50 वर्षे ‘मातोश्री’सोबत काढली, आम्हाला तोंड उघडायला लावू नका? रामदास कदम यांचा उद्धव ठाकरेंना इशारा?
लंडनला तुमचे काय आहे, अमेरिकेत तुमचे काय आहे. श्रीलंकेत तुमचे काय आहे. इतर कुठे कुठे काय काय आहे? आम्हाला सर्व माहीत आहे. आम्ही सुद्धा 50 वर्षे 'मातोश्री'सोबत काढली आहे. आम्हाला तोंड उघडायला लावू नका.

उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले. शिवसेनाप्रमुख स्वत: मुख्यमंत्री होवू शकले नसते का? पण ते झाले नाही. परंतु उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद घेवून सर्व काही गमावले. त्यांनी मुख्यमंत्री पद घेतले नसते तर शिवसेना फुटली नसती. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे दहा-पंधरा लोक राहिले आहेत, त्यातील एकही दोन वर्षांत राहणार नाही. एक दिवस असा येईल की रात्री दोन वाजता तुम्हाला हा देश सोडून लंडनला जावे लागेल. लंडनला तुमचे काय आहे, अमेरिकेत तुमचे काय आहे. श्रीलंकेत तुमचे काय आहे. इतर कुठे कुठे काय काय आहे? आम्हाला सर्व माहीत आहे. आम्ही सुद्धा 50 वर्षे ‘मातोश्री’सोबत काढली आहे. आम्हाला तोंड उघडायला लावू नका. एकनाश शिंदे यांच्या विरोधात बोलला तर याद राखा, असा इशारा शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.
माजी आमदार सुभाष बने, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, पराग बने यांनी शनिवारी शिवसेनेत प्रवेश केला. तसेच माजी जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हा प्रमुख विलास चाळके, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रचना महाडिक यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी रामदास कदम बोलत होते.
असा मुख्यमंत्री पहिला नाही…
शिवसेना प्रमुखांनी कमावले तुमचे त्यात काय योगदान आहे. तुम्हाला सर्व आयते मिळाले, असा हल्ला रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर चढवला. ते म्हणाले, कोकणातील ही भगवी लाट पाहिली. आनंद झाला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना प्रमुखांचे विचार जिवंत ठेवले. एकनाश शिंदे यांनी दिवसरात्र काम केले. मी अनेक वर्ष विधिमंडळात होतो. पण रात्रंदिवस काम करणारा असा मुख्यमंत्री पाहिला नाही, असे रामदास कदम यांनी म्हटले.




रामदास कदम यांना आदित्य ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला. ते म्हणाले, कोणाची चुक झाली, याबाबत तुम्ही आत्मपरिक्षण केले पाहिजे. ते एवढेसे पिल्लू पेग्विन आम्हाला शिकवतो. तुमची औकत काय? सर्व शिवसेना प्रमुखांनी कमवले, तुमचे योगदान काय? असा सवाल रामदास कदम यांनी उपस्थित केला.