ग्रामपंचायत निवडणूक जिंकण्याचं स्वप्न अधुरं, उमेदवाराचा प्रचारादरम्यान मृत्यू

निवडणुकांचा प्रचार सुरु असताना परशुराम शिगवण यांना हार्ट अटॅक आला, मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले Ratnagiri Gram Panchayat Candidate dies

ग्रामपंचायत निवडणूक जिंकण्याचं स्वप्न अधुरं, उमेदवाराचा प्रचारादरम्यान मृत्यू
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 8:22 PM

रत्नागिरी : प्रचारासाठी फिरताना ग्रामपंचायत निवडणुकीच्या उमेदवाराचा मृत्यू झाल्याची चटका लावणारी घटना समोर आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील धामापूर ग्रामपंचायत निवडणुकीचे उमेदवार परशुराम शिगवण यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. (Ratnagiri Dhamapur Gram Panchayat Election Candidate dies of heart attack)

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील धामापूर ग्रामपंचायतीची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आहे. परशुराम शिगवण हे गाव पॅनल वॉर्ड क्रमांक दोनमधून उमेदवार होते. निवडणुकांचा प्रचार सुरु असताना शिगवण यांना हार्ट अटॅक आला. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान परशुराम शिगवण यांना प्राण गमवावे लागले. ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात 479 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक

मंडणगड 15, दापोली 57, खेड 87, चिपळूण 83, गुहागर 29, संगमेश्‍वर 81, रत्नागिरी 53, लांजा 23 राजापूर 51

रत्नागिरीत 119 ग्रामपंचायती बिनविरोध

रत्नागिरी जिल्ह्यात 479 ग्राम पंचायतींपैकी 360 ग्रामपंचायतींमध्ये प्रत्यक्ष मतदान होणार आहे. 119 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर बिनविरोध उमेदवारांची संख्या 1814 आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 360 ग्रामपंचायतीसाठी 4 हजार 332 उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. संगमेश्वर तालुक्यातील 81 ग्रामपंचायतींमधील 19 ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध झाल्या असून 62 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल 119 ग्रामपंतायती बिनविरोध झाल्यामुळे तब्बल 47 लाखांचा खर्च वाचला आहे. एक ग्रामपंचायत बिनविरोध झाली तर निवडणूक आयोगाचा चाळीस हजारांचा खर्च वाचतो. यामुळे गावागावातले वाद सुद्धा दूर होणार आहेत.

विजय शिवतारेंच्या बिनविरोध निवडलेल्या बहिणीचे निधन

पुरंदर तालुक्‍याचे माजी आमदार आणि माजी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांची बहीण शोभा बाळासाहेब यादव यांचे गेल्या मंगळवारी (5 जानेवारी) पहाटे निधन झाले. वयाच्या 57 व्या वर्षी सासवडमधील राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने त्यांची प्राणज्योत मालवली. सटलवाडी ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी अवघ्या तीन दिवसांपूर्वी त्या बिनविरोध निवडून आल्या होत्या.

संबंधित बातम्या :

राज्यात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीची रंगत; ‘या’ गावची निवडणूक अंजली पाटीलमुळे चर्चेत

“ग्रामपंचायतीला दोन गट उभे राहतात; निवडून येतो, तो म्हणतो दादा आम्ही तुमचे” अजितदादांनी हशा पिकवला

(Ratnagiri Dhamapur Gram Panchayat Election Candidate dies of heart attack)

'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.