राजीव सातवांच्या मुलाला दहावीत 98.33 टक्के, सुप्रिया सुळे म्हणतात, आज राजीव असते तर
वघ्या 46 व्या वर्षी त्यांचं निधन झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली गेली. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर पुष्कराजनं आणलेलं सकारात्मक यश कौतुकास्पद आहे.
काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव आणि प्रज्ञा सातव यांचा मुलगा पुष्कराजनं दहावीच्या परिक्षेत 98.33 टक्के एवढे गुण मिळवलेत. आजच (ICSE)बोर्डाचा निकाल जाहीर झालाय. त्यात पुष्कराज राजीव सातवनं हे यश मिळवलं आहे. त्याच्या ह्या यशाबद्दल राष्ट्रवादीच्या खासदार, नेत्या सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत अभिनंदन केलंय. पुष्कराज हा पुण्यातल्या बिशप स्कूलचा विद्यार्थी आहे.
तर राजीवना आनंद झाला असता राजीव सातव यांचं कोरोनामुळे 16 मे रोजी पुण्यात निधन झालंय. त्यानंतर कुटुंबाला खडतर वेळेचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीतही पुष्कराजनं मिळवलेलं शैक्षणिक यश कौतुकास्पद आहे. सुप्रिया सुळेंनी ट्विटमध्ये म्हटलंय- राजीव सातव आज असते तर त्यांना आपल्या मुलाचं यश पाहून खुप आनंद झाला असता. राजीव आणि प्रज्ञा यांचा मुलगा पुष्कराज याने इयत्ता दहावीच्या परीक्षेत (ICSE) ९८.३३ टक्के गुण मिळविले. त्याच्या या यशाबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन. पुष्कराज, खुप मोठा हो ! आम्हा सर्वांना तुझा अभिमान वाटतो.
राजीव सातव आज असते तर त्यांना आपल्या मुलाचं यश पाहून खुप आनंद झाला असता. राजीव आणि प्रज्ञा यांचा मुलगा पुष्कराज याने इयत्ता दहावीच्या परीक्षेत (ICSE) ९८.३३ टक्के गुण मिळविले. त्याच्या या यशाबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन. पुष्कराज, खुप मोठा हो ! आम्हा सर्वांना तुझा अभिमान वाटतो.
— Supriya Sule (@supriya_sule) July 24, 2021
पुष्कराजला 4 विषयात पैकीच्या पैकी पुष्कराज राजीव सातवची गुणपत्रिकाही पहाण्यासारखी आहे. सर्वसाधारणपणे जे विषय आपल्याकडे अवघड, बोजड समजली जातात त्यात त्यानं पैकीच्या पैकी गुण मिळवलेत.
- इंग्रजी भाषा- 90
- इंग्रजी साहित्य- 100
- हिंदी- 99
- इतिहास आणि नागरिकशास्त्र- 98
- भूगोल- 100
- कमर्शिअल स्टडिज-100
- अर्थशास्त्र 100
- संगणक अॅप्लिकेशन्स- 97
याचाच अर्थ असा की, पुष्कराजनं चार विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवलेत. तर हिंदीसारख्या अवघड समजल्या जाणाऱ्या भाषा विषयातही त्यानं 99 मार्कस घेतलेत.
प्रियंका गांधींचीही भेट अलिकडेच म्हणजेच 22 जुलैला प्रज्ञा सातव यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांची दिल्लीत भेट घेतलीय. या भेटीदरम्यान पुष्कराजही प्रज्ञा सातव यांच्यासोबत होता. त्यांच्या भेटीचा फोटोही प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत होता. प्रज्ञा सातव ह्या राजकीय भूमिकेत दिसणार की काय अशीही चर्चा सुरु झाली होती. अजून तरी प्रज्ञा सातव यांनी प्रियंका गांधीसोबतच्या भेटीबद्दल खास काही बोललेलं नाही. त्यानंतर आता पुष्कराजनं मिळवलेल्या यशाची चर्चा होतेय.
कोण होते राजीव सातव? राजीव सातव हे काँग्रेसचे राज्यसभा खासदार होते. त्यांना कोरोना झाला आणि पुण्यात ते जवळपास महिनाभर कोरोनाशी झुंज देत होते. अखेर त्यांचं 16 मे रोजी निधन झालं. राजीव सातव हे गुजरातचेही काँग्रेस प्रभारी होते. तसच हिंगोलीतूनही ते लोकसभेवर निवडुण गेले होते. अवघ्या 46 व्या वर्षी त्यांचं निधन झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली गेली. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर पुष्कराजनं आणलेलं सकारात्मक यश कौतुकास्पद आहे.
(Rajeev satav son pushkraj scores 98.33 percent in 10th icse board result supriya sule congrats)