Corona Updates: लॉकडाऊन, मुंबई लोकल ते राजकीय सभा, पवारांनी टोपेंना कोणत्या सूचना दिल्या?

मुंबईः राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांना काय सूचना केल्या, याबद्दल राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी प्रतिक्रिया दिली. रुग्णसंख्या वाढत असली तरीही मुंबईची लोकल बंद करण्यासंदर्भात निर्णय झालेला नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं. पवारांनी कोणत्या सूचना केल्या? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, […]

Corona Updates: लॉकडाऊन, मुंबई लोकल ते राजकीय सभा, पवारांनी टोपेंना कोणत्या सूचना दिल्या?
आरोग्य मंत्री राजेश टोपे
Follow us
| Updated on: Jan 06, 2022 | 2:58 PM

मुंबईः राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांना काय सूचना केल्या, याबद्दल राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी प्रतिक्रिया दिली. रुग्णसंख्या वाढत असली तरीही मुंबईची लोकल बंद करण्यासंदर्भात निर्णय झालेला नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं.

पवारांनी कोणत्या सूचना केल्या?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये आज आढावा बैठक झाली. त्यानंतर राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले,

– ज्या गोष्टींमुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो, त्या गोष्टींवर आधीच निर्बंध आहेत. मात्र कठोर निर्बंध लावण्याच्या सूचना द्या. – तसेच लसीकरण वाढवण्यासाठी शक्य तेवढी कठोर पावलंही उचलण्याच्या सूचना पवार यांनी दिल्या. – लसीकरण कसं वाढेल, यासाठी आम्हीदेखील प्रयत्न करू, असं आश्वासन पवार यांनी दिलं. – गॅदरींग, मेळावे, जे आहेत, यासंदर्भातल्या सूचना कठोरपणे पाळल्या पाहिजेत. – अनावश्यक गोष्टींसाठी एकत्र येणे टाळले पाहिजे.

लसीकरणासंबंधी काय चर्चा?

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, आजही 70 ते 80 लाख लोकांनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही. अनेकांनी फक्त पहिला डोस घेतला आहे. दुसरा डोस राहिलाय. या सगळ्यांचे कशा रितीने प्रबोधन करता येईल, याविषयीच्या सूचना शरद पवार यांनी मागवल्या. तसेच 10 जानेवारीनंतर कोमॉर्बिड आणि 60 वर्षे वयापुढील व्यक्तींसाठी प्रीकॉशन व्हॅक्सीन उपलब्ध होणार आहे. पवार हेदेखील ही लस घेतील, अशी शक्यता आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केली.

लॉकडाऊनसंदर्भात काय मुद्दे मांडले?

शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मुंबई, ठाणे, पुणे, आदी शहरांमध्ये हळू हळू शाळा-कॉलेज बंद होत आहेत. मात्र हे बंद झाल्यावर मुले रस्त्यावर, मॉलमध्ये, हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये फिरू लागली तर शाळा-कॉलेज बंद करण्याला काहीच अर्थ नाही. त्यामुळे रुग्ण संख्या अशीच वाढत राहिली तर काहीतरी आणखी ठोस निर्णय घ्यावा लागू शकतो, अशी शक्यता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली.

इतर बातम्या-

राज्यभरात सोयाबीनचीच चलती, दर स्थिरावल्याचा बाजार समित्यांवर काय परिणाम?

VIDEO: ओबीसींना आरक्षण कसं आणि कुणामुळे मिळालं?, प्रश्न तुमचे आणि उत्तर जितेंद्र आव्हाडांचं; वाचा आव्हाडांची मुलाखत जशीच्या तशी!

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.