राजू शेट्टी अचानक रुग्णालयात दाखल; आयसीयूत उपचार सुरू

पुणे: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना अस्वस्थ वाटू लागल्याने पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शेट्टी यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती उत्तम असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं आहे. (raju shetti admitted in dinanath mangeshkar hospital) आज सकाळी साडे अकराच्या सुमारास माजी खासदार राजू शेट्टी दिल्लीवरून पुण्यात आले होते. पुण्यात […]

राजू शेट्टी अचानक रुग्णालयात दाखल; आयसीयूत उपचार सुरू
Follow us
| Updated on: Oct 28, 2020 | 4:24 PM

पुणे: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना अस्वस्थ वाटू लागल्याने पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शेट्टी यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती उत्तम असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं आहे. (raju shetti admitted in dinanath mangeshkar hospital)

आज सकाळी साडे अकराच्या सुमारास माजी खासदार राजू शेट्टी दिल्लीवरून पुण्यात आले होते. पुण्यात विमानतळावर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवादही साधला होता. मात्र, नंतर त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तात्काळ दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांचा ईसीजी काढण्यात आला. त्यानंतर मात्र, डॉक्टरांनी त्यांना तातडीने अॅडमिट होण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर शेट्टी रुग्णालयात अॅडमिट झाले आहेत. त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती ठिक असून त्यांना सध्या कोणताही त्रास होत नाही. केवळ डॉक्टरांच्या निगराणीखाली त्यांना ठेवण्यात आल्याचं शेट्टी यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं. दरम्यान, राजू शेट्टी नेहमी दिनानाथ रुग्णालयात रुटीन चेकअपसाठी दाखल होतात, असंही या निकटवर्तीयांनी सांगितलं.

शेट्टी काय म्हणाले होते?

दरम्यान, विधान परिषदेच्या जागेसंदर्भात माझी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट झाली होती. राज्यपाल कोट्यातून एक जागा स्वाभीमानीला देण्याचं ठरलं होतं. पण तीन महिन्यानंतर काय झालं मला माहिती नाही. आता राष्ट्रवादीकडून कुठलाही निरोप नाही”, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. तीन महिन्यांपूर्वी राजू शेट्टी यांनी बारामतीमध्ये जात शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कोट्यातून एक जागा स्वाभिमानीला देण्याचा शब्द त्यांनी दिला होता, पण आता काय झालं, मला माहिती नाही, असं शेट्टी म्हणाले होते.

संबंधित बातम्या:

खासदार बंडू जाधव यांना आलेल्या धमकीची गंभीर दखल : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

शिवसेनेचा भगवा फडकवा, हे 30 वर्षांपासून ऐकतोय : शरद पवार

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.