आगीच्या घटनांमुळे महाराष्ट्र होरपळला, राजेश टोपे यांनी सांगितला ‘मास्टर प्लॅन,’ अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करणार

अहमदनगर जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत तब्बल 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर राज्यात खळबळ उडाली. तसेच रज्य सरकारच्या कारभारावर मोठी टीका केली जाऊ लागली. राज्य सरकारला लक्ष्य केल्यानंतर आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अशा प्रकारच्या घटना भविष्यात होऊ नयेत म्हणून काय करायला हवं हे सांगितलं आहे. ते पुण्यात बोलत होते.

आगीच्या घटनांमुळे महाराष्ट्र होरपळला, राजेश टोपे यांनी सांगितला 'मास्टर प्लॅन,' अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करणार
Follow us
| Updated on: Nov 07, 2021 | 6:35 PM

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत तब्बल 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर राज्यात खळबळ उडाली. तसेच रज्य सरकारच्या कारभारावर मोठी टीका केली जाऊ लागली. राज्य सरकारला लक्ष्य केल्यानंतर आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अशा प्रकारच्या घटना भविष्यात होऊ नयेत म्हणून काय करायला हवं हे सांगितलं आहे. त्यांनी मास्टर प्लॅन सांगितला असून सर्व गोष्टी अमलात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुण्यात बोलत होते.

ICU विभागात CCTV मॉनिटरिंग केलं पाहिजे

“36 जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र फायर ऑडिटसाठी पद दिलं पाहिजे. ICU विभागात CCTV मॉनिटरिंग केलं पाहिजे. जे या विभागात काम करतात त्यांना ट्रेनिंग दिले गेले पाहिजे. या सर्व गोष्टी अमलात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत,” असे राजेश टोपे म्हणाले.

प्रशासकीय जबाबदारी पार न पाडणाऱ्यांविरोधात कारवाई होणार 

तसेच पुढे बोलताना त्यांनी अहमदनगर जिल्हा रुग्णालयात झालेल्या दुर्घटनेमध्ये दोषी असणाऱ्यांवर काय कारवाई केली जाईल याची माहिती दिली. 7 दिवसानंतर आलेल्या अहवालात जर सिव्हिल सर्जन किंवा कोणीही प्रशासकीय जबाबदारी पार पडलेली नसेल तर त्याची गंभीर दखल घेतली जाईल. उद्यापर्यंत मृतांच्या नातेवाईकांना धनादेश दिले जातील. आज प्रातिनिधिक स्वरूपात एक कुटुंबाला धनादेश दिलाय. 5 लाख रुपये सहाय्यता निधीतून आणि 2 लाख रुपये NDRF मधून असे एकूण 7 लाख रुपये दिले जातील,” असे टोपे यांनी सांगितले.

नेमकं काय घडलं होतं ?

अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू विभागाला आग लागल्याची घटना घडली. ही आग एवढी भीषण होती की यामध्ये एकूण 11 जणांचा होरपूळून मृत्यू झाला असून काही रुग्ण जखमी झाले आहेत. आगामी काळात मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आग लागल्यानंतर घटनेची माहिती मिळताच अग्नशमन दल घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर वायुवेगाने आग विझविण्याची मोहीम हाती घेण्यात आली. याच वेळेत बाकीच्या 20 जणांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं. नंतर या घटनेची माहिती होताच जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ नगरकडे रवाना झाले होते.

सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेले आहेत. तसेच झालेल्या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त करुन सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी असेदेखील ठाकरे यांनी सांगितलंय.

इतर बातम्या :

ऋषिकेश देशमुखांना ओळखत नाही, नवाब मलिक, वळसे-पाटलांना कधीच भेटलो नाही; सुनील पाटलांनी आरोप फेटाळले

‘मी मास्टरमाईंड नाही, समीर वानखेडेंशीही संपर्क नाही’, सुनील पाटील यांचं माध्यमांसमोर स्पष्टीकरण

मनिष भानुशालीने 1 तारखेला यादी दिली, त्यात आर्यन खानचं नाव नव्हतं; सुनील पाटील यांचा पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर गौप्यस्फोट

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.