वाशिष्ठी नदीचं रौद्ररूप, चिपळूणमध्ये घरात-बाजारपेठेत-दुकानांमध्ये पाणीच पाणी; पाहा Exclusive दृश्ये…
Chiplun Flood Vashishthi River Water Lavel : चिपळूणला पुन्हा पुराचा धोका; नाईक कंपनी परिसरामध्ये पाणीच पाणी; पाहा व्हीडिओ...
चिपळूण, रत्नागिरी | 25 जुलै 2023 : राज्यात सर्वत्र धो-धो पाऊस कोसळतोय. कोकणातही मुसळधार पाऊस बरसतोय. रत्नागिरीतही पावसाचा जोर कायम आहे. अशात रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहराला पुन्हा एकदा पुराचा धोका संभवतो आहे. वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. अशातच आता चिपळुणातील बाजारपेठांमध्ये पावसाचं पाणी शिरलं आहे.
चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीने रौद्ररूप धारण केलं आहे. चिपळूणमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. अशातच नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.
चिपळूणमधील बाजारपेठेतील दुकानांमध्ये पाणी शिरलं आहे. त्यामुळे चिपळूण शहराला पुराच्या पाण्याचा धोका वाढला आहे. चिपळूण नाईक कंपनी परिसरामध्ये पाणीच पाणी पाहायला मिळतं आहे. या परिसरात दुकानाच्या पायऱ्या पाण्याखाली गेल्या आहेत. बाजारपेठेमधील रस्ता देखील पाण्याखाली गेले आहेत.
रत्नागिरीत जोरदार पाऊस होतोय. पावसाचा जोर कायम राहिला तर चिपळूण शहराला पुन्हा एकदा पुराचा धोका संभवतो आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
2021 ला चिपळूण शहराला पुराच्या पाण्याने वेढलं होतं. अख्ख शहर पाण्याखाली गेलं होतं. त्यामुळे स्थानिकांच्या घरांचं मोठं नुकसान झालं होतं. शेतीही वाहून गेली होती. यंदाही जर पावसाचा जोर कायम राहिला तर चिपळूणला पुन्हा पूर येण्याची शक्यता आहे.
Exclusive दृश्ये…
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातही मुसळधार पाऊस होतोय. खेडच्या जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे खेड शहराला पुराचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
तर रायगड परिसरात मुसळधार पावसाळा सुरूवात झाली आहे. आज रायगड सह अन्य जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सततच्या पावसामुळे नद्याना मोठ्या प्रमाणात पाणी आलं आहे. अशात सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
राज्यात पुढील पाच ते सहा दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 25 ते 30 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा हवामान विभागाचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं देशभरात सगळीकडे पावसाची शक्यता आहे. राज्यात सगळ्या विभागातील पाण्याची तुट भरून निघेल हवामान विभागाचा अंदाज आहे. कोकण विभागात 25 ते 30 जुलैपर्यंत अतिवृष्टी इशारा देण्यात आला आहे.