Raosaheb Danve : ‘मतदारांची अपेक्षा छोटी, पण त्यांचं ऐकलं नाही तर तो कानशिलात लगावतो’, रावसाहेब दानवेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

आमची तुमच्याकडून फार छोटी अपेक्षा आहे. आम्ही तुम्हाला मतदान केलं. मतदारांचं काम होत नसेल तर तो कानात सांगतो, बैठकीत सांगतो, सभांमध्ये सांगतो, तरीही तुम्हाला ऐकू येत नसेल तर मग अशा आक्रोशातून मतदार सांगत असतो.

Raosaheb Danve : 'मतदारांची अपेक्षा छोटी, पण त्यांचं ऐकलं नाही तर तो कानशिलात लगावतो', रावसाहेब दानवेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 23, 2022 | 9:18 PM

औरंगाबाद : पाणी प्रश्नावरून (Water issue)औरंगाबाद शहरातील राजकारण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात भाजपकडून जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो भाजप कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले. रिकाम्या घागरी, हंडे हातात घेऊन महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी भापजने ठाकरे सरकारवर टीका केली. तर मतदारांची अपेक्षा छोटी आहे. पण त्यांचं ऐकलं नाही तर तो कानशिलात लगावतो असे भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी (BJP leader and Union Minister Raosaheb Danve)मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तर यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला थेट इशारा दिला. आम्ही सत्ता बदलायची तेव्हा बदलू, आता भ्रष्टाचाऱ्यांची भ्रष्ट व्यवस्था बदलायची आहे असा घणाघात फडणवीस यांनी केला. तसंच भाजप नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची आठवणही फडणवीस यांनी यावेळी काढली.

तसेच भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करताना, फडणवीस मुख्यमंत्री असताना 1680 कोटींची योजना दिली. सरकार बदललं, असंगाशी संग केला. युती भाजपशी केली पण आमची मतं चोरल्याचा आरोप त्यांनी शिवसेनेवर केला. तर चोर सापडला आहे. तसेच सप्टेबर ऑक्टोबरमध्ये महापालिका निवडणूकीत लागण्याची शक्यता आहे. त्यातच त्यांना शिक्षा द्यायची आहे. ती शिक्षा जनता देईल असेही दानवे म्हणाले.

दोन मंत्री जेलात आणि मुख्यमंत्री घरात

यावेळी दानवे यांनी जोरदार हल्ला करत म्हटले की, दोन मंत्री जेलात आणि मुख्यमंत्री आपल्या घरात अशी स्थिती या राज्याची झाली आहे. कोविडमध्ये भाजपचे आमदार, खासदार, विरोधी पक्षनेते शेतकऱ्यांजवळ गेले. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पण मुख्यमंत्री घरातच बसले होते. मुख्यमंत्री ठाकरे यांनी घोषणा दिली माझं कुटुंब, माझी जबाबदारी. पण राज्यातील 12 कोटी जनता तुमचं कुटुंब नाही का? असा सवालही दानवे यांनी उपस्थित केला.

हे सुद्धा वाचा

अपयशाचं खापर तुम्ही केंद्रावर का फोडता?

तर ज्यावेळी फडणवीस म्हणाले मुख्यमंत्री घरात, आम्ही तुमच्या दारात तेव्हा मुख्यमंत्री बाहेर पडले. ते सोलापूर, उस्मानाबादला गेले. शेतकरी, व्यावसायिकांनी पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली तेव्हा ते म्हणाले, माझं कुटुंब, माझी जबाबदारी. जी गोष्टी तुमच्याकडून होत नाही त्याचं खापर तुम्ही केंद्रावर का फोडता? आमची तुमच्याकडून फार छोटी अपेक्षा आहे. आम्ही तुम्हाला मतदान केलं. मतदारांचं काम होत नसेल तर तो कानात सांगतो, बैठकीत सांगतो, सभांमध्ये सांगतो, तरीही तुम्हाला ऐकू येत नसेल तर मग अशा आक्रोशातून मतदार सांगत असतो. आम्ही जनतेचा आवाज ऐकतो. तुम्हीही संभाजीनगरची हाक ऐका. तुम्ही त्यांची हाक ऐकत नसाल तर तुमच्या कानशिलात लावल्याशिवाय ते राहणार नाहीत असा इशारा ही दानवे यांनी ठाकरे सरकारला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.