Rajyasabha Election : शिवसेनेनं संभाजीराजेंना डावल्यानंतर मराठा संघटना खवळल्या, निवडणुकीत जागा दाखवून देण्याचा इशारा
मराठा समाज, बहुजनांचे मतदान हवे असेल तर आज छत्रपतीना बिनविरोध राज्यसभेत पाठवा, अन्यथा पक्षाचा प्रोटोकॉल पाळायचा असेल तर येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्रातील लोक प्रतिनिधींना मराठा समाज त्यांची जागा दाखवेल, असा इशारा गायकर यांनी दिला आहे.
मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून (Rajyasabha Election) राज्यात सध्या राजकारण तापलं आहे. छत्रपती संभाजीराजेंना (Sambhajiraje) विनाशर्त पाठिंबा द्यावा अशी मागणी सर्वच राजकीय पक्षांकडे मराठा संघटनांकडून करण्यात येत होती. मात्र शिवसेनेकडून संजय पवार (Sanjay Pawar) यांची उमेदवारी घोषित करण्यात आली. तसेच संभाजीराजेंना डावलण्यात आलं आहे. त्यामुळे आता मराठा संघटना खवळल्या आहेत. यावरून आता मराठा क्रांती मोर्च्याच्या करण गायकर यांनी शिवसेनेला जागा दाखवून देऊ असे म्हणत एल्गार पुकारला आहे. शिवसेनेच्या दाबाव तंत्राला आम्ही घाबरत नाही. संभाजी महाराजांच्या राज्यसभेच्या निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. विजयासाठी लागणाऱ्या 42 मतांची जलावजुळव झाली आहे. 5 ते 6 मतांची कमी असल्याने त्याची जुळवाजुळव चालू आहे. मराठा समाज, बहुजनांचे मतदान हवे असेल तर आज छत्रपतीना बिनविरोध राज्यसभेत पाठवा, अन्यथा पक्षाचा प्रोटोकॉल पाळायचा असेल तर येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्रातील लोक प्रतिनिधींना मराठा समाज त्यांची जागा दाखवेल, असा इशारा गायकर यांनी दिला आहे.
मराठा संघटनांचा कडकडीत इशारा
संजय राऊत तुमचा सत्तेचा माज आम्ही शिवभक्त उतरवल्या शिवाय राहणार नाही असे प्रत्युत्तर अंकुश कदम समन्वयक- मराठा क्रांती मोर्चा यांनी दिले आहे. तर विनोद पाटील यांनीही यावरून जोरदार हल्लाबोल चढवला आहे. राजेंना पाठिंब न देणे हे खेजनक असल्याची प्रतिक्रिया विनोदी पाटील यांनी दिली आहे. तर राज्यसभेच्या 6 व्या जागेच्या बाबतीत नाक खुपसू नये. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व शरद पवार राजेंच्या उमेदवारीबाबत पॅाजिटिव्ह आहेत. संजय राऊत तुम्हाला किमंत चुकवावी लागेल, असे छावा संघनेचे धनंजय जाधव म्हणाले आहेत.
संजय राऊत काय म्हणाले?
काही वेळापूर्वीच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संजय पवार यांच्या नावाची घोषणा केली आहे. संजय पवार हे नाव शिवसेनेकडून फायनल झाले आहे आहे. संजय पवार हा शिवसेनेचा मावळा आहे आणि उद्धव ठाकरेंनी या मावळ्याला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतलाय.पण याची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल.दोन्ही सेनेचे उमेदवार विजयी होतील.पवार कडवट शिवसैनिक आहेत, पक्के मावळे आहेत आणि मावळे असतात म्हणून राजे असतात. शिवसेनेच्या दृष्टीने सहाव्या जागेचा चाप्टर क्लोज झालाय. नक्कीच संभाजीराजेंचा सन्मान ठेवतोय. त्यांच्या गादीविषयी, घराण्याविषयी आदर आहे. त्यासाठीच आम्ही तुम्ही सेनेचे उमेदवार व्हा म्हणून सहाव्या जागेचा प्रस्ताव ठेवला, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.
राजेंना पक्षाचे वावडे असू नये
तसेच आम्ही कुणाच्या प्रश्नांना उत्तर द्यायला बांधिल नाही. त्यांना सेनेचा इतिहास माहिती नाही. एकनाथ ठाकूर शिवसैनिक होते. वरिष्ठ शाहूराजे, मालोजीराजे शिवसेनेत होते. त्यामुळं राजेंना पक्षाचे वावडे असू नये. शिवसेनेचे दोन संजय राज्यसभेत जाणार. मी एक आहेच व दुसरे संजय पवार, असेही यावेळी राऊत म्हणाले आहेत.