वेळी बर्थडे डिप्लोमसीचा धक्का देणारे आता या -छोट्या शरीफांच्या मुक्तफळांबाबत कोणती डिप्लोमसी आवलंबणआर आहेत ?? – आसा परखड सवालही सामनातून पाकिस्तानला करण्यात आला आहे – पाकिस्तानचा कोणताही पंतप्रधान सत्तेत आल्यावर काश्मीर प्रश्नाची बांग देतचं असतो – त्याच प्रमाणे याही पंतप्रधानांनी आपल्या पहिल्याच भाषणात काश्मिर बद्दल बांग दिलीच
– दहशतवादी कारवाया करून काशमिर खोरे आशांत ठेवणारे पाकडेच आहेत – आजपर्यंत हजारो काश्मिरी पंडीत पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या कारवायांनी बळी पडले – हिंदुस्थानसोबत चांगले संबध हवे आहेत असे म्हणायचे आणि काश्मिर प्रश्नावरही गरळ ओकायची – आशी दुहेरी भुमीका पाकिस्थान नेहमी घेत असतो – सामनातून पाकिस्तानला काश्मिरी पंडीतांच्या मुद्द्यावरून खडे बोल
-
Raj Thackeray Thane Uttar Sabha LIVE : मनसे अध्यक्ष राज ठाकरे Live
हे फक्त मतांसाठी जातीचा वापर करत आहेत
कुठे गेले मराठा आरक्षण, तेव्हा मीच सांगत होतो हे होणार नाही
आता ओबीसी समाजाबाबत काढलं
त्यामुळे निवडणुका पुढे गेल्या
राज्य शासनही त्यांच्या हातात, पालिकाही यांच्या हाहात, दोन्ही हाताने खातात
आपण जातीतून बाहेर कधी पडणार
या भामट्यांपासून दूर राहा
किती महिने झाले एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटत नाही
अजूनही तोडगा निघाला नाही, मी पवारांकडे माणसं घेऊन गेलो होतो.
अस्वलाच्या अंगावर अजून केस आला तर मला काय फरक पडतो, तसं माझ्यावर केसेस पडला तर काय फरक पडत नाही
सणासुदीत समजू शकतो पण कायम हे नाटक चालणार
आता फक्त हनुमान चालीसा सांगितली आहे
मला पुढचा भात्यातला बाण काढायला लावू नका
-
-
Raj Thackeray Thane Uttar Sabha LIVE : मनसे अध्यक्ष राज ठाकरे Live
पवारसाहेब देववगैरे काही मानत नाहीत आणि मग ते त्यांच्या पद्धतीनं राजकारण समजावण्याचा प्रयत्न करतात. त्यांना अपेक्षित असलेलं. त्यात तुम्हाला बाबासाहेब पुरंदरेंना टार्गेट करतात. यांचे इतिहासकार कोण कोकाटे.. महाराजांवर आजपर्यंत अनेकांनी लिहिलं. प्रत्येकांनं आपआपल्या पद्धतीनं महाराज पुढे आणले. पण घराघरात छत्रपती पोहोचले ते बाबासाहेब पुरंदरेंमुळेच. पण आम्हाला इतिहासन नाही पाहायंच.. पुस्तक कोणत्या जातीनं लिहिलं ते नाही पाहायचं.. आम्ही आमच्या छत्रपतींचा इतिहास नाही सांगणार आहोत.. बघा काय चाललंय.. पवारसाहेब जातीपातीतला भेद संपवला पाहिजे.. पण तुमच्या राजकीय हितासाठी तुम्ही काय करताय…
-
Raj Thackeray Thane Uttar Sabha LIVE : मनसे अध्यक्ष राज ठाकरे Live
मी जे पवार साहेबांबद्दल बोललो.. जातियवाद जो आला महाराष्ट्रात.. जात होतीच.. जात आहेच… हजारो वर्ष जाती आहेत. प्रत्येकाला जातीबाबत अभिमान होता. ९९ मध्ये सरकार आलं आणि दुसऱ्या जातीबाबत द्वेष निर्माण करायला लावला. आमच्या मुलांची माती भडकवली गेली.
संभाजी बीग्रेट, वैगेर या संघटना राष्ट्रवादीनंच काढल्यात. हा योगायोग नाही. पवारांची एक मुलाखत घेतली होती पुण्यात तेव्हा विचारलं होतं… पण त्यांचं वय पाहून फार खोलात गेलो नाही… पण शरद पवार साहेब ज्या ज्या वेळी भाषण करता त्या त्यावेळी ते म्हणतात हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा.. त्याआधीही हा महाराष्ट्र आमच्या छत्रपती शिवरायांचं आहे..
पण पवार साहेब कधीही छत्रपतींचं नाव घेताना तुम्हाला कोणत्याही सभेत दिसणार नाही.. कारण छत्रपतींचं नाव घेतल्यानंतर मुसलमान मतं गेली तर काय करायचं.. म्हणून ते छत्रपतींचं नाव घेत नाही..आणि छत्रपतींचं आणि जातीचं राजकारण करायचं आहे. माथी भडकवायची असेल.. मग ती ब्राम्हणांनी पुस्तकं लिहिली आहे…..
अफझल खान इथं आला होता. तेव्हा महाराजांनी त्यांना कोथळा बाहेर काढला… पण त्यात काही हिंदू मुस्लिम असं काही आलं नव्हतं..
छत्रपतींची आमच्या ओळख काय.. तेव्हा त्यांच्या हातात ध्वज कोणता घेतला.. भगवा घेतला.. ही लढाई तेव्हा तुम्हाला तेव्हा दिसली नाही. हिरव्याच्या विरोधात भगवा हातात घेतला
स्वतः पवार नास्तिक आहेत, आणि म्हणून ते धर्माकडेही तसंच बघतात..
-
Raj Thackeray Thane Uttar Sabha LIVE : मनसे अध्यक्ष राज ठाकरे Live
मला ईडीची पुन्हा नोटीस आली तर पुन्हा जाईन चौकशीला
तुमची संपत्ती जप्त केली तर पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत शिव्या द्याला लागले
हा राष्ट्रवादीचा की शिवसेनेचा कळत नाही
हे फक्त लवंडे, असा शब्द आमच्या आजोबांनी काढला होता
-
-
Raj Thackeray Thane Uttar Sabha LIVE : मनसे अध्यक्ष राज ठाकरे Live
पवारांनी सांगावं की मी भूमिका बदलतो म्हणून
परदेशी पंतप्रधान चालणार नाहीत म्हणून काँग्रेसमधून बाहेर पडले
पुन्हा काँग्रेससोबत गेले, पवारांनी अनेकदा बदलली, मी भूमिका नाही बदलली
पाकिस्तानी कलावंतांना लाथ मारून कुणी हाकललं हे आठवूण बघा
आमच्या पोलिसांना मारलं यांच्याविरोधात फक्त आम्ही मोर्चा काढला
तो मोर्चा पोलिसांना डाफरणाऱ्या आरूप पटनाईक यांना काढून टाकावं यासाठी होता
आधीच्या गोष्टी विसरला असाल तर आठवूण देतो
-
Raj Thackeray Thane Uttar Sabha LIVE : मनसे अध्यक्ष राज ठाकरे Live
राज ठाकरेंनी मुंब्र्यात सापडलेल्या दहशतवद्यांची यादी वाचली
यात आव्हाड सन्यास घेणार नाही
यात देशावर प्रेम करणारे मुस्लिम भरडले जात आहेत
आमच्या सलीम मामाच्या मतदारसंघात जास्त मतदार हिंदू असून तो निवडूण येतो
-
Raj Thackeray Thane Uttar Sabha LIVE : मनसे अध्यक्ष राज ठाकरे Live
इतरांची शांतता बिघडवून प्रार्थना करा असे कोणताही धर्म सांगत नाही
हे सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे, तर राज्यातलं गृहखातं मतांसाठी गप्प आहे का
3 मे नंतर हनुमान चालीसा लावणारच, आम्हाला होतो तो त्रास त्यांना होऊदे
आव्हाड नागाने फना काढावा असा बोलतो
ये शेपटाला धरून फरवून फेकून देईन
वस्तरा कसा सापडेल, दाढी करतच नाहीत
आव्हाड वस्तराच दिसला का, तुमच्या बुद्धींची किव वाटते मला
मुंब्र्यातून अनेक दहशतवाद्यांना अटक
नेत्यांचा हत्येचा कट रचल्याप्रकरणीही अटक
इशरत जाह शेख ही मुंब्र्यात राहत होती
-
Raj Thackeray Thane Uttar Sabha LIVE : मनसे अध्यक्ष राज ठाकरे Live
हा धार्मिक नाही सामाजिक विषय आहे
कानाला त्रास होत असेल तर भोंगे खाली उतरवलेच पाहिजे
सरकारला माझं सांगणं आहे यातून आम्ही मागे हटणार नाही
ज्या देशात बंदी आहे तिथे निमूटपणे ऐकता ना तिकडे
कोणता धर्म दुसऱ्या धर्माला त्रास देतो
तुमचा रमजान सुरू आहे, समजू शकतो
गणपती, नवरात्रात समजू शकतो
पूर्ण वर्ष हे का ऐकवता, माझी राज्य सरकारला विनंती आहे, की कुठलीही तेढ आम्हाला निर्माण करायची नाही, महाराष्ट्राचं स्वास्थ आम्हाला बिघडवायचं नाही
आजपासून 3 मेपर्यंत सर्व भोंगे उतरले पाहिजेत
मग आमच्याकडून त्रास होणार नाही
-
Raj Thackeray Thane Uttar Sabha LIVE : मनसे अध्यक्ष राज ठाकरे Live
मी आधीही भोंग्याबाबत बोललो अजित पवारांना ऐकू नाय आलं
लॉकडाऊनमध्ये कान साफ झाले असतील
गुढी पाडव्याचा भोंगा ऐकू आला
मी चुकीचं काय बोललो, याचा देशाला त्रास होतोय
तुम्हाला जे करायचं ते घरात करा
शहरं कशाला अडवत आहात
प्रार्थना तुमची आहे तर आम्हाला का ऐकवत आहात
सागून समजत नसेल तर तुमच्या मशीदीबाहेर हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणार
-
Raj Thackeray Thane Uttar Sabha LIVE : मनसे अध्यक्ष राज ठाकरे Live
मी याच्या अगोदरही बोललो होतो… परंतु त्याचे मला काही व्हिडीओ सापडले नाहीत.. सोक्षमोक्ष लावलेला बरा असतो.. काय झालं..
तो जो सकाळचा शपथविधी झाला, त्याच्यानंतर पवारसाहेबांनी जो आवाज काढला, त्यानंतर तीन चार महिने अजित पवारांना ऐकू येत नव्हतं…
तसं त्यांना अजित पवारांना कूssss असं ऐकू येत होते.. परिपण.. २८ जुलै २०१८ या दिवशी मी काय बोललोय ते ऐका..
१ ऑगस्ट २०१८ – सायलेन्स झोन आम्हाला आणि मशिदीचे लाऊडस्पीकर बांगेची कॉन्सर्ट सुरु आहे बांग मारायची किंवा अजान करायची, त्याला लाऊडस्पीकर कशाला? आणि गणेशोत्सवाच्या दहा दिवसांना आडकाठी आणताय तुम्ही?
-
Raj Thackeray Thane Uttar Sabha LIVE : मनसे अध्यक्ष राज ठाकरे Live
-
Raj Thackeray Thane Uttar Sabha LIVE : मनसे अध्यक्ष राज ठाकरे Live
आता भुजबळ बघा काय म्हणाले – त्यांनी माझी टीका केली हे खरंय. मोदींविरोधात बोललो म्हणून मलाही त्रास सहन करावा लागला..
तुमचा सीए आणि गैरव्यवहारांमुळे तुम्हाला जेलमध्ये जावं लागलं – मोदींवर टीका केली म्हणून नाही आत जावं लागलं..
बरं सगळे जण सांगत आहेत की .. रकाने च्या रकाने भरत आहेत, रकानेच्या रकाने लिहीत आहेत..
आमचे शेवटचे लाडके अजित पवार काय म्हणतायत बघा…
त्यांचा एक आवडता शब्द आहे पठ्ठ्या..
यांना काय म्हणे भोंगे आताच दिसले का.. याच्या अगोदर काय झोपा काढत होते का..
अजित पवार कधी कधी कुठची कुठची गोष्ट बोललोय ना ते मला नीट आठवतंय..
तुमच्या माहितीसाठी मी तीन व्हिडीओ आणलेत..
-
Raj Thackeray Thane Uttar Sabha LIVE : मनसे अध्यक्ष राज ठाकरे Live
म्हणे विझलेला पक्ष आहे… असं म्हणााऱ्या जंतराव.. हा विझलेला पक्ष नाही, विझवणाऱ्यांचा पक्ष आहे..
हे काय मला सांगणार.. यांचे आमदारांचं काय झालं.. त्यांचे आमदार काय झालं..
निवडूक येणाऱ्या लोकांची टोळी म्हणजे राष्ट्रवादी.. या लोकांना एकत्र ठेवलंय आणि त्यांचे दोरी पवारांच्या हाती आहे..
-
Raj Thackeray Thane Uttar Sabha LIVE : मनसे अध्यक्ष राज ठाकरे Live
अजित पवारांच्या घरी, त्यांच्या बहिणींच्या घरी रेड पडते,. त्यानंतरही पवार आणि मोदींचे मधुर संबंध राहतात, कसं काय..
पवार साहेबांना कधीही भडकलेलं बघितलेलं नाही..
बघा जंत पाटील काय म्हणतायेत…. हे कधी गेले होते म्हणे यूपीत ज्यांना उत्तर प्रदेश
यूपीत जर विकास झालेला असेल, तर त्याचा मला आनंद आहे.. माझी भाषा काय आहे, ती जर तरची भाषा आहे..
निवडणुकीच्या वेळेला मीच सांगतो की बिहार, झारखंड आणि यूपीकडे लक्ष द्यावं,
या राज्यांचा विकास करावा. या तीन राज्यांमधून जी लोकं महाराष्ट्रात येतायत, त्यांचं ओझं राज्य उचलू शकत नाही..
सुप्रिया सुळेंनी बोलायंच काय हो… यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळेत..
-
Raj Thackeray Thane Uttar Sabha LIVE : मनसे अध्यक्ष राज ठाकरे Live
शरद पवारच मोदींना भेटून रेड टाकायला सांगत असतील
अजित पवारांच्या घरी रेड पडते तर सुप्रिया सुळेंच्या नाही पडत
जयंत पाटील मी काय बोललो ऐका
जयंत पाटलांचा जंत पाटील असा उल्लेख
-
Raj Thackeray Speech LIVE : मनसे अध्यक्ष राज ठाकरे Live
पाहटेचा शपविधी आणि सत्ता स्थापनेबाबत बोलल्यावर यात भाजपची कुठे स्क्रीप्ट आली
मला ईडीची नोटीस आल्याने मी ट्रॅक बदलल्याचे बोलतात
पण मी ट्रॅक नाही बदलला
मला कंपनीसंबंधी नोटीस आली होती,
आता व्यवसायही नाही करायचा का
पवारांनी ईडीची नोटीस येतेय कळालं तर नाटक केलं
या हाताने पाप नाही केलं तर नोटीसी कोणत्याही येऊदे
मोदींच्या भूमिका पटल्या नाहीत त्यावेळी थेट बोललो
पण 370 कलम रद्द केल्यावर अभिनंदन करणारे ट्विट माझं होतं
मोदींसारखा माणूस देशाला पंतप्रधान म्हणून मिळावा हे बोलणारा मी पहिला होतो
राजीव गांधींनंतर पहिल्यांदा मोदींना बहुमत मिळालं
माझ्या मोदींकडे दोन मागण्या आहेत.
समान नागरी कायदा आणा
आणि लोकसंख्येवर नियंत्रण आणणारा कायदा आणा
-
Raj Thackeray Speech LIVE : मनसे अध्यक्ष राज ठाकरे Live
वाट्टेल ते बोलत होते अनेकजण
मी स्वदेश चित्रपट पहायाला गेलो
मी त्याला म्हटलं असा कुठे चित्रपट असतो का
मी आधी लगान बघितल्यामुळे मी तसं बोललो
गुढी पाडव्याला अनेकजण त्यांचं भाषण घेऊन आले होते
तीन वर्षांपूर्वी मोदींवर बोललो होतो आता पण बोलायची अपेक्षा करत होते
तेव्हा बोललो आता नाही बोललो, भविष्यात वेळ आली तर बोलेन
मला तुमचेही वाभाडे काढायचे आहेत
-
Raj Thackeray Speech LIVE : मनसे अध्यक्ष राज ठाकरे Live
अनेकांनी तारे तोडले त्याचं उत्तर तर द्यायला पाहिजे
पत्रकार परिषद घेतली असती तर विषय भरकलटला असता
म्हणून ठाण्याल सभा घेत आहोत
राज्यात वीज नाही म्हणून माझी सभा दाखवत नाहीत
आजकाल मोबाईवर दिसतं
तुमच्या करंटची गरज नाही
पण ही सभा अनेक राज्यात दाखवली जात आहे, जम्मूसहीत
-
Raj Thackeray Speech LIVE : मनसे अध्यक्ष राज ठाकरे Live
राज ठाकरेंच्या भाषणाला सुरूवात
व्यासपीठावर येताना मला अग्निशमन दलाचा बंब दिसला
इतकी काही आग नाही लावणार
दुपारी मला पोलीस अधिकाऱ्यांचा फोन आला
की आपण किती वाजता निघणार आहात
काही संघटना तुमचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करणार सांगितलं
आम्ही त्यांना पकडून तुमचं निघायचं टायमिंग कळालं की
माझ्या ताफ्याला अडवणार हे पोलिसांना कळलं
पण पवारांच्या घरावरचे आंदोलन इंटेलिजन्सला नाही कळलं
गुढी पाडव्याची सभा झाल्यावर अनेकांनी तारे तोडले
-
Raj Thackeray Speech LIVE : राज ठाकरे मंचावर दाखल
काही क्षणात भाषणाला सुरूवात
-
Raj Thackeray Speech LIVE : वसंत मोरेंच तुफानी भाषण uncut
-
Raj Thackeray Speech LIVE : अमित ठाकरे सभेच्या ठिकाणी दाखल
राज ठाकरेंच्या गाड्याचा ताफाही सभेच्या ठिकाणी
काही क्षणात राज ठाकरेंचं भाषण
-
Raj Thackeray Speech LIVE : प्रकाश महाजनांची तुफान बॅटिंग
आता हे संपादक , यांच्यावर काही कायदेशीर कारवाई झाली,
तर महाराष्ट्राचा अपमान झाला.. महाराष्ट्रात तुझ्या एकट्याचा नाही..
एका संपादकाकडं एवढी संपत्ती आली कुठून..
माझाही मेव्हणा या राज्याचा उपमुख्यमंत्री होता..
पण उद्धवजी तुमच्याच मेव्हण्यावर कशी काय धाड पडली ओ…
शेतात नाला आणि घरात साला… अशी म्हण आहे.
उद्धवजी तुमच्यासोबतही असंच झालंय…
पवारांवर टीका केली तर सह्याद्रीवर टीका…
मला सांगा.. यांचे पोरं टमटममध्ये फिरत होते… यांच्या बुडाखाली ५०-५० लाखाच्या गाड्या कुठून आली..
मला सांगा.. परवा पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचे मीही निंदा करतो.. सुप्रिया सुळेंचा चेहरा डोळ्यासमोर आला..
पालघरमध्ये जेव्हा साधूला ठेचून ठेचून मारलं, तेव्हा तुम्ही कुठे होतात..
आंदोलन भरकटत जातं, जर ते योग्य माणसाच्या हातात गेलं की.. असं पवार म्हणाले होते.. करेक्टच आहे..
बाळासाहेबांनी पवारांशी कधीही राजकीय संबंध ठेवले नाहीत.. आज मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्याचा दारावर गेलात..बाळासाहेबांना काय यातना झाल्या असतील…
-
Raj Thackeray Speech LIVE : बापाच्या लग्नात पोराची मुंज, आदित्य आणि उद्धव ठाकरेंवर प्रकाश महाजन बरसले
भंगारवाल्यांचं समर्थन करणारा माणूस हिंदूंचं नेतृत्त्व करत शकत नाही.. राज ठाकरेंच हिंदूचे खरे नेते होऊ शकतात.. २०१२ चा तो काळ आठवा.. महिला पोलिस कर्मचाऱ्यावर धर्मांध मुसलमानांनी हल्ला केला, आपलंच हुतात्मा स्मारक उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला.. राज ठाकरेंनी काढलेल्या ऐतिहासिक मोर्चानं रझा अकादमी इथं फिरकूही शकली नाही.. नेवासामध्ये त्यांनी पुन्हा प्रयत्न केलाय.. रामनवमीला दगडफेक केलीये…पण त्याचीही चौकशी केलीये.. आज राज ठाकरेंची सभ ऐकण्यासाठी जम्मूच्या कटरामध्ये लोक जाऊन बसले आहेत.. हिंदूना खरा धोका आहे, नव्या हिंदूंनी… महाराष्ट्रात अडीच वर्षांपूर्वी जे राजकारण झालं.. .ते गलिच्छ होतं.. पहिला गुन्हेगार आहे, तो विश्वप्रवक्ता स्वतःला म्हणवतो… जो नोकरी तर मातोश्रीची करतो.. पण रखवाली सिल्वर ओकची करतो… शरद पवारांच्या बिना चिपळ्यांचा नारद ही पदवी मी दिलेली नाही…. केशवराव धोंगडे यांनी ही पदवी दिलीये.. नारदांच्या हातात चिपळ्या नाहीत, तर त्यांनी एवढा गोंधळ घातला.. चिपळ्या असत्या तर केवढा गोंधळ घातला असता.. भाजपसोबत तुमचं काय झालं, याचाही आमचा काहीही संबंध नाही. मी एक सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री करेल.आमच्या एकनाथ शिंदेला वाटलं की सामान्य शिवसैनिकाचा नंबर लागेल.. अरे उद्धवजी स्वर्गीय बाळासाहेबांची प्रतिमा हिमालयासारखी होती.. पण पित्याला दिलेला शब्द सोडला.. मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी… तुम्ही… या ठिकाणी राजसाहेब असते, तर राज ठाकरेंनी लाथ मारली असती खुर्चीला…
-
Raj Thackeray Speech LIVE : ‘माझा नेता कधीही मुसलमानांच्या विरोधात नव्हता’ – सलिम मामा शेख
माझा डीएनएही चेक करण्यात आला, पण मी आज सांगतो, पैंगबरांच्या विचारांचा माझा डीएनए, छत्रपतींच्या विचाराचा माझा डीएनए, संविधान देणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा डीएनए, बलिदान केलेल्या वीरांचा माझा डीएनए
मी काही भाषण करण्यासाठी आलो नाहीये.. मी माझी भूमिका स्पष्ट करण्यासाठी आलो आहे. 2 तारखेला पाडव्याला साहेबांची सभा झाली आणि महाराष्ट्राचं चित्र बदललं गेलं. प्रसारमाध्यमांची लोकं आमच्याशी संपर्क साधत होते. प्रतिक्रिया जाणून घेत होते. आम्ही जे बोललो की आम्ही कायद्यावर बोट ठेवून बोललो… अनेक ठिकाणी माझ्याविरोधात फेसबुक, व्हॉट्सअपवर चुकीचं चित्र रंगवलं गेलं.. माझा डीएनएसुद्धा चेक करण्यात आला.. जगाला शांतीचा संदेश देणारे हजरत मौहम्मद पैंगबर यांच्या विचारांचा माझा डीएनए आहे. ज्यांनी रयतेसाठी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली, त्यांच्या विचारांचा माझा डीएनए आहे. ज्यांना या देशाला संविधान दिलं, त्या आंबेडकरांच्या विचारांचा माझ्यात डीएनए आहे. या देशासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांनी बलिदान केलं.. अशा सर्व वीरांचा डीएनए आहे..
कधी कधी एवढ्या मोठ्या सभेसमोर बोललो नाहीये. पण मी आपल्याला सांगू इच्छितो.. २०१२ ला नाशिक पालिकेच आमची सत्ता होती.. तेव्हा माझी जात न बघता मला सभागृह नेता केला.. नाशिक पालिकेच्या स्थायी समितीची सभापतीही केलं..गटनेता केलं माझा नेता कधीही मुसलमानांच्या विरोधात नव्हता… आणि कधीही नाही…
-
Raj Thackeray Speech LIVE : राज ठाकरेंचं भाषण Live
-
Raj Thackeray Speech LIVE : संदीप देशपांडे Live
पुण्याचे आमचे वैचारीक नेते कुणी असतील, तर तात्या मोरे आहेत.. तात्यांचे आभार मानतो… पाडव्याला भूतो न भविष्यती सभा झाली. कोरोना काळानंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि पहिली राजकीय सभा झाली असेल तर ती मनसेची झाली, राज साहेबांची झाली.. अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष, या सभेवर होतं. राजसाहेबांनी प्रखर परखड विचार सभेत मांडले. मशिनगन फायरींग करते, तसं फायरींग झालं, आणि बरेचशे लोक त्यात घायाळ झाले.. घायाळ झालेले लोक बडबडायला लागले. हल्ली कसं झालंय, की इतिहास माहीत नाही, त्यामुळे पुण्याईवर काही नेते बोलू लागलेय मनसे अमूक अमूकची बी टीम आहे.. असं म्हणू लागले.. आदित्य ठाकरे असंही म्हणाले संपलेल्या पक्षांवर मी बोलत नाही.. जरा शिवसेनेचा इतिहास आपण तपासून घ्या.. याच शिवसेनेला वसंतसेना असं म्हटलं जायचं.. वसंत सेना का म्हटलं जायचं..? तर वसंतरावांनी त्या पुर्नजीवन शिवसेनेला दिलेलं… मुंबई महाराष्ट्रापेक्षा वेगळी गेली जाईल.. असं म्हटलं.. त्यावेळी वसंतसेना ती आताची शरदसेना असा मोठा प्रवास आहे… त्यांनी आमच्याबद्दल नाही बोलायचं… काँग्रेस म्हणते सेना आमची बी टीम, राष्ट्रवादी म्हणतं आमची बी टीम..
डोळा एकाला मारलं, प्रेम एका बरोबर केल,, लग्न एकाबरोबर आणि हनिमून चौथ्या बरोबर केलं.. आणि तुम्ही आम्हाला विचारणार प्रश्न.. राजसाहेबांनी जी भूमिका घेतली ती ठामच घेतली आहे..
-
Raj Thackeray Live : Vasant More Live : नाराज वसंत मोरेंची ठाण्यातून डरकाळी
पुण्यात कोरोना काळात सरकारच्या माध्यमातून जी काम होणं अपेक्षित होतं ती कामं झाली नाहीत. त्यावेळी फक्त मनसे काम करत होती. तुम्ही त्या गोष्टी उघड्या डोळ्यांनी पाहिली आहेत. सगळे नेते आपल्या घरात बसलेले असताना मनसे पदाधिकारी रस्त्यावर होते. एक एम्बेसेडरची काच फुटली आणि त्याचा आवाज सगळ्या महाराष्ट्राने ऐकला. ज्या ठिकाणी ऑक्सिजनची गरज होती तिथे आमचा मनसैनिक जात होता. सरकार जी कामं करत नव्हते ती कामं आम्ही करत होतो. आमचा साईनाथ 5 – 5 हजार लोकांना जेवण देत होता. आम्ही दवाखाने उभे केले.
कोरोनाचा ट्रेन्ड बदलत गेला तसा फायनान्स, बँकवाले प्रत्येकाच्या दारात उभे राहायला लागले. अशावेळी फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दारं उघडी होती. फायनान्सवाला, बँकवाला आला की मनसेवाला आठवतो, मग निवडणुकीच्या काळात मनसे का आठवत नाही?
गेल्या दोन तीन महिन्यात राज साहेबांच्या तब्येत अडचणी सुरु आहेत. कालही त्यांना होणारा त्रास मला जाणवत होता. आम्ही सगळ्यांनी पाहिलं आहे की एक पायरी चढणं मुश्किल होतं तिथे ते 10 पायऱ्या चढून कार्यकर्त्याच्या घरी जात होते. राजसाहेबांच्या ब्लू प्रिंटचं काम पाहायलं असेल तर कात्रज आणि कोंढव्यात या. पुणे महापालिकेत आम्ही दोनच नगरसेवक आहोत. तरीही चर्चेतील चेहरा हा पुरस्कार मनसेच्या नगरसेवकाला जातो. म्हणजे मनसे नक्कीच चांगलं काम करत आहे.
16 वर्षात 16 उद्यानं निर्माण करणारा मी एकमेव नगरसेवक आहे. मला पुरस्कार देताना चंद्रकांतदादा आणि सुप्रिया सुळे होत्या. तेव्हा चंद्रकांतदादा म्हणाले तुम्ही भाजपमध्ये या. तेव्हा मी दादांना म्हणालो मी 15 वर्षे भाजपच्याच उमेदवाराला पाडून नगरसेवक होत आलोय.
-
Raj Thackeray Live : Vasant More : वसंत मोरे यांचं ठाण्यातलं भाषण
कोविड काळात सरकार आणि पालिकेने काम केले नाही काम केले मनसेने
पुण्यात सर्व पक्षामधील नेते घरी होते
जो स्पीड आम्ही पुण्यात घेतला, जी अंबिसेटर काच फुटली आणि सर्वांनी धसका घेतला
ऑक्सिजनची गरज होती त्या ठिकाणी मनसे जात होती..
पुण्यात कोविड काळात मनसेने काम केले
दवाखाने उभे केले ते आम्ही काम केले
कोविड काळात फायनासवाले येत होते
तेव्हा फक्त मनसे आठवतो
ज्या वेळी निवडणूका लागतात तेव्हा का मनसेवाले आठवत नाही
फक्त गाण्यापुरतं आपण मर्यादित राहणार आहे का आपण.. नुसती गाणी वाजवून चालणार नाहीये…
चर्चेतील चेहरा म्हणून मला पुरस्कार मिळाला
-
Raj Thackeray Live : सुजात आंबेडकरांचा मनसेकडून समाचार
राज ठाकरे विरोधकांवर पुन्हा तोफ डागण्यासाठी पुन्हा सज्ज
सर्व गैरसमज दूर होतील
इतर पक्षांचे भोंगे शांत होतील-मनसे
-
Raj Thackeray Live : राज ठाकरेंचं भाषण इथे लाईव्ह बघा
-
Raj Thackeray LIVE : राज ठाकरेंच्या सभेला आयोध्येतून लोक दाखल
जय श्रीरामच्या घोषणा
राज ठाकरेंची सभा जम्मू काश्मीरमध्येही दाखवणार
काश्मिरी पंडितांची सभा दाखवण्याचा निर्णय
राज ठाकरेंच्या सभेची काश्मीरमध्ये स्क्रीन
-
Raj Thackeray LIVE : राज ठाकरेंचा पुन्हा टीझरमधून इशारा
गुढी पाडव्याच्या सभेनंतर पुन्हा इशारा
पुन्हा मनसेची तोफ धडाडणार
मनसैनिकांची सभेला तुफान गर्दी
ठाण्यात राज ठाकरेंची वादळी सभा
-
Raj Thackeray LIVE : काही मध्येच उतरून कार्यकर्त्यांशी संवाद साधला
-
Raj Thackeray LIVE : आदित्य ठाकरेंवर मनसेचा पलटवार
-
Raj Thackeray LIVE : काही वेळातच राज ठाकरेंची सभा सुरू होणार
विरोधकांना राज ठाकरे जोरदार प्रत्युत्तर देणार
ठाण्यातून लाव रे तो व्हिडिओ पार्ट टू
-
Raj Thackeray Live : राज ठाकरे ठाण्यात पोहोचणार
-
Raj Thackeray Live : वार खूप सुटलंय-मनसे
#उत्तरसभा pic.twitter.com/7HCIZPujpS
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 11, 2022
-
मनसेकडून टीझर पे टीझर
माझ्या मराठीला नख लावायचा प्रयत्न केला तर मी मराठी म्हणून अंगावर जाईन…
आणि माझ्या धर्माला नख लावायचा प्रयत्न केला तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन…#उत्तरसभा #ठाणे pic.twitter.com/W3fLSxNo80
— Gajanan Kale (@GajananKaleMNS) April 12, 2022
-
Raj Thackeray LIVE : ठाणे मनसे जिल्हाध्यक्षांचा इशारा
उत्तर ?? बेगडी हिंदुत्वाला.. उत्तर ?? सामान्य माणसाच्या फसवणूकीला.. उत्तर ?? महाराष्ट्र लुबाडणाऱ्या लुटारूना.. उत्तर ?? स्वाभिमान गहाण ठेवणाऱ्या प्रवृतिना..
मोठया संख्येने ‘राज’विचारांना ऐकण्यासाठी नक्की या…#उत्तरसभा
— avinash jadhav (@avinash_mns) April 11, 2022
-
Raj Thackeray Live : मनसेचं ट्विट
सत्ताधाऱ्यांच्या मनात एकच भीती- मा. श्री. राजसाहेब ठाकरे आज काय बोलणार?#उत्तरसभा #MNSAdhikrut pic.twitter.com/QoJ1H4aK4J
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) April 12, 2022
-
Raj Thackery Live : राज ठाकरे ठाण्याकडे रवाना
-
ठाणे
‘राज तिलक की करो तयारी, आ रहे है भगवा धारी’ अशा प्रकारे हातात बोध चिन्ह घेऊन पालघरवरून महाराष्ट्र सैनिक तुलसी जोशी यांनी हनुमानाच्या रुपात सभेच्या ठिकाणी एका व्यक्तीला आणलेय
तो व्यक्ती अयोध्यामधून आला असून राज ठाकरे यांची चाहता आहे
जय श्रीरामचे नारे देत हे ठाण्यातील सभेत आले आहे सोबत भोगा देखील आणला आहे
या उत्तर सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
Published On - Apr 12,2022 2:35 PM